AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाजप किती जागा जिंकणार? मोदींच्या 400 पारच्या दाव्यावर संजय राऊत यांचा दावा काय?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येत्या लोकसभा निवडणूकीमध्ये भाजप 400 चा पार करणार असल्याचा दावा केला आहे. मात्र ठाकरे गटाच्या संजय राऊत यांनी टीव्ही9 मराठीच्या लोकसभा महासंग्राम कार्यक्रमामध्ये भाजप किती जागा मिळवणार याचा आकडा सांगितला आहे.

भाजप किती जागा जिंकणार? मोदींच्या 400 पारच्या दाव्यावर संजय राऊत यांचा दावा काय?
Harish Malusare
Harish Malusare | Updated on: Mar 01, 2024 | 3:54 PM
Share

मुंबई : ठाकरे गटाचे फायरब्रँड नेते संजय राऊत यांनी टीव्ही9 मराठीच्या विशेष ‘लोकसभा महासंग्राम’ कार्यक्रमामध्ये मोकळ्यामनाने उत्तरे दिलीत. यावेळी संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली. त्यासोबतच आगामी लोकसभा निवडणूकीमध्ये भाजपला किती मिळणार याची आकडाही राऊतांनी सांगून टाकला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 400 पार चा आकडा सांगतिला असला तरी राऊतांनी सांगितलेल्या आकड्यामध्ये मोठा तफावत असलेला पाहायला मिळत आहे.

काय म्हणाले संजय राऊत?

भाजपचं सरकार येतच नाही त्यामुळे मोदी परत पंतप्रधान होणार नाहीत, एवढ्या जागांचं टार्गेट ठेवलं. 220च्या पुढे भाजप जात नाही. देशाचा नकाशा समोर ठेवा. त्यामध्ये राज्यांनुसार गणितं मांडा, कुठून आणणार भाजप जागा. उत्तर प्रदेशातील 80 जागा त्यांना मिळून द्या, छत्तीसगड, हरियाणा, तेलंगनातील सर्व जागा त्यांना घेऊ द्या तरीसुद्धा भाजप 220च्या पुढे जाणार नसल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

नितीश कुमार आज त्यांच्यासोबत आहे. उद्या पलटी मारेल,  त्यांना पळण्याचा नाद आहे. एनडीए म्हणजे भाजप, शिवसेना आणि अकाली दल होतो. आता बाकी मुरमुरे कुरमुरे आहेत. इंडिया आघाडीच्या राज्यांचा विचार केला तर इंडिया आघाडी किमान 290 जागा जिंकेल. आप आणि काँग्रेसची युती झाली आहे. दिल्ली, गुजरात आणि हरयाणात झाली आहे. पंजाबमध्ये काँग्रेस-आपची युती झाली नाही. पंजबामध्ये आप आणि काँग्रेसला जागा मिळाल्यावर इंडिया आघाडीला जागा मिळणार नाही. पश्चिम बंगालमध्येही ममता बॅनर्जी आणि काँग्रेसलाच जागा मिळणार असल्याचं संजय राऊत म्हणाले.

इंडिया आघाडीत अनेक चेहरे आहेत. राहुल गांधी खरगे आणि उद्धव ठाकरे आहेत. जागांचा विषय नाही. लीडरशीपचा विषय आहे. देश कुणाच्या नेतृत्वात पुढे जाईल हे महत्त्व आहे. मोदी गॅरंटी फक्त जाहिरातीत आहे. बाकी कुठे आहे. भाजप हा चोरांचा पक्ष आहे. भाजप हा चोरबाजार आहे. काँग्रेसने कर्नाटकात काँग्रेसच्या सहा गॅरंटी आहे. तिथून आलेला हा फॉर्म्युला भाजपने चोरला. काँग्रेसने सहा गॅरंटी दिल्या होत्या, भाजप कनार्टकात हरले. त्यामुळे मोदींना वाटलं लोक गॅरंटी शब्दावर विश्वास ठेवतात म्हणून शब्द चोरल्याचंही राऊत यांनी सांगितलं.

Follow Us
दिशा सालियान प्रकरण अपघात म्हणून मिटलं तरी... संजय राऊतांचां दावा
दिशा सालियान प्रकरण अपघात म्हणून मिटलं तरी... संजय राऊतांच्या मोठ्या दाव्याने खळबळ
गंभीर दुष्काळी परिस्थितीबाबत CM फडणवीसांचं मोठं विधान, दोन मंत्री...
गंभीर दुष्काळी परिस्थितीबाबत CM फडणवीसांचं मोठं विधान, दोन मंत्र्यांना तातडीचे आदेश
आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढणार? दिशा सालियान प्रकरणी सतीश सालियान...
आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढणार? दिशा सालियान प्रकरणी सतीश सालियान थेट वकीलांसह 'मातोश्री'ला जाणार
ममता बॅनर्जींच्या पाठिंब्यानंतर काँग्रेस उमेदवाराला अटक, बंगाल...
ममता बॅनर्जींच्या पाठिंब्यानंतर काँग्रेस उमेदवाराला अटक, नेमकं प्रकरण काय?
विविध ठिकाणी व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध, तीव्र आंदोलनाचा इशारा
विविध ठिकाणी व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध, तीव्र आंदोलनाचा इशारा
निवडणूक आयोगाने TMC चं चिन्ह गोठवताच, ममता बॅनर्जींचा मोठा निर्णय थेट
निवडणूक आयोगाने TMC चं चिन्ह गोठताच, ममता बॅनर्जींचा मोठा निर्णय थेट.... बंगालमध्ये राजकीय हालाचाली वाढल्या?
फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने..
Kalyan Nagar Highway | Rain | फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने प्रवाशांचे हाल
दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या
Eknath Shinde : दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्यांसाठी प्रशासनाला तयारीचे आदेश
मराठमोळ्या गोंधळ सिनेमाची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
Oscar2027 | मराठी सिनेमाची जगभरात दणदणीत एन्ट्री! गोंधळची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
आदित्य ठाकरेंना अटक करा, दिशा सालियन प्रकरणावर राणेंची थेट मागणी
Nitesh Rane | आदित्य ठाकरेंना अटक करा, चौकशी करा...दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंची थेट मागणी; उद्धव ठाकरेंच्या आरोपांनाही  दिलं प्रत्युत्तर