Abu Azmi: तो मंत्री नेपाळी दिसतो…अबु आझमी यांची जीभ घसरली. त्याची जीभ हासडून…नितेश राणेंवर अत्यंत जिव्हारी टीका
Abu Azmi on Nitesh Rane: समाजवादी पक्षाचे नेत अबू आझमी यांची जीभ सतत घसरत असते. टीका करताना त्यांना पुन्हा भान राहिले नाही. नितेश राणे यांच्यावर तिखट प्रतिक्रिया देताना त्यांनी पुन्हा एकदा वाद ओढावून घेतला. मुंबई महानगरपालिका निवडणुकीचा प्रचाराचा धुराळा खाली बसत असतानाच त्यांनी बॉम्ब टाकला.

Abu Azmi on Nitesh Rane: समाजवादी पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अबू आसिम आझमी यांची जीभ सतत घसरत असते. टीका करताना त्यांना भान जपता येत नाही. आता हिंदुत्वाच्या मुद्दावरून भाजपचे आमदार नितेश राणे यांच्यावर टीका करताना पातळी सोडली. नितेश राणे हे मुसलमानांना म्हणतात की कुराण पठण करायचे असेल तर पाकिस्तानात जा. मला जर ताकद मिळाली तर राणेंची जीभ नाही हासडली तर मला माझ्या बापाचा मुलगा म्हणून नका, असं विचित्र वक्तव्य आझमींनी केले. इतक्यावरच न थांबता त्यांनी राणेंवर जिव्हारी टीका केली.
तो मंत्री नेपाळी दिसतो
यावेळी नितेश राणे यांच्यावर टीका करताना त्यांचा पराकोटीचा द्वेषही दिसून आला. तो बुटका मंत्री नेपाळी दिसतो अशी टीका त्यांनी केली. राणे हे मशिदीत घुसून मुसलमानांना मारणार अशी भाषा करतात. आम्ही काय बांगड्या भरल्यात का, अशी बडबड आझमींनी केली. तुझ्यात इतका दम आहे, तर पोलिसांना बाजूला कर आणि मग ये मशिदीत, तुझी काय अवस्था होते ते पाहा. आजपर्यंत एखाद्या मुस्लिमाला तुम्ही मंदिराबाहेर नारे देताना पाहिले का? असा सवाल अबू आझमी यांनी केला. तर आम्ही राम नवमीला पाणी वाटप करतो आणि हे मंत्री आम्हाला देशात राहायचे तर वंदे मातरम म्हणावे लागेल अशी धमकी देतो, अशा शब्दात आझमींनी राग व्यक्त केला.
नितेश राणे काय म्हणाले?
हिंदुत्व आणि राष्ट्रवाद, रोहिंग्या-बांगलादेशी घुसखोरांवर भाजप आमदार नितेश राणे यांनी तिखट प्रतिक्रिया दिली होती. हिंदुत्व आणि राष्ट्रवादासाठी आपण काम करतो. सामाजिक ,धार्मिक ध्रुवीकरणासाठी नाही. धार्मिक मिरवणुकीवरील दगडफेकीवर भाष्य करताना ईद अथवा मोहरम दरम्यान असे प्रकार घडत नाहीत. पण रामनवमी आणि हनुमान जयंतीच्या मिरवणुकीवर दगडफेक कशी होते असा सवाल नितेश राणे यांनी केला होता. ईद शांतीपूर्ण होत असेल तर मग रामनवमीमध्ये अशी गडबड का करण्यात येते असे राणे यांनी विचारले होते.आपला एखाद्या खास समुदाय, धार्मिक गटाला विरोध नाही. मी देशभक्त, राष्ट्रभक्त मुस्लिमाविरोधात नाही. जे लोक जिहाद करु पाहात आहे, त्यांना विरोध करणे स्वाभाविक असल्याचे राणे म्हणाले.
Watch: Samajwadi Party state president Abu Azmi says, “You can build a mosque with your own money and offer your prayers. But a minister here says, ‘If you want to read the Quran Sharif, go to Pakistan and read it,’ doesn’t he? Give strength to Abu Azmi—if such abusive language… pic.twitter.com/71O6o5SSSU
— IANS (@ians_india) January 11, 2026
कराचीला नाही तर कुठं पाठवणार?
राणे यांनी समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला. वंदे मातरम म्हणण्यास विरोध केल्यावर नितेश राणे यांनी हा लव जिहाद असल्याचे म्हटले आहे. जर भारतात राहायचे असेल तर वंदे मातरमला विरोध का? जे वंदे मातरम म्हणणार नाहीत, त्यांना पाकिस्तान, कराची नाही तर मग कुठं पाठवायचं, अशी प्रतिक्रिया राणेंनी दिली.
