मुंबई कोस्टल रोडची दुसरी मार्गिका मंगळवारपासून खुली, 40 मिनिटांचे हे अंतर अवघ्या 9 मिनिटांत फत्ते

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी असून मुंबई सागरी किनारा मार्गाचा दुसरा टप्पा मंगळवारपासून वाहतूकीसाठी खुला करण्यात येणार आहे. यामुळे मुंबईकरांचा प्रवास जलद गतीने होणार आहे.

मुंबई कोस्टल रोडची दुसरी मार्गिका मंगळवारपासून खुली, 40 मिनिटांचे हे अंतर अवघ्या 9 मिनिटांत फत्ते
costal road 2n phase open from tuesday tuesday morningImage Credit source: TV9MARATHI
Follow us
| Updated on: Jun 10, 2024 | 3:00 PM

मुंबईतील सागरी किनारा मार्गाच्या ( कोस्टल रोड ) दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज सोमवारी करण्यात आले आहे. मंगळवारपासून( 11 जून 2024 ) हा दुसरा टप्पा मुंबईकरांसाठी खुला होत आहे. या मार्गामुळे मरिन ड्राईव्ह ते हाजीअली हा टप्पा अवघ्या काही मिनिटांत पार पाडता येणार आहे. या कोस्टल रोडवर सकाळी 7 ते रात्री 11 वाजेपर्यंत 16 तास प्रवास करता येणार आहे. धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता ( दक्षिण ) अंतर्गत दुसऱ्या बोगद्याचे सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या पाहणीनंतर उद्घाटन करण्यात आले आहे.

कोस्टल रोड विस्ताराप्रमाणे मंत्रीमंडळाचाही विस्तार लवकरच

मुंबईकरांना वाहतूकीच्या कोंडीपासून हा नवा टप्पा दिलासा देणार आहे. वरळीकडे जाणार मार्ग आज खुला करण्यात आला आहे. 6.5 किमी अंतराचा हा मार्ग आहे पुढील तिसरा टप्पा 10 जुलै रोजी सुरू करण्यात येईल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले. आधी या मार्गावर 40 ते 50 मिनिटे लागत होती आता 9 मिनिटांत हा टप्पा पार करता येणार आहे. अत्यावशक सर्व यंत्रणा या भूमिगत मार्गात उभारण्यात आल्या आहेत. लवकरच हा रस्ता वरळी सी लिंकला जोडला जाईल असे सांगताना मुख्यमंत्र्यांनी रस्त्यांच्या विस्ताराप्रमाणे मंत्रीमंडळाचा विस्तारही लवकरच होईल अशी मिश्कील टीप्णणी केली. यावेळी त्यांना राज ठाकरे बद्दलच्या प्रश्नावर उत्तर देणं टाळलं.

हा फायदा होणार

बहुचर्चित असलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या कोस्टल रोड प्रकल्पातील मरीन ड्राईव्हपासून सुरू होणारा उत्तर दिशेने जाण्यासाठीचा दुसरा भूमिगत बोगदा आज दुपारपासून वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे. मरीन ड्राईव्ह ते हाजी अली असा एकूण 6.25 Km अंतराचा हा बोगदा पार करण्यासाठी अवघे दहा मिनिटं पुरेशी असणार आहेत, त्यामुळे मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी असून त्यांना जलद गतीने प्रवास करता येणार आहे. यामुळे वरळी वांद्रेच्या दिशेने ताडदेव, याचबरोबर पेडर रोड इथे जाणाऱ्या वाहतुकीला या बोगद्यातून होणाऱ्या वाहतुकीमुळे वेग येणार आहे .

येथे पहा व्हिडीओ –

शनिवारी – रविवारी बंद

एकूण आठवड्यातील पाच दिवस म्हणजे सोमवार ते शुक्रवार या काळामध्ये सकाळी 07 ते संध्याकाळी 11 म्हणजे एकूण 16 तास हा बोगदा वाहतुकीसाठी खुला असणार आहे. आणि आठवड्याचे उर्वरित दोन दिवस प्रकल्पाच्या मेंटेनन्सचे काम केले जाणार असल्याने शनिवार आणि रविवार हा मार्ग बंद असणार आहे.

 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली मार्गिकेची पाहणी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या सहकारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या साथीने याच बोगद्यातून विंटेज कारमधून प्रवास करीत पाहणी केली आहे. ही विण्टेड कार कोस्टल रोड बोगद्यातून नेण्यात आली, त्याद्वारे या बोगद्याची पाहणी करण्यात आली आहे.

मी समाधानी नाही, इतके रूपये..., पोटगीच्या निर्णयावर करूणा शर्मा नाराज?
मी समाधानी नाही, इतके रूपये..., पोटगीच्या निर्णयावर करूणा शर्मा नाराज?.
'..ही सुरूवात', मुंडेंवर तृप्ती देसाईंची टीका अन् पुन्हा केली ती मागणी
'..ही सुरूवात', मुंडेंवर तृप्ती देसाईंची टीका अन् पुन्हा केली ती मागणी.
धनंजय मुंडे गोत्यात? करुणा शर्मांचे आरोप मान्य, दरमहिन्याला इतकी पोटगी
धनंजय मुंडे गोत्यात? करुणा शर्मांचे आरोप मान्य, दरमहिन्याला इतकी पोटगी.
'त्या' महिलांपर्यंत लाडकी बहीण पोहोचवण्यासाठी सरकारचा निर्णय, जीआर काय
'त्या' महिलांपर्यंत लाडकी बहीण पोहोचवण्यासाठी सरकारचा निर्णय, जीआर काय.
'तुझा संतोष देशमुख करू...', कराडच्या बातम्या बघणाऱ्यावर कोयत्याचे वार
'तुझा संतोष देशमुख करू...', कराडच्या बातम्या बघणाऱ्यावर कोयत्याचे वार.
मोफत अन्नछत्रासदर्भात शिर्डी संस्थानचा निर्णय, आता गुन्हेगारी रोखणार?
मोफत अन्नछत्रासदर्भात शिर्डी संस्थानचा निर्णय, आता गुन्हेगारी रोखणार?.
'मी थांबतोय', काही दिवसांवर लग्न, तुकारामांच्या वशंजांनी संपवलं आयुष्य
'मी थांबतोय', काही दिवसांवर लग्न, तुकारामांच्या वशंजांनी संपवलं आयुष्य.
ठाकरेंना भाजप-सेना सोबत घेणार?फडणवीसांकडून युतीच्या चर्चेला पूर्णविराम
ठाकरेंना भाजप-सेना सोबत घेणार?फडणवीसांकडून युतीच्या चर्चेला पूर्णविराम.
आष्टीत CM यांच्यासमोर धसांनी गाजवलं भाषण अन पंकजा मुंडेंनी लगावला टोला
आष्टीत CM यांच्यासमोर धसांनी गाजवलं भाषण अन पंकजा मुंडेंनी लगावला टोला.
अवघ्या काहीच दिवसांवर लग्न अन्.. हभप शिरीष महाराज मोरेंनी संपवलं जीवन
अवघ्या काहीच दिवसांवर लग्न अन्.. हभप शिरीष महाराज मोरेंनी संपवलं जीवन.