Uddhav Thackeray: देशात लोकशाही नव्हे… उद्धव ठाकरेंनी महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडला, निवडणूक आयोगावर निशाणा
Uddhav Thackeray Criticized: शिवसेना भवनालाही आज उमाळा आला असेल. राज ठाकरे आज 20 वर्षांनी शिवसेना भवनात आले. त्यावेळी संयुक्त पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी लोकशाही, भाजप आणि निवडणूक आयोगावर मोठे भाष्य केले.

Uddhav Thackeray Criticized: मुंबईत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे जवळपास 20 वर्षांनंतर एकत्र आले. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मनसे, उद्धव ठाकरे शिवसेना आणि शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या शिवशक्तीचा वचननामा आज या नेत्यांनी अधिकृतपणे जाहीर केला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी लोकशाही, भाजप आणि निवडणूक आयोगावर मोठे भाष्य केले. त्यांनी यावेळी सत्ताधाऱ्यांवर हल्ला चढवला. त्यांनी निवडणूक आयोगाच्या धोरणांचा खरपूस समाचार घेतला.
ही लोकशाही नाही, झुंडशाही
यावेळी उद्धव ठाकरे यांनी सध्याच्या परिस्थितीवर भाष्य केले. देशात झुंड शाही सुरू आहे. आपल्या देशातील लोकशाही संपून झुंडशाही सुरू झाली आहे. आम्ही त्यांची मतचोरी पकडली. आता त्यांनी उमेदवारांची पळवापळवी सुरू केली आहे. साम दाम दंड भेद. निगरगट्ट राज्यकर्ते लाभले आहेत. बिनविरोध निवडणूक करण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा आरोप त्यांनी केला. यावेळी त्यांनी राहुल नार्वेकर हे सभागृहात सभापती. बाहेर आमदार आहे. नाव घेऊन बोलतो. एक आमदार दमदाटी करतो. समोरच्याचं संरक्षण काढून घेऊन दमदाटी करत आहे. अध्यक्षाची निलंबन करा. अध्यक्ष निष्पक्षपाती असतात. ते कोणत्याही पक्षाच्या प्रचाराला जाऊ नये असा हा अलखित दंडक आहे. त्यांनी त्याला छेद देणारं वर्तन केलं आहे असा आरोप केला.
राज्य निवडणूक आयोगाचं नाटक
यावेळी उद्धव ठाकरे यांनी राज्य निवडणूक आयोगावर सडकून टीका केली. निवडणूक आयोगाचं नाटक आहे. त्यांनी निकाल राखून ठेवला. पुन्हा निकाल तोच जाहीर करतील. जेनझी चा मतदानाचा अधिकार काढून घेतला आहे. केवळ निवडणूक निकाल रोखू नका. तुम्ही तिथल्या निवडणुका रद्द करा. नाही तर तुम्ही गुलाम आहात हे लोकांमध्ये जाईल असा टोला उद्धव ठाकरे यांनी आयोगाला लगावला. नेहमीच शिवसेना भवनात प्रवेश करताना आपल्यापैकी बरेचजण खाली असतात. त्यांना काही ना काही मला विचारायचं असतं. आज गाडीतून पाऊल टाकल्यापासून आता पर्यंत २० वर्षानंतर राज ठाकरे सेना भवनात येत आहे कसं पाहता याकडे असं विचारलं. म्हटलं अरे येऊ तर दे नंतर पाहतो. महाराष्ट्रात चैतन्य आहे. सळसळता उत्साह आहे. आम्ही आज जाहीरनामा प्रकाशित करत आहोत. विद्या चव्हाण राष्ट्रवादीकडून आल्या आहेत. हा वचननामा सादर करत आहोत, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
