VIDEO | नागपुरातील लेबर ठिय्यावर मजुरांचं वेटिंग, कोरोना आटोक्यात येऊनही बेरोजगारी कायम

| Updated on: Jul 01, 2021 | 7:14 PM

नागपुरातील कोरोनाची परिस्थिती बऱ्यापैकी नियंत्रणात आली आहे. पण पूर्ण क्षमतेनं विकासकामं आणि बांधकामं सुरु झाली नाहीत.

Follow us on

नागपूर : येथील कोरोनाची (Corona Pandemic) परिस्थिती बऱ्यापैकी नियंत्रणात आली आहे. पण पूर्ण क्षमतेनं विकासकामं आणि बांधकामं सुरु झाली नाहीत. त्यामुळे मजुरांच्या हाताला काम मिळत नाही. नागपूरातील सर्वच लेबर ठिय्यांवर मोठ्या संख्येने मजूर येतात. पण चार ते पाच तास वाट पाहूनही मजुरांच्या हाताला काम मिळत नाही. त्यामुळे मजुरांपुढे पोटा-पाण्याचा प्रश्न निर्माण झाला. नागपूरातील लेबर ठिय्यावर निम्म्यापेक्षा जास्त मजूर रोज रिकाम्या हाताने परत जातात. (Corona’s condition under control but still Labor and Workers in Nagpur do not get work to earn and live)

नागपूरवर डेल्टा प्लसचं संकट?

महाराष्ट्रावरील कोरोनाच्या डेल्टा प्लस वेरिएंटचं संकट वाढताना दिसत आहे. नागपूर जिल्ह्यात एकाच कुंटुंबातील दहा जणांना कोरोना विषाणू संसर्ग झाल्यानं जिल्हा प्रशासन अ‌ॅलर्ट झालं आहे. नागपूरातील डेल्टा प्लसच्या संशयित म्हणून त्या दहा रुग्णांचे अहवाल तपासणीसाठी निरीनं हैदराबाद येथील प्रयोगशाळेत पाठवले आहेत. आता या अहवालामध्ये काय होतंय, याकडे नागपूरकरांचं लक्ष लागलं आहे.

इतर बातम्या

तिसऱ्या लाटेत राज्यात रक्ताचा तुटवडा भासू नये, ‘डॉक्टर्स डे’निमित्त 1 लाख लोकांच्या रक्तदानाचा महायज्ञ

Weather Update: पावसात खंड पडल्यानं उष्णता, आर्द्रता वाढल्यानं नागरिक त्रस्त, विदर्भात जून महिन्यात किती पाऊस?

VIDEO | तुकाराम मुंढेंच्या काळात आरोग्य साहित्य खरेदीत अनियमितता, त्रिसदस्यीय समितीकडून चौकशी

(Corona’s condition under control but still Labor and Workers in Nagpur do not get work to earn and live)