AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उद्धव ठाकरे, नरेंद्र मोदी एकत्र येणार? एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील नेत्याने सांगितले…

mla shahaji bapu patil | जागेचा विषय हा शेवटच्या क्षणापर्यंत सुरू असतो. प्रत्येक पक्षाला जास्त जागा मिळाव्यात, असे वाटत असते. आगामी लोकसभा निवडणुकीत महायुतीला ४५ जागा मिळतील, असा दावा शिवसेना आमदार शहाजी बापू पाटील यांनी केला.

उद्धव ठाकरे, नरेंद्र मोदी एकत्र येणार? एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील नेत्याने सांगितले...
narendra modi uddhav thackeray (फाईल फोटो) Image Credit source: tv9 Marathi
| Updated on: Mar 06, 2024 | 12:20 PM
Share

रवी लव्हेकर, पुणे | दि. 6 मार्च 2024 : शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील हे आपल्या आगळ्या वेगळ्या वक्तव्याने चर्चेत असतात. आता शहाजी बापू यांनी ठाकरे गटाची शिवसेना आणि भारतीय जनता पक्षासंदर्भात भविष्य वर्तवले आहे. त्यांनी आगामी काळात भाजप म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत उद्धव ठाकरे यांची शिवसेना जाणार असल्याचा दावा केला आहे. आपला अंदाज कधीही चुकणार नसल्याचे वक्तव्य त्यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्याची चर्चा आता चांगली रंगली आहे. त्यांच्या या दाव्याला एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून आणि भाजपकडून दुजोरा मिळाला नाही.

काय म्हणाले शहाजी बापू

एक हजार टक्के मोदी साहेब आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार आहेत. माझा अंदाज कधीही चुकणार नसल्याचे वक्तव्य आमदार शहाजी बापू पाटील यांनी केले. तसेच निवडणूक ही तुमच्या पाच वर्षांच्या कामावर आणि कष्टावर चाललेली असते. कोणत्याही निवडणुकीत शेवटचे दोन दिवस सर्वात महत्त्वाचे असतात. या दोन दिवसांचा अंदाज निवडणूक सर्व्हे करणाऱ्यांनाही येत नाही. नुकत्याच झालेल्या मध्यप्रदेश, राजस्थान विधानसभेचा निवडणूक सर्वे चुकला. सर्व्हे त्याचबरोबर बीआरएस बाबत तेलंगणातील सर्व्हे देखील चुकला होता. त्यामुळे सर्व्हेवर विश्वास किती ठेवायचा हे ज्याचे त्याने ठरवायचे असते.

लोकसभेला 45 च्यावर जागा

पक्षांतरावर बोलताना शहाजी बापू पाटील म्हणाले की, राजकारणात निवडणुकाजवळ आल्या की कार्यकर्त्यांचे सुगीचे दिवस येतात. सुगीच्या दिवसांत जसे पाखरे या रानातून त्या रानात हिंडत असतात, तसेच या पक्षातून त्या पक्षात कार्यकर्ते आणि नेतेही जात असतात. ही लोक फक्त संधीचा शोध घेत असतात. आगामी लोकसभा निवडणुकीत आमच्या महायुतीला लोकसभेला 45 च्यावर जागा निवडून येण्याचा दावा शहाजी बापू यांनी केला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कामावर जनतेचा प्रचंड विश्वास निर्माण झाला  आहे. जनमताचा  हा कौल ओळखून शेकापच्या शेकडो कार्यकर्त्यांनी नुकतेच शिवसेनेत प्रवेश केला. आगामी काळात संपूर्ण तालुक्यात परिवर्तन झालेले पाहायला मिळेल, असे शहाजी बापू यांनी सांगितले.

इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.