अमेरिकन नागरिकत्व सोडलं, महाराष्ट्राच्या मातीत चळवळींचा अभ्यास, मैलाचा दगड ठरणारं अफाट लेखन, कोण आहेत डॉ. गेल ऑम्व्हेट?

गेल आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या समाज शास्त्रज्ञ होत्या. याशिवाय त्या श्रमिक मुक्ती दलाच्या संस्थापक सदस्या आणि धोरण समितीच्या सदस्याही होत्या. बुद्ध, फुले, आंबेडकर, मार्क्स यांच्यासह स्त्री-मुक्तीवादी विचारांची, संत साहित्याची आणि वारकरी तत्वज्ञानाची अभ्यासपूर्ण अशी नव्या पद्धतीची मांडणी गेल यांनी समाजापुढे केली.

1/15
ज्येष्ठ विचारवंत, संशोधक, लेखिका आणि सामाजिक कार्यकर्त्या गेल ऑम्व्हेट यांचं वृद्धापकाळाने दीर्घ आजारानंतर आज (25 ऑगस्ट) वयाच्या 81 व्या वर्षी निधन झालं. डॉ. गेल यांना लॉकडाऊननंतर चालता येत नसल्यामुळे कासेगाव येथे घरीच डॉ. भारत पाटणकर यांच्या देखरेखीखाली वैद्यकीय उपचार घेत होते.

2/15
गेल आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या समाज शास्त्रज्ञ होत्या. याशिवाय त्या श्रमिक मुक्ती दलाच्या संस्थापक सदस्या आणि धोरण समितीच्या सदस्याही होत्या.

3/15
बुद्ध, फुले, आंबेडकर, मार्क्स यांच्यासह स्त्री-मुक्तीवादी विचारांची, संत साहित्याची आणि वारकरी तत्वज्ञानाची अभ्यासपूर्ण अशी नव्या पद्धतीची मांडणी गेल यांनी समाजापुढे केली.

4/15
गेल यांनी स्त्री मुक्ती चळवळ, परित्यक्ता स्त्रियांची चळवळ आणि आदिवासी चळवळींसाठी पायाला भिंगरी लावून झपाटल्यासारखं काम केलं.

5/15
डॉ. गेल या मूळच्या जन्माने अमेरिकेच्या होत्या. त्या अमेरिकेतही विद्यार्थीदशेपासूनच वेगवेगळ्या चळवळीमध्ये सक्रिय होत्या. त्यांनी अमेरिकेच्या साम्राज्यवादी आणि युद्धखोर धोरणांविरोधीतील चळवळीत काम केलं.

6/15
अमेरिकेत पदव्युत्तर शिक्षण झाल्यानंतर त्या भारतात आल्या. यावेळी त्यांनी वेगवेगळ्या चळवळींचा अभ्यास केला. त्या महाराष्ट्रात आल्या आणि महात्मा फुले यांनी केलेल्या संघर्षावर सखोल संशोधन केलं. पुढे महात्मा फुले यांच्या चळवळीवरच त्यांनी वसाहतीक समाजातील सांस्कृतिक बंड (नॉन ब्राह्मिण मूहमेन्ट इन वेस्टर्न इंडिया) हा आपला पीएचडी प्रबंध अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया बरकली विद्यापीठात सादर केला. यात त्यांनी डॉक्टरेट पदवी संपादन केली.

7/15
गेल यांच्या पूर्वी महात्मा फुले यांच्या चळवळीवर भारतातील कोणीही इतका सविस्तर अभ्यास करून महाराष्ट्रभर फिरून मांडणी केली नव्हती. त्यांचा हा प्रबंध भारतातच नव्हे तर जगभरात अभ्यासकांसाठी मैलाचा दगड ठरला. त्यांच्या या पुस्तकामुळे फुलेंची चळवळ पुन्हा नव्याने अधोरेखित झाली.

8/15
या पुस्तकामुळेच प्रभावित होऊन बहुजन समाज पार्टीचे संस्थापक कांशीराम उत्तर प्रदेशातून कासेगाव येथे आले आणि त्यांनी गेल यांचे मार्गदर्शन व सल्ला घेतला.

9/15
डॉ. गेल यांनी अमेरिकेसारख्या प्रगत राष्ट्राच्या मोहात न अडकता भारतात विशेषतः महाराष्ट्रात राहण्याचा निर्णय घेतला. या काळात त्यांनी स्री-मुक्ती चळवळींचा अभ्यास करत असतानाच क्रांती विरांगना म्हणून ओळख असलेल्या इंदूताई पाटणकर यांची भेट झाली.

10/15
दरम्यान, त्यांची इंदूताई पाटणकर यांचा मुलगा भारत पाटणकर यांच्याशी ओळख झाली. भारत पाटणकर त्या काळात एमडीचे शिक्षण अर्धवट सोडून पूर्णवेळ चळवळीत काम करत होते. पुढे त्यांच्या ओळखीचं रुपांतर प्रेमात झालं आणि गेल यांनी भारत पाटणकर यांना जीवनसाथी म्हणून निवडलं.

11/15
डॉ. गेल यांना प्राची नावाची एक मुलगी आहे.

12/15
गेल यांनी प्रगत राष्ट्र असलेल्या अमेरिकेचे नागरिकत्व सोडून भारतीय नागरिकत्व स्वीकारले.

13/15
डॉ. गेल यांनी देशभरातील विविध विद्यापीठात प्राध्यापक म्हणून काम केले. त्यामध्ये प्रामुख्याने पुणे विद्यापीठात फुले-आंबेडकर चेअरच्या प्रमुख, समाजशास्त्र विभागाच्या प्राध्यापक, ओरिसामधील निस्वासमध्ये आंबेडकर चेअरच्या प्रोफेसर, नोर्डीक येथे आशियाई अतिथी प्राध्यापक, इन्स्टिट्यूट ऑफ एशियन स्टडीज कोपनहेगन, नेहरू मेमोरिअल म्युझियम आणि लायब्ररी नवी दिल्ली, सिमला इन्स्टिट्यूटमध्ये प्रोफेसर म्हणून काम केले आहे.

14/15
FAO, UNDP, NOVIB च्या सल्लागार राहिल्या आहेत. ICSSR च्यावतीने भक्ती या विषयावर संशोधन केले आहे. अनेक वर्तमानपत्रांमध्ये यांचे विविध विषयावरचे लेख प्रकाशित झाले आहेत.

15/15
डॉ. गेल यांची 25 पेक्षा जास्त पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने कल्चरल रीवोल्ट इन कोलोनियल सोसायटी- द नॉन ब्राम्हिण मुहमेन्ट इन वेस्टर्न इंडिया, सिकिंग बेगमपुरा, बुद्धिझम इन इंडिया, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतीबा फुले, दलित अँड द डेमॉक्रॅटिक रिव्ह्यूलेशन, अंडरस्टँडिंग कास्ट, वुई विल स्मॅश दी प्रिझन, न्यू सोशल मुमेन्ट इन इंडिया यांचा समावेश आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI