Maharashtra Breaking Marathi News Live | शेतकऱ्यांच्या लाँग मार्चला उद्या मंत्री देणार भेट; राधाकृष्ण विखे पाटील उद्या चर्चा करणार

| Updated on: Apr 27, 2023 | 6:57 AM

Maharashtra Breaking and Marathi News Live : महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी घडामोड सध्याच्या घडीला जळगावातील पाचोऱ्यात घडत आहे. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची पाचोऱ्यात भव्य सभा आयोजित करण्यात आली आहे.

Maharashtra Breaking Marathi News Live | शेतकऱ्यांच्या लाँग मार्चला उद्या मंत्री देणार भेट; राधाकृष्ण विखे पाटील उद्या चर्चा करणार
Marathi News LiveImage Credit source: tv9 marathi

मुंबई : शिरोमणी अकाली दलाचे ज्येष्ठ नेते, पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाश सिंग बादल यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार. केदारनाथ धाम येथे बर्फवृष्टीचा अलर्ट. 30 एप्रिल पर्यंत रजिस्ट्रेशन बंद. दिल्लीतही जोरदार पावसाची शक्यता. रत्नागिरीच्या बारसू सड्यावर सलग दुसऱ्या दिवशी सर्व्हेक्षण सुरू राहणार. पोलिस बंदोबस्तात होणार सर्व्हेक्षण. मी सुट्टीवर नाही तर डबल ड्युटीवर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विरोधकांवर पलटवार.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 26 Apr 2023 11:12 PM (IST)

    शेतकऱ्यांच्या लाँग मार्चला उद्या मंत्री देणार भेट; राधाकृष्ण विखे पाटील उद्या चर्चा करणार

    धांदरफळ / अहमदनगर

    शेतकऱ्यांचा निघालेला लाँग मार्च

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली दखल

    उद्या महसुलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, कामगार मंत्री सुरेश खाडे आणि आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावीत आंदोलकांच्या भेटीला

    मागण्या संदर्भात होणार सविस्तर चर्चा

    सकाळी सात ते आठ वाजता आंदोलकांच्या भेटीला येणार असल्याची माहिती

    भेटीनंतर ठरणार आंदोलकांची पुढची भुमिका

    भेटीनंतर समाधान न झाल्यास लाँगमार्च निघणार महसूलमंत्र्यांच्या घराकडे

  • 26 Apr 2023 07:37 PM (IST)

    केंद्रीय कर्मचाऱ्यांना लवकरच लॉटरी

    महागाई भत्त्यात पुन्हा मोठी वाढ

    मोदी सरकार करणार मालामाल

    कर्मचाऱ्यांची चारही बोटं तुपात

    इतका वाढू शकतो आता पगार, वाचा बातमी 

  • 26 Apr 2023 06:48 PM (IST)

    चांदीच होणार सोन्यावर मोर

    चांदी हिसकावणार सोन्याचा ताज

    सोन्यापेक्षा आतापर्यंत सर्वाधिक परतावा

    सोन्याचे भाव वाढल्याने ग्राहकांचा हिरमोड

    सोन्यापेक्षा चांदीतून मिळणार मोठा परतावा

    असा होणार ग्राहकांना फायदा, वाचा बातमी 

  • 26 Apr 2023 06:12 PM (IST)

    कोल्हापुरात होत असलेल्या महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील वादाचे ग्रहण सुटेना

    स्पर्धेच्या निमित्ताने कोल्हापुरात येणाऱ्या ब्रिजभूषण सिंह यांना महिला कार्यकर्त्यांचा विरोध

    उद्या होणाऱ्या अंतिम सामन्यासाठी बृजभूषण सिंह प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार

    बृजभूषण सिंह यांचे शहर भर लागले पोस्टर

    ब्रूजभूषण सिंह कोल्हापुरात आल्यास त्यांना काळे झेंडे दाखवणार

    बृजभूषण सिंह यांच्यावर होत असलेल्या लैंगिक शोषणाच्या आरोपाच्या पार्श्वभूमीवर महिला कार्यकर्त्यांचा आक्षेप

    राजमाता जिजाऊ संघटनेचा इशारा

  • 26 Apr 2023 05:54 PM (IST)

    वाशिम जिल्ह्यात दुसऱ्या दिवशीही वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी

    मंगरुळपीर तालुक्यातील शेलूबाजार वनोजा परिसरात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा तडाखा

    शेलुबाजार शहरातील आठवडी बाजारपेठमधील अनेक पाले उडालीॉ

    अनेकांच्या घरावरचे टिनपत्रे उडून गेली

  • 26 Apr 2023 05:41 PM (IST)

    ॲपल स्टोअरच्या कर्मचाऱ्यांची बल्ले बल्ले

    पगार इतका की तोंडात जातील बोटे

    कर्मचाऱ्यांकडे असावे लागते तांत्रिक ज्ञान

    तांत्रिक ज्ञानासोबतच असावा लागतो बहुभाषिक

    देशात सध्या दोन स्टोअरची सुरुवात

    लवकरच देशात आयफोन तयार होणार, वाचा बातमी 

  • 26 Apr 2023 05:37 PM (IST)

    बुलढाणा जिल्ह्यात अवकाळीचा कहर सुरूच

    बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात प्रचंड गारपीट

    दीवठाणा, काळेगाव, निमकवळा गावात गारपीटीने शेतकरी हैराण

    हवामान खात्याने दिलेला अंदाज ठरला खरा

    अवकाळी ढगांची बुलढाण्यात कोसळधार

    शेतकरी मेटाकुटीला

    या परिसरातील कांदा पिकांचे मोठं नुकसान

  • 26 Apr 2023 05:36 PM (IST)

    गडचिरोली शासकीय योजनांच्या जत्रा कार्यक्रमातून परतताना ट्रॅक्टरची ट्रॉली पलटली

    दोन महिला ठार तर महिला 10 जखमी

    सिरोंचा तालुक्यातील चिटुर या दुर्गम भागात होती शासकीय योजनांची जत्रा

    लक्ष्मी देवपेटा येथील स्थानिक चेटुर गावात ट्रॅक्टरच्या सहाय्याने गेले होते

    परत येत असताना रंगधामपेठा जवळ चालकाच्या नियंत्रण सुटल्यामुळे ट्रॅक्टर टाॅली पलटली

    जखमी महिलांना सिरोंचा ग्रामीण रुग्णालय येथे उपचारासाठी आणले

  • 26 Apr 2023 05:25 PM (IST)

    अकोले / अहमदनगर

    किसान लॉंगमार्च सुरूवात अकोले ते लोणी असणार लॉंगमार्च लोणी येथे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या कार्यालयावर धडकणार लाल वादळ शेतकरी, कामगार, श्रमिकांच्या विविध प्रश्नी लॉंगमार्च किसान सभेचे डॉ.अजीत नवले, ज्येष्ठ पत्रकार पी.साईनाथ, किसान सभेचे अशोक ढवळे, आ.विनोद निकोले यासह राज्यातील प्रमुख नेते मोर्चात सहभागी महिला तसेच पुरूष आंदोलक हजारोच्या संख्येने मोर्चात सहभागी

  • 26 Apr 2023 05:02 PM (IST)

    कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठात स्पोर्ट्स कार्यक्रमानंतर धांगडधिंगा

    डी जे च्या तालावर कपडे काढून रात्री उशिरापर्यंत डान्स

    डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजी इथं घडला गंभीर प्रकार

    कोणतीही परवानगी नसताना तरुणांनी केला धांगडधिंगा

    कारवाई करण्यासाठी विद्यार्थी संघटनांची विद्यापीठाकडे मागणी

    विद्यापीठाचे सुरक्षा रक्षक हाकलून बाहेर काढत असताना देखील तरुण ऐकत नव्हते

    डी जे साठी कोणतीही परवानगी घेतली नसल्याची देखील विद्यापीठ प्रशासनाची माहिती

  • 26 Apr 2023 04:46 PM (IST)

    मे महिन्यात बँकांना इतक्या दिवस सुट्टी

    कामे पटापट घ्या उरकून, नाहकची धावपळ वाचेल

    बँकांना शनिवार,रविवार व्यतिरिक्त या दिवशी सुट्टी

    इतर कामांसाठी तुम्हाला ऑनलाईनचा करता येईल वापर, वाचा बातमी 

  • 26 Apr 2023 04:32 PM (IST)

    छत्तीसगड-दंतेवाडा स्फोट, शहीद झालेल्या पोलीस जवानांचे नाव

    १) जोगा सुडी

    २) मुन्ना राम कडती

    ३) संतोष तामो

    ४) दुल्गो मण्डावी

    ५) लखमु मरकाम

    ६) जोगा कवासी

    ७) हरिराम मण्डावी

    ८) राजु करटम

    ९) जयराम पेडियाम

    १०) जगदिश कवासी

    ११) धनीराम कवासी चालक सिविलियन

  • 26 Apr 2023 04:27 PM (IST)

    दंतेवाडा भू सुरुंग स्फोट, छत्तीसगड गृहमंत्र्यांची प्रतिक्रिया

    छत्तीसगड राज्यातील दंतेवाडा जिल्ह्यातील पालनार जंगल परिसरात नक्षलवाद्यांनी भू सुरंग स्फोट घडविला

    आरनपूर जंगल परिसरातून कोमिंग ऑपरेशन करून परत येत असताना हा भू सुरंग स्फोट घडविण्यात आलाय

    यात आमचे दहा पोलीस जवान व एक सिविलियन चालक शहीद झाले

    या चार वर्षात 60% नक्षलवाद संपविण्यात आम्ही यशस्वी झालो

    या घटनेची माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना देण्यात आली असून काही बाबी गुपित रहावे म्हणून मी सविस्तर बोलू शकत नाही

  • 26 Apr 2023 04:12 PM (IST)

    भू सुरंग स्फोटात 10 जवान व 1 चालक शहीद

    छत्तीसगड दंतेवाडा जिल्ह्यात भू सुरंग स्फोटात 10 जवान व 1 चालक शहीद

    दंतेवाडा जिल्ह्यातील अरनपूर पालनार मार्गावर नक्षलवाद्यांनी मोठा भू सुरंग स्फोट घडविला

    काल रात्री आलेल्या पावसामुळे काही जवानांना या भागातील जंगलात अडकले होते

    या जवानांना आणण्यासाठी DRG चा एक पथक अरनपुर पालनार या मार्गावर जात असताना नक्षलवाघांनी भू सुरंग स्फोट घडविला

    दोन्ही बाजूंनी चकमक सुरू असून या ठिकाणी अधिक पोलीस बल पाठवण्यात आले अशी माहिती पोलीस अधीक्षक सिद्धार्थ तिवारी यांनी दिली

  • 26 Apr 2023 04:06 PM (IST)

    नवी दिल्ली: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दौऱ्यात बदल होण्याची शक्यता

    दंतेवाडा हल्ल्यानंतर अमित शहा यांच्याकडून घेतला जातोय आढावा

    आज पासून दोन दिवस अमित शहा यांचा नियोजित नागपूर दौरा

    अद्यापही नागपूर दौऱ्याबाबत संभ्रम

  • 26 Apr 2023 03:37 PM (IST)

    छतीसगडमध्ये नक्षली हल्ला, ११ जवान शहीद

    छतीसगडमधील दंतेवाडा येथे हा हल्ला झाला

    हल्ल्यात १० जवान आणि चालकाचा मृत्यू झाला

    IED स्फोटाने हा हल्ला करण्यात आला

  • 26 Apr 2023 02:42 PM (IST)

    नाशिक | हनुमान जन्मस्थळाचा वाद पुन्हा एकदा पेटण्याची शक्यता

    कर्नाटकात हनुमानाचा जन्म झाल्याचं मुख्यमंत्री योगी यांनी एका कार्यक्रमात केलं वक्तव्य

    नाशिकच्या साधुमंतांकडून मात्र योगींच्या वक्तव्याचा विरोध

    योगींचे काम स्तुत्य, मात्र त्यांनी धर्मात राजकारण करू नये असा दिला सल्ला

  • 26 Apr 2023 02:33 PM (IST)

    Entertainment Update : चाहत्यांसोबत सेल्फी घेत असताना अचानक बेशुद्ध झाला हा अभिनेता, रुग्णालयात केलं दाखल

    चाहत्यांसोबत सेल्फी घेणं अभिनेत्याला पडलं महागात,

    बेशुद्ध झाल्यानंतर रुग्णालयात केलं दाखल... कशी आहे आता अभिनेत्याची प्रकृती?... वाचा सविस्तर

  • 26 Apr 2023 02:21 PM (IST)

    कल्याण | तरुणावर प्राणघातक हल्ला, हल्लेखोर तरुण पसार, पूर्वेकडील घटना

    कल्याण पूर्वेकडील नवी गोविंदवाडी परिसरातील धक्कादायक घटना

    बी एस यू पी प्रकल्पातील इमारतीच्या घरात एका तरुणावर प्राणघातक हल्ला

    हल्ल्यानंतरचा तरुणांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

    साजिद शेख असं जखमी तरुणाचे नाव, तरुणावर रुग्णालयात उपचार सुरू

    डोंबिवली टिळक नगर पोलिसांकडून तपास सुरु, क्षुल्लक वादातून हल्ला झाल्याची माहिती समोर

  • 26 Apr 2023 02:11 PM (IST)

    पुणे | शिवसेना खासदार संजय राऊत पुण्यात दाखल

    राउत यांची सायंकाळी दौंड तालुक्यातील वरवंड येथे जाहीर सभा

    आमदार राहुल कुल यांनी भीमा पाटस साखर कारखान्यामध्ये भ्रष्टाचारचे आरोप केल्यानंतर राऊत दौंडमध्ये घेणार सभा

  • 26 Apr 2023 02:03 PM (IST)

    पालघर | मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर चारोटी जवळील चिंचपाडा येथे कंटेंनरच्या केबिनला भीषण आग

    गुजरातहून मुंबईच्या दिशेने जाताना घडली धक्कादायक घटना,

    आगीचं कारण अद्यापही अस्पष्ट; वाहतूक संथ गतीने सुरू

  • 26 Apr 2023 02:02 PM (IST)

    शहरातील प्रत्येक पान टपरीवर QR कोड लावा

    नाशिक : शहरातील गुन्हेगारी रोखण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसची पोलिसांकडे मागणी

    पान टपरीवर QR कोड लावल्यास पोलीस गस्त घालतात की नाही हे वरिष्ठांना कळेल

    शहरात सध्या हत्या, गॅंग वॉर आणि गुन्हेगारीचा कळस

    पोलिसांची गस्त नसल्याने शहरातील गुन्हेगारी वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

  • 26 Apr 2023 01:52 PM (IST)

    अजित नवले आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्यात जुंपली

    अहमदनगर : कालची मुंबई येथील बैठक म्हणजे केवळ फार्स

    शेतक-यांचे प्रश्न सरकार गांभिर्याने घेत नाही अस दिसतय

    आम्ही कोणताही विषय प्रतिष्ठेचा केलेला नाही

    आमची चर्चेची तयारी आहे मात्र चर्चा गांभीर्याने व्हावी हि आमची अपेक्षा

    विखे पाटील यांच्या विधानावर अजित नवले यांची प्रतिक्रीया

    मोर्चेकरी प्रतिष्ठेचा विषय करत असल्याच विखे पाटील यांनी केल होत विधान

  • 26 Apr 2023 01:43 PM (IST)

    पुणेकरांची पाणीकपात 15 मे पर्यंत टळली

    पुणे : 15 मे नंतर आढावा घेऊन पुढील निर्णय

    कालवा समिती बैठकीत पाणी नियोजनावर चर्चा

    पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

  • 26 Apr 2023 01:32 PM (IST)

    छत्रपती संभाजीनगर येथील छेडछाड प्रकरण पोलिसांचे स्पष्टीकरण

    छत्रपती संभाजीनगर : तक्रार दाखल करून कारवाई करत आहोत

    ज्या दिवशी घटना घडली तिच्या पालकांनी तक्रार देण्यास नकार दिला

    चार जणांनी छेडछाड करून तिला मारहाण केली

    आज व्हीडीओव्हायरल होत आहे

    आम्ही वरिष्ठांच्या परवानगी घेऊन गुन्हा दाखल करत आहोत

    बेगमपुरा पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शिवाजी तावरे यांची माहिती

  • 26 Apr 2023 01:22 PM (IST)

    अधिकारी बदल्यांवरून शेतकरी नेते राजू शेट्टी आक्रमक

    कोल्हापूर : सध्या बदल्यांचा सीजन आहे

    सर्वसामान्यांना किळस यावा अशी या बदल्यात होणाऱ्या आर्थिक व्यवहाराची चर्चा आहे

    पैसे देऊन पोस्टिंग घेणारा माणूस वसूल करायचा प्रयत्न करतोय

    पैसे देऊन आलेला माणूस सामान्यांना वेठीस धरतोय

    बदलीसाठी एक रुपयाही देणार नाही, असा कणखरपणा अधिकाऱ्यानी दाखवला पाहिजे

    सवय लोकप्रतिनिधींनी लावलेली आहे, त्यामुळे साफसफाई ची सुरुवात त्यांच्यापासूनच सुरू झाली पाहिजे

  • 26 Apr 2023 01:12 PM (IST)

    गडचिरोलीत पोलीस भरती प्रकरणी सात जणांना अटक

    गडचिरोली : बोगस कागदपत्रे तयार करून पोलीस भर्तीत प्रवेश मिळवणाऱ्या प्रकरणात एकूण सात जणांना अटक आज काही आरोपींना अटक करण्यात आली

    तीन आरोपींना बीड जिल्ह्यातुन अटक करून गुन्हे शाखेने गडचिरोलीत चार दिवसापूर्वी पोलीस मुख्यालय गडचिरोली येथे आणले होते

    पोलीस भरतीतील उमेदवारासह एका वनरक्षकालाही पोलीस विभागाने आज अटक केली

    बीड जिल्ह्यातील उमेदवारांनी गडचिरोली जिल्ह्यात पोलीस भरती प्रक्रिया पूर्ण केली होती

    प्रकल्पग्रस्ताचे खोटे दाखले देऊन पोलीस भरतीत प्रवेश घेतला

    खोटे दाखले सादर केल्याचे निष्पन्न झाल्यानंतर या उमेदवारांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते

    यातील काही आरोपींना आज अटक करण्यात आली

    पुढील तपास गडचिरोली गुन्हे शाखेचे अधिकारी करीत आहेत

  • 26 Apr 2023 01:03 PM (IST)

    बाजार समिती निवडणुकीत भाजपची राष्ट्रवादी आणि काँग्रेस सोबत युती

    चंद्रपूरमध्ये 28 आणि 30 एप्रिल रोजी बाजार समितीसाठी निवडणुक होत आहेत.

    12 बाजार समितीच्या प्रत्येकी 18 अशा 216 संचालक पदांसाठी 476 उमेदवार रिंगणात आहेत.

    747 ग्रामपंचायतींच्या सदस्यांसह एकूण 13197 मतदार निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

    बाजार समित्यांच्या या निवडणुकीत भाजप विरुद्ध काँग्रेस अशी लढत होण्याची शक्यता आहे.

    भद्रावती बाजार समितीत भाजपने उमेदवारच दिला नाही.

    मुल बाजार समितीत केवळ दोन पक्ष समर्थीत उमेदवार रिंगणात आहेत.

    ब्रम्हपुरीत राष्ट्रवादी, काँग्रेस आणि भाजप युती अस्तिवात आली आहे.

  • 26 Apr 2023 01:02 PM (IST)

    गोंदिया जिल्ह्यात अपघातांची संख्या वाढली

    गोंदिया : जिल्ह्यात आता पर्यंत 309 अपघात.....

    अपघात 185 लोकांनी गमावले आपले प्राण....

    गंभीर जखमी मध्ये 219 लोकांचा समावेश...

    मागील अनेक वर्ष पासून अपघातात सतत वाढ होत आहे.....

    जिल्ह्यात 8 ठिकाणी ब्लॅक स्पॉट (अपघात स्थळ)....

    अनेक अपघात विरुद्ध दिशेने वाहन चालविल्या मुळे...

  • 26 Apr 2023 12:58 PM (IST)

    चंद्रकांत पाटील यांच्या प्रश्नानंतर अजित पवारांसंदर्भाच चर्चा रंगली

    पुण्यात अजित पवार आणि चंद्रकांत पाटील एका बैठकीच्या निमित्ताने एकत्र आले. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी बैठकीपूर्वीच चांगली फटकेबाजी केली. त्यानंतर भारती विद्यापीठामधील कार्यक्रमात राजकीय टोलेबाजी केली...सविस्तर वाचा

  • 26 Apr 2023 12:46 PM (IST)

    अजितदादा आलेत का पुन्हा गायब झाले ? चंद्रकांत पाटील यांचा टोला

    पुणे येथील सर्किट हाऊसमध्ये कालवा समितीची बैठक पालकमंत्री पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बोलवण्यात आली होती.

    विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार हे ही या बैठकीला उपस्थित रहाणार होते.

    या बैठकीआधी चंद्रकांत पाटील सर्किट हाऊस ठिकाणी पोहोचले.

    गाडीतून उतरताच त्यांनी कार्यकर्त्यांना अजित दादा आले आहेत का की आज देखील गायब झाले असा टोला लगावला.

    मात्र, त्यांच्या या प्रश्नामुळे कार्यकर्ते आणि अधिकारी अवाक् झालेले पहायला मिळाले.

  • 26 Apr 2023 12:40 PM (IST)

    कोटुंबिक वादातून लहान भावाने केली मोठ्या भावाची हत्या

    सांगलीच्या कुपवाड येथील जुना मिरज रोडवरील महादेव मंदिर परिसरात लहान भावाने मोठ्या भावाची हत्या केल्याची घटना घडलीय.

    अनिल बाबाजी शिंदे असे मोठ्या भावाचे नाव असून तो व्यवसायाने डॉक्टर होता.

    त्याचा लहान भाऊ संपत बाबाजी शिंदे याच्याबरोबर कौटुंबिक वाद होता.

    या वादातूनच संपत याने डॉक्टर अनिल याच्यावर खुरप्याने हल्ला करून त्याचा खून केला.

    या प्रकरणी कुपवाड एमआयडीसी पोलिसांनी संशयित लहान भाऊ संपत बाबाजी शिंदे याला ताब्यात घेतले आहे.

  • 26 Apr 2023 12:24 PM (IST)

    स्व. पतंगराव कदम यांच्या भारती विद्यापीठात चंद्रकांत पाटील यांची तुफान फटकेबाजी

    - क्रॉस पार्टी रिलेशन अलीकडच्या काळात खूप अवघडं झाले आहे.

    - दुसऱ्या पार्टीचा माणूस म्हणजे दुश्मन आहे असे आजकाल राजकारणी वागत आहेत.

    - आज असे काही राजकारणी आहेत की ते लोकांनी उभे केलेल्या संस्था ताब्यात घेऊन शिक्षण महर्षी झाले.

    - मात्र, पतंगराव कदम यांनी शुन्यातून संस्था उभ्या केल्या.

    - पतंगराव कदम यांचं क्रॉस पार्टी रिलेशन चांगलं होते.

  • 26 Apr 2023 12:01 PM (IST)

    आमदार संतोष बांगर पोहोचले थेट शेतकऱ्यांच्या बांधावर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले प्रशासनाला आदेश

    हिंगोली येथे अवकाळी पावसाच्या तडाख्यात शेतकऱ्यांच्या नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे लवकरात लवकर करून त्यांना तातडीने मदत देण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

    आमदार संतोष बांगर यांनी कळमनुरी तालुक्यातील डोगरकडा शिवारातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नुकसान झालेल्या पिकांची माहिती दिली.

    यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केळी बागेचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदतीचे आश्वासन दिले.

    तसेच, मुख्यमंत्री शिंदे यांनी पंचनामे करण्याचे प्रशासनाने लवकरात लवकर नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले.

  • 26 Apr 2023 11:44 AM (IST)

    व्हाट्सअप नवं कोरं दमदार फिचर

    एकाच नंबरवरुन अनेक ठिकाणी वापरता येईल

    4 डिव्हाईसमध्ये चालवा WhatsApp

    मोबाईल बंद पडला तरी आता नाही टेन्शन

    असा करा या नवीन फिचरचा वापर, वाचा सविस्तर 

  • 26 Apr 2023 11:12 AM (IST)

    देशाला एका उत्तम गृहमंत्र्यांची गरज - संजय राऊत

    देशाला एका उत्तम गृहमंत्र्यांची गरज - संजय राऊत यांचे वक्तव्य

    अमित शाह देशाचे गृहमंत्री कमी, भाजप नेते जास्त

    देशाला नि:पक्षपाती गृहमंत्र्यांची गरज आहे

  • 26 Apr 2023 11:00 AM (IST)

    आज पुण्यात आजी माजी पालकमंत्री बैठकीत येणार एकत्र

    कालवा समितीच्या बैठकीला अजित पवार राहणार उपस्थित

    पुणेकरांच्या पाणी प्रश्नावर आज निर्णय

    पुण्याला उन्हाळ्यात सुरळीत पाणीपुरवठा होणार की कपात ?

    चंद्रकांत पाटील आणि अजित पवार बैठकीत एकत्र येणार

  • 26 Apr 2023 10:58 AM (IST)

    मुंबई आणि परिसरात गुरूवारी अवकाळी पावसाची शक्यता

    मुंबई व आसपासच्या परिसरात गुरूवारी अवकाळी पाऊस पडू शकतो.

    हवामान विभागाने अंदाज वर्तवला आहे

  • 26 Apr 2023 10:53 AM (IST)

    नाशिक शहरातील सिडको परिसरात युवकाची हत्या

    सावता नगर परिसरात आपसातील वादातून हत्या झाल्याची शक्यता

    गँगवॉरच्या वर्चस्वावरून हत्या झाल्याचा संशय

    गेल्याच आठवड्यात भाजप पदाधिकाऱ्यावर झाला होता गोळीबार

    या घटनेशी संबंध आहे का याचा देखील पोलिसांकडून तपास सुरू

  • 26 Apr 2023 10:48 AM (IST)

    अजितदादाच भावी मुख्यमंत्री... नागपुरात बॅनरबाजी; आता चर्चा होणारच

    अजित पवार यांच्यासाठी नागपूरच्या लक्ष्मी भवन चौकात अनेक बॅनर लावण्यात आले आहेत..

    वचनाचा पक्का, हुकूमाचा एक्का, मुख्यमंत्रीपदासाठी अजितदादाच पक्का...!

    काल अजित पवारांच्या सासुरवाडीत मुख्यमंत्रीपदासाठी साकडं, आज उपराजधानीत बॅनरबाजी; संकेत काय?

  • 26 Apr 2023 10:43 AM (IST)

    खारघरमधील उष्माघाताचा आणखी एक बळी

    खारघरमधील उष्माघाताचा आणखी एक बळी

    मुरबाडमधील श्री सदस्याचा उपचारांदरम्यान मृत्यू

    खारघर घटनेनंतर आठवडाभर सुरू होते उपचार

    खारघरच्या मृतांमध्ये समावेश करता येणार नाही - तहसीलदारांची भूमिका

  • 26 Apr 2023 10:36 AM (IST)

    गारपीटीमुळे नागपूर जिल्ह्यातील हिंगणा तालुक्यात 12 हजार कोंबड्यांचा मृत्यू

    काल रात्री झालेल्या गारपीटीमुळे कोंबड्यांचा मृत्यू

    एक लाख १२ हजार रुपयांचे शेतकऱ्याचं नुकसान

    पोल्ट्री उद्योजकाची नुकसान भरपाईची मागणी

  • 26 Apr 2023 10:31 AM (IST)

    अजितदादाच भावी मुख्यमंत्री... नागपुरात बॅनरबाजी; आता चर्चा होणारच

    अजित पवार यांच्यासाठी नागपूरमध्ये अनेक बॅनर लावण्यात आले आहेत..

    वचनाचा पक्का, हुकूमाचा एक्का, मुख्यमंत्रीपदासाठी अजितदादाच पक्का...

    काल अजित पवारांच्या सासुरवाडीत मुख्यमंत्रीपदासाठी साकडं, आज उपराजधानीत बॅनरबाजी; संकेत काय?

  • 26 Apr 2023 10:26 AM (IST)

    चहा-कॉपी आणि मीठ विक्रीतून रचला इतिहास

    या किरकोळ सामानातून कमाविला इतक्या कोटींचा निव्वळ नफा

    गुंतवणूकदारांना पण देणार नफ्यातील हिस्सा

    टाटा कन्झ्युमरने इतके टक्के लाभांश केला जाहीर

    गेल्या वर्षातील तिमाहीपेक्षा सर्व रेकॉर्ड तोडले, वाचा बातमी 

  • 26 Apr 2023 10:24 AM (IST)

    नवी दिल्लीत मथुरा रोड वरच्या डीपीएस स्कूलमध्ये बॉम्ब असल्याचा मेल

    राजधानी दिल्लीतील मथुरा रोड वरच्या डीपीएस स्कूलमध्ये बॉम्ब असल्याचा मेल

    प्रशासनाला मेल आल्याने मोठी खळबळ

    बॉम्ब शोधक पथक आणि पोलीस शाळेत दाखल

    शाळेतून विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यात आल्याची माहिती

    यापूर्वीही एका शाळेत बॉम्ब ठेवल्याचा मेल प्रशासनाला आला होता

  • 26 Apr 2023 10:10 AM (IST)

    शिवसेना नेते संजय राऊतांची आज भाजप आमदार राहुल कुल यांच्या मतदारसंघात जाहीर सभा

    शिवसेना नेते संजय राऊतांची आज भाजप आमदार राहुल कुल यांच्या मतदारसंघात जाहीर सभा होणार आहे

    दौंड तालुक्यातील वरवंडमध्ये संध्याकाळी 5 वाजता जाहीर सभा होईल

    राहुल कुल यांच्या भीमा पाटस कारखान्यात भष्ट्राचार झाल्याचा संजय राऊतांनी केला होता आरोप

  • 26 Apr 2023 10:06 AM (IST)

    प्रकाश सिंग बादल यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज चंदीगड येथे जाणार

    सूत्रांच्या माहितीनुसार, पंजाबचे माजी मुख्यमंत्री यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दुपारी चंदीगड येथे जाणार आहे.

    आज सकाळी 10 ते दुपारी 12 वाजेपर्यंत शिरोमणी अकाली दलाच्या कार्यालयात बादल यांचं पार्थिव ठेवलं जाणार

    प्रकाश सिंग बादल यांचं काल रात्री साडे आठ वाजता झालं होतं निधन, ते 95 वर्षाचे होते

  • 26 Apr 2023 10:01 AM (IST)

    उद्धव ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत बारसूच्या दिशेने रवाना

    रत्नागिरी- उद्धव ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत बारसूच्या दिशेने रवाना

    थोड्याच वेळात रिफायनरी विरोधकांची साधणार संवाद

    विनायक राऊत यांच्यासोबत शिवसेनेचे संपर्कप्रमुख सुधीर मोरे

    बारसू भागात 144 कलम लागू असल्याने मोजक्याच कार्यकर्त्यांना घेऊन ग्रामस्थांना भेटण्याची पोलीस देऊ शकतात

  • 26 Apr 2023 09:55 AM (IST)

    वाशिम जिल्ह्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस

    वाशिम जिल्ह्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस व गारपिटीने झोडपून टाकलं आहे. वाशिम, मंगरुळपिर कारंजा,मानोरा तालुक्यात वादळी वाऱ्यासह अनेक ठिकाणी जोरदार गारपीट आणि मुसळधार पाऊस झाला. यामुळे टमाटर, गहू,ज्वारी, भाजीपाला पिकांचे आणि आंब्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.

  • 26 Apr 2023 09:51 AM (IST)

    तापमानातून दिलासा मिळणार

    राज्यातील तापमानाचा पार सध्या थोडा कमी झाला आहे. परंतु मे महिन्यात तापमान एप्रिलसारखे वाढणार का? याची चिंता नागरिकांना आहे. सध्या तरी एप्रिलचा शेवटचा आठवडा दिलासा देणार असणार आहे....सविस्तर वाचा

  • 26 Apr 2023 09:45 AM (IST)

    शाळेत बॉम्ब असल्याचा मेल

    नवी दिल्लीत मथुरा रोडवरच्या डी पी एस स्कूलमध्ये बॉम्ब असल्याचा मेल

    प्रशासनाला आल्याने मोठी खळबळ

    बॉम्ब शोधक पथक आणि पोलीस शाळेत दाखल

    शाळेतून विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यात आल्याची माहिती

  • 26 Apr 2023 09:33 AM (IST)

    जालन्यात कडबा महागला

    जालना जिल्ह्यात ज्वारीची पेरणी यावर्षी कमी झाली आणि, त्यामुळे आता जनावरांचे खाद्य कडब्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. ज्वारीची पेंढी सध्या 25 ते 30 रुपये दराने विक्री होत आहे, पेंढ्याचे भाव वाढल्याने शेतकऱ्यांना याचा आर्थिक फटका बसत आहे.

  • 26 Apr 2023 09:32 AM (IST)

    आज सोन्यात किंचित दरवाढ

    एक किलो चांदीचा भाव 76,700 रुपये

    सोने-चांदीत आठवडाभरापासून शांतता

    सकाळच्या सत्रात किंमती किंचित वधारल्या

    गेल्या दहा दिवसांत सोने-चांदी स्वस्त

    गेल्या 11 वर्षांत भाव झाला दुप्पट, वाचा सविस्तर 

  • 26 Apr 2023 09:22 AM (IST)

    आजपासून लाल वादळ रस्त्यावर

    शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आजपासून लाल वादळ पुन्हा रस्त्यावर रस्त्यावर उतरणार आहे. किसान सभेच्या वतीने अकोले ते लोणी असा लाँगमार्च काढण्यात येतोय. दुपारी ३ वाजेपर्यंत मोर्चाचे लोणीच्या दिशेने प्रस्थान होणार असले तरी सकाळपासूनच राज्यातील विविध भागातून शेतकरी आणि आदिवासी बांधव अकोले येथे जमण्यास सुरुवात झालीये. तीन दिवसात हा लाँगमार्च लोणी येथे पोहचणार असून महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या कार्यलयावर धडकणार आहे.

  • 26 Apr 2023 09:13 AM (IST)

    अजित पवार, चंद्रकांत पाटील एकत्र

    आज पुण्यात आजी माजी पालकमंत्री बैठकीत येणार एकत्र

    कालवा समितीच्या बैठकीला अजित पवार राहणार उपस्थित

    पुणेकरांच्या पाणी प्रश्नावर आज निर्णय

    पुण्याला उन्हाळ्यात सुरळीत पाणीपुरवठा होणार की कपात ?

    चंद्रकांत पाटील आणि अजित पवार बैठकीत एकत्र येणार

  • 26 Apr 2023 09:02 AM (IST)

    प्राध्यपकाचा विद्यार्थीनीवर अत्याचार

    डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील नाट्यशास्त्र विभागातील प्राध्यापकाने मुलगा पाहिजे म्हणत विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करत अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. विशेष म्हणजे याविषयी त्याच्या पत्नीने देखील तिला हे सर्व मान्य असल्याचे सांगितले. याप्रकरणी विद्यार्थिनीने दिलेल्या फिर्यादीवरून प्राध्यापक डॉ. अशोक गुराप्पा बंडगर आणि पत्नी पल्लवी अशोक बंडगर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

  • 26 Apr 2023 08:53 AM (IST)

    Entertainment News Live | तब्बल इतक्या वर्षांनंतर ऐश्वर्याने 'हम दिल दे चुके सनम'बद्दल सोडलं मौन

    'पोन्नियिन सेल्वन 2'च्या प्रमोशनदरम्यान ऐश्वर्या 'हम दिल दे चुके सनम' चित्रपटाबद्दल झाली व्यक्त

    चित्रपटात साकारलेल्या नंदिनीच्या भूमिकेविषयी ऐश्वर्याने सोडलं मौन, वाचा सविस्तर..

  • 26 Apr 2023 08:52 AM (IST)

    राज्यात रायगडमध्ये सर्वात स्वस्त पेट्रोल-डिझेल

    जालना, परभणी, नांदेड, यवतमाळ, रत्नागिरीत महागले

    या शहरात इंधन सर्वात महागडे

    या शहरा खालोखाल इतर ठिकाणी भावाची काय स्थिती

    जवळच्या पेट्रोल पंपावरील इंधनाचा भाव घ्या जाणून

    भाव जाणून घ्या एका एसएमएसवर, बातमी एका क्लिकवर

  • 26 Apr 2023 08:35 AM (IST)

    चंद्रपूर | कोळसा खाणीत कामावर असताना वीज कोसळून कंत्राटी कामगाराचा मृत्यू

    कामगारावर वीज कोसळतानाचे दृश्य CCTV कॅमेरात कैद

    बाबुधनकुमार यादव असे मृत कामगाराचे नाव

    वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या भद्रावती तालुक्यातील माजरी कोळसा खाणीत काम करतानाची घटना

    या भागात विजांच्या कडकडाटासह झाला अवकाळी पाऊस

    याच दरम्यान वीज पडून कंत्राटी कामगाराचा झाला दुर्दैवी मृत्यू

  • 26 Apr 2023 08:29 AM (IST)

    नाशिक - शहरातील सिडको परिसरात युवकाची हत्या

    सावता नगर परिसरात आपसातील वादातून हत्या झाल्याची शक्यता

    गँगवॉरच्या वर्चस्वावरून हत्या झाल्याचा संशय

    गेल्याच आठवड्यात भाजप पदाधिकाऱ्यावर झाला होता गोळीबार

    या घटनेशी संबंध आहे का याचा देखील पोलिसांकडून तपास सुरू

  • 26 Apr 2023 08:16 AM (IST)

    मुळा मुठा नदी संवर्धन प्रकल्पात काढल्या जाणाऱ्या झाडांच्या बदल्यात महापालिका 65 हजार झाडं लावणार

    साबरमती नदीच्या धर्तीवर मुळा मुठा नदीचा प्रकल्प सुरू करण्यात येतोय

    या प्रकल्पात येणाऱ्या दुर्मिळ 3 हजार झाडांचं जतन करणार

    महापालिकेनं केलं स्पष्ट

    6 हजार झाडांची तोड होणार म्हणून पर्यावरणप्रेमींनी घेतला आक्रमक पवित्रा

  • 26 Apr 2023 08:09 AM (IST)

    कोल्हापूर | कळंबा मध्यवर्ती कारागृहात सुरक्षेचे तीनतेरा

    सलग तीन दिवस सापडले मोबाईल

    तीन दिवसांत सहा मोबाईल, चार्जर आणि बॅटरी सापडल्या

    मंगळवारी सायंकाळी कारागृहातील क्वारंटाईन सेंटरसमोर सापडले मोबाईल असलेले पार्सल

    नारळाच्या आकाराच्या पार्सलमध्ये लपवले होते मोबाईल

  • 26 Apr 2023 08:04 AM (IST)

    भंडारा | अवकाळी पावसामुळे लाल मिरचीचे प्रचंड नुकसान

    बदलत्या वातावरणाचा फटका मिरचीला, दरात वाढ

    यंदा लाल मिरची खाणार भाव

    बाजारपेठेत मागणी मात्र उत्पादनात घट

    अवकाळीमुळे लाल मिरचीला लागली बुरशी

  • 26 Apr 2023 07:56 AM (IST)

    संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज आषाढीवारी पालखीचे 2 जून रोजी दुपारी 2 वाजता होणार पंढरपूरकडे प्रस्थान

    यंदाच्या वर्षी एक दिवस अगोदर होणार पालखीचे प्रस्थान

    पहिल्यांदाच त्र्यंबकेश्वर येथेच प्रयाग तीर्थाजवळील महानिर्वाणी आखाड्यात सदगुरू श्रीगहिनीनाथ महाराजांच्या समाधीस्थानी निवृत्तीनाथ महाराज पालखी करणार मुक्काम

    संत निवृत्तीनाथ महाराजांच्या जयंतीचे हे 750वे वर्ष

    भाविकांच्या सोयी सुविधेसाठी, आरोग्यासाठी होणार वेगवेगळ्या समित्यांची स्थापना

    पालखी सोहळा निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी विश्वस्त मंडळ प्रयत्नशील असल्याची संत निवृत्तीनाथ महाराज समाधी संस्थानच्या अध्यक्षांची ग्वाही

  • 26 Apr 2023 07:36 AM (IST)

    कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक

    - नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी मतदान केंद्रे निश्चित.

    - सहकारी संस्थांच्या मतदानासाठी 6 कक्ष तर ग्रामपंचायत मतदार संघासाठी 7 कक्ष याप्रमाणे एकूण 7 मतदान केंद्रे निश्चित.

    - 28 एप्रिल रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 4 या कालावधीत होणार मतदान.

    - 29 एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात महसूल संघटनेच्या सभागृहात होणार मतमोजणी.

    - एकूण 110 सहकारी संस्था आणि 223 ग्रामपंचायत संख्या.

  • 26 Apr 2023 07:35 AM (IST)

    वायुप्रदूषणावर उपाययोजना करा

    पुणे - वैकुंठ स्मशानभूमीच्या परिसरात होणाऱ्या वायुप्रदूषणावर उपाययोजना करा

    पालकमंत्री चंद्रकांत पाटलांच्या महापालिका प्रशासनाला सूचना

    शव दहन करण्यासाठी लाकडाऐवजी विद्यूत दाहीनीचा वापर वाढवा पालकमंत्र्यांच्या सूचना

    स्मशानभूमी परिसरात राहणाऱ्या नागरिकांच्या वायू प्रदूषणाच्या तक्रारी आहेत

    यासाठी चंद्रकांत पाटलांनी अधिकाऱ्यांची बैठक घेतं यावर उपाययोजना करा अशा सूचना दिल्या आहेत.

  • 26 Apr 2023 07:34 AM (IST)

    बिल्डर्सचे 3333 कोटींचे बेहिशोबी व्यवहार उघड

    - नाशिकमध्ये आयकर विभागाच्या छाप्यात बिल्डर्सचे 3333 कोटींचे बेहिशोबी व्यवहार उघड.

    - सलग 6 दिवस सुरू होती कारवाई.

    - नाशिकमध्ये झाली राज्यातील सर्वात मोठी कारवाई

    - बेहिशोबी मालमत्तेत राज्यातील बडे अधिकारी, व्यापारी आणि राजकीय नेते

    - जवळपास दीड हजार अधिकारी आणि राजकीय नेत्यांनी केली संबंधित बिल्डरांकडे गुंतवणूक

  • 26 Apr 2023 07:29 AM (IST)

    ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत बारसूत जाणार, आंदोलकांची भेट घेणार

    सकाळी 11.30 वाजता विनायक राऊत आंदोलकांची भेट घेणार

    पोलीस बंदोबस्तात बारसूत माती परीक्षण होणार आहे, त्याला स्थानिकांनी विरोध केला आहे.

  • 26 Apr 2023 07:28 AM (IST)

    नाशिक पाणी टंचाई

    - नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात पाणी टंचाईच्या झळा तीव्र

    - पाच तालुक्यांतील 47 हजार नागरिकांना पाणीपुरवठा सुरू

    - 21 टँकरद्वारे नागरिकांची भागवली जात आहे तहान

    - मे महिन्यात टँकरमध्ये आणखी वाढ होण्याची भीती

  • 26 Apr 2023 07:26 AM (IST)

    नाशिक मनपाची 'अभय योजना'

    - नाशिक शहरात 45 दिवसांत अनधिकृत नळ कनेक्शन होणार अधिकृत

    - 1 मे पासून 15 जूनपर्यंत राबवली जाणार मोहीम

    - अनधिकृत नळ कनेक्शन नियमित करण्यासाठी मनपाची 'अभय योजना'

    - 1800 रुपये दंडात्मक शुल्क भरून नळ कनेक्शन करता येणार नियमित

    - 15 जूननंतर थेट गुन्हे दाखल करण्याचा इशारा

  • 26 Apr 2023 07:18 AM (IST)

    छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीपूर्वी विकास आराखड्याचं काम सुरू होणार

    269 कोटींच्या कामाची निविदा काढण्यात आली आहे

    राज्य सरकारने निधीला मंजूरी दिली आहे

    14 मे पुर्वी काम सुरू करण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न आहेत

    यंदा शंभूसोहळा तुळापूर या ठिकाणी पार पडणार आहे

    सरकारने छत्रपती संभाजी महाराज स्मारक आराखड्याला मंजुरी दिली आहे

  • 26 Apr 2023 07:17 AM (IST)

    पुण्यात आयोजित रोलबॉल स्पर्धेत विदेशी पाहुण्यांनी जय श्नीराम गाण्यावर धरला ठेका

    स्पर्धेच्या उद्घाटन पालकमंत्री चंद्रकांत पाटलांच्या हस्ते करण्यात आलं

    यावेळी जय श्नीराम गाण्यावर मनमुराद नाचण्याचा आनंद लुटला

  • 26 Apr 2023 07:15 AM (IST)

    आजपासून लाल वादळ पुन्हा रस्त्यावर, किसान सभेचा अकोले ते लोणी लॉंगमार्च

    वनजमीन, गायरान जमीन, तळ जमीन नावावर करा

    दुधाला एमएसपी द्यावी विविध मागण्यांसाठी आज दुपारी निघणार मोर्चा

    दुपारी 3 वाजता अकोले शहरातून होणार मार्चला सुरूवात

    महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या लोणी येथील कार्यालयाकडे मोर्चाचे होणार प्रस्थान

    तीन दिवस चालणार हजारो शेतकरी आणि आदिवासी बांधव

    तीन दिवसात मागण्या मान्य न झाल्यास मोर्चेकऱ्यांचा महसूलमंत्र्यांच्या गावात महामुक्काम

  • 26 Apr 2023 07:13 AM (IST)

    अमरावती शहरातील तबल 274 जाहिरात होर्डिंग धोकादायक

    महानगरपालिकेची नोटीस बजावण्याची तयारी, मनपा आयुक्तांच्या परवानगीची प्रतिक्षा

    पुण्यात होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेमूळे मनपा ऍक्शन मोडवर

    जाहिरातीचे होर्डिंग असलेल्या संबंधित एजन्सीला मनपाने स्ट्रक्चरल स्ट्रक्चर झाल्याचे प्रमाणपत्र सादर करण्यास सांगितले

    सात दिवसाच्या आत प्रमाणपत्र सादर न केल्यास होऊ शकते कारवाई

    अनेक होर्डिंग वादळी वाऱ्यामुळे कोसळण्याची शक्यता

  • 26 Apr 2023 07:10 AM (IST)

    पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाश सिंग बादल यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार, दोन दिवसांचा राष्ट्रीय शोक जाहीर

    बठिंडा येथील बादल गावात प्रकाश सिंग बादल यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार

    आज सकाळी 10 ते दुपारी 12 वाजेपर्यंत शिरोमणी अकाली दलाच्या कार्यालयात बादल यांचं पार्थिव ठेवलं जाणार

    प्रकाश सिंग बादल यांचं काल रात्री साडे आठ वाजता झालं होतं निधन, ते 95 वर्षाचे होते

Published On - Apr 26,2023 7:07 AM

Follow us
मतदान करायला गेले पण ईव्हीएममध्ये कमळाचं चिन्ह नसल्यानं आजोबा संतप्त
मतदान करायला गेले पण ईव्हीएममध्ये कमळाचं चिन्ह नसल्यानं आजोबा संतप्त.
दत्तात्रय भरणे यांचा शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ व्हायरल, पाहा व्हिडीओ
दत्तात्रय भरणे यांचा शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ व्हायरल, पाहा व्हिडीओ.
'सुनेत्रा पवार यांची दया येते, अजित पवारांनी त्यांचा बळीचा बकरा केला'
'सुनेत्रा पवार यांची दया येते, अजित पवारांनी त्यांचा बळीचा बकरा केला'.
मतदान केलं अन् सुप्रिया सुळे तडकाफडकी अजित पवारांच्या घरी, कारण काय?
मतदान केलं अन् सुप्रिया सुळे तडकाफडकी अजित पवारांच्या घरी, कारण काय?.
उमेदवारी न दिल्याने नाराजी? उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत नॉटरिचेबल
उमेदवारी न दिल्याने नाराजी? उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत नॉटरिचेबल.
कुटुंबियांची साथ नाही? दादांचं विरोधकांना उत्तर; म्हणाले, मेरी माँ...
कुटुंबियांची साथ नाही? दादांचं विरोधकांना उत्तर; म्हणाले, मेरी माँ....
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बजावला मतदानाचा हक्क, कुठं केलं मतदान?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बजावला मतदानाचा हक्क, कुठं केलं मतदान?.
महाराष्ट्रात 3 ऱ्या टप्प्यातील मतदान, राज्यात या 11 हायव्होल्टेज जागा
महाराष्ट्रात 3 ऱ्या टप्प्यातील मतदान, राज्यात या 11 हायव्होल्टेज जागा.
भावूक, भावकीनंतर मडकं अन् मिमिक्रीमुळे बारामतीच्या प्रचार सभा चर्चेत
भावूक, भावकीनंतर मडकं अन् मिमिक्रीमुळे बारामतीच्या प्रचार सभा चर्चेत.
मृत्यूचा संकेत मडक्यातून... दादांच्या कार्यकर्त्यांना मडकं का फोडलं?
मृत्यूचा संकेत मडक्यातून... दादांच्या कार्यकर्त्यांना मडकं का फोडलं?.