AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

| Updated on: Dec 26, 2022 | 6:28 AM
Share

Maharashtra Pune Bandh Live Update in Marathi : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, वाचा एका क्लिकवर...

Maharashtra LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी
Maharashtra LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडीImage Credit source: tv9 marathi

मुंबई: भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांच्यावर पुण्यातील रुबी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. दिशा सालियन प्रकरणाची कधीच चौकशी केली नसल्याचा सीबीआयने दावा केला आहे. त्यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वातील भारत जोडो यात्रा दिल्लीच्या लाल किल्ल्यावर पोहोचली. राहुल गांधी आज राजघाटावर जाऊन महात्मा गांधींच्या समाधीचं दर्शन घेणार. त्यानंतर पंडित नेहरू, इंदिरा गांधी आणि अटलबिहारी वाजपेयी यांच्या समाधीचंही दर्शन घेणार. या मोठ्या बातम्यांसह महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या न्यायालयीन लढ्याच्या अपडेट्ससह राज्यातील इतरही महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आणि ताज्या बातम्यांचा आढावा लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून घेणार आहोत.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 25 Dec 2022 06:25 PM (IST)

    पुण्यातील लोणावळ्यात वाहतूक कोंडी

    लोणावळ्यात गेल्या दोन तासांपासून वाहतूक कोंडी जैसे-थै

    बेशिस्त वाहनचालकांमुळे मोठी वाहतूक कोंडी

    स्थानिकही कोंडी फोडण्याचा प्रयत्न करताहेत

    लोणावळा ग्रामीण पोलीस वाहतूक कोंडी सोडवणार केव्हा?

  • 25 Dec 2022 04:38 PM (IST)

    शासकीय कार्यालयात मास्कबंदी होणार?

    राज्यात सर्व शासकीय कार्यालयात मास्कसक्ती होणार असल्याची माहिती

    मुंबई, नागपूर , पुणे , औरंगाबाद यांसारख्या महत्त्वाच्या शहरांमध्ये मास्कबंदी

    सरकारी कार्यालयामध्ये मास वापर बंधनकारक होणार असल्याची माहिती

    चीनमध्ये कोवीडचा वाढत असल्याने राज्य सरकार कोविडबाबत ठोस पावले उचलण्याच्या तयारीत

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याबाबत महत्वाची घोषणा करण्याची शक्यता

  • 25 Dec 2022 04:36 PM (IST)

    पुण्यात सरकारी वाहनांचीच डिझेल चोरी

    पुण्यातील सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयातील धक्कादायक घटना

    कचरा डेपोच्या बाजूला सर्रास होत आहे सरकारी वाहनातून डिझेल चोरी

    अधिकाऱ्याच्या संगनमताने प्रकार चालू असल्याची स्थानिकांची माहिती

    सविस्तर चौकशी करण्याचे पुणे महानगरपालिकेचे आदेश

  • 25 Dec 2022 11:55 AM (IST)

    मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर कसबा विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीची चर्चा सुरू

    मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर कसब्यात भाजपचा कोण उमेदवार असणार?

    निवडणूक बिनविरोध करण्याची भाजपची मागणी

    घरातील उमेदवार दिला तरच निवडणूक बिनविरोध होणार, काँग्रेसचा दावा

    अंधेरी आणि कोल्हापूर पोटनिवडणुकीत भाजपने उमेदवार दिला होता

    त्यामुळे निवडणूक बिनविरोध करण्यासंदर्भात महाविकास आघाडी निर्णय घेणार

    मुक्ता टिळक यांचा मुलगा कुणाल टिळक यांना भाजप उमेदवारी देण्याची शक्यता

  • 25 Dec 2022 11:00 AM (IST)

    उस्मानाबाद: शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या आमरण उपोषणाचा आज 5 वा दिवस

    शिंदे सरकार विरोधात घोषणाबाजी करीत बोंब मारो आंदोलन केले

    उस्मानाबाद शहरातील 30 कोटी रुपयांच्या विकास कामाला शिंदे-फडणवीस सरकारने दिली स्थगिती दिलीय

    स्थगिती उठवण्यासाठी ठाकरे गटाचे उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरु आहे आमरण उपोषण

    प्रशासनाने अद्याप दखल न घेतल्याने शिवसैनिक आक्रमक, आज झोपा काढो आंदोलन करणार

  • 25 Dec 2022 10:05 AM (IST)

    औरंगाबाद शहरात आज महास्वच्छता अभियान

    औरंगाबाद शहरात आज महास्वच्छता अभियान

    केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड स्वच्छता अभियानात सहभागी

    डॉ. भागवत कराड यांनीही हातात झाडू घेऊन केली शहरात साफसफाई

    सिडको परिसरात डॉ. भागवत कराड यांनी केली साफसफाई

  • 25 Dec 2022 09:47 AM (IST)

    कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरामध्ये भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी

    कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरामध्ये भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी

    ख्रिसमस नात्याच्या सुट्टीमुळे अंबाबाई मंदिर मध्ये भाविकांची अलोट गर्दी

    अंबाबाई मंदिरामध्ये येणाऱ्या भाविकांना मास्क घालण्याचे देवस्थान प्रशासनाकडून केले आवाहन

  • 25 Dec 2022 08:59 AM (IST)

    औरंगाबाद जिल्ह्यातील कचनेर इथल्या जैन मंदिरातून सोन्याची मूर्ती चोरीला

    औरंगाबाद जिल्ह्यातील कचनेर इथल्या जैन मंदिरातून सोन्याची मूर्ती चोरीला

    सोन्याच्या मूर्तीच्या जागी दुसरी मूर्ती ठेवून सोन्याची मूर्ती चोरीला गेली

    सोन्याची मूर्ती चोरला गेल्याचा प्रकार शनिवारी दुपारी उघड झाला

    जैन मंदिरातूनच सोन्याची मूर्ती चोरीला गेल्यामुळे खळबळ

    औरंगाबाद जिल्ह्यातील कचनेरजैन मंदिर सर्वात प्रसिद्ध मंदिर

  • 25 Dec 2022 08:42 AM (IST)

    अटलबिहारी वाजपेयी यांची 98वी जयंती

    राष्ट्रपती द्रौपदी मूर्म यांच्याकडून वाजपेयींना अभिवादन

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून वाजपेयींना अभिवादन

    दिल्लीतील अटल समाधी स्थळावर दिग्गज नेत्यांची हजेरी

  • 25 Dec 2022 08:29 AM (IST)

    पुण्यात देहूरोडच्या हद्दीत भाजी विक्री करणाऱ्यांसाठी देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाकडून नवीन दर लागू

    नव्या दराविरोधात भाजी विक्रेते आक्रमक, नवीन दर लागू करू नये, विक्रेत्यांची मागणी

    अगोदर गाळाधारकांना दिवसाला 35 रुपये मोजावे लागायचे आता 50 रुपये द्यावे लागणार आहेत

    तर अनधिकृत दुकानांना अगोदर प्रतिदिवस 35 रुपये होते, आता 2000 रुपये प्रतिमहा द्यावे लागणार आहेत

  • 25 Dec 2022 08:25 AM (IST)

    जिजाऊ जन्मोत्सवासाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना वेळेची विचारणा

    येत्या 12 जानेवारी रोजी सिंदखेडराजा येथे जिजाऊ जन्मोत्सवाचं आयोजन

    जिजाऊ जन्मोत्सव सोहळ्याला उद्धव ठाकरे उपस्थित राहण्याची शक्यता

    सिंदखेडराजा इथे जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त लाखो शिवप्रेमी येत असतात

    यंदा उद्धव ठाकरे उपस्थित राहण्याची शक्यता आहे

  • 25 Dec 2022 08:23 AM (IST)

    मुंबईतील कांदिवली पोलीस वसाहतीत सकाळी 10 वाजेपर्यंत पाणीकपात

    कांदिवली पश्चिम पोलीस वसाहतीत आज सकाळी 10 वाजेपर्यंत पाणी बंद झाल्यामुळे लोक त्रस्त

    मिळालेल्या माहितीनुसार आज सकाळी 10 नंतर या भागात पाणी येणार आहे

  • 25 Dec 2022 07:52 AM (IST)

    माजी पंतप्रधान स्व. अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंती निमित्त अमरावती राज्यस्तरीय अटल दौड हाफ मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन

    3 किलोमीटर 5 किलोमीटर 8 किलोमीटर आणि 21 किलोमीटर पर्यंतच्या शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे

    राज्यभरातील एकूण 1800 पेक्षा अधिक स्पर्धकांनी या मॅरेथॉन मध्ये घेतला सहभाग

    पाच लाख रुपयांच्या बक्षिसांची लयलूट

  • 25 Dec 2022 07:27 AM (IST)

    अजय मोरे पुण्याचे नवीन अतिरिक्त जिल्हाधिकारी

    अजय मोरे पुण्याचे नवीन अतिरिक्त जिल्हाधिकारी

    विजय देशमुख यांची बदली करण्यात आली

    देशमुख यांच्या जागी आता अजय मोरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे

    काल त्यांनी पदभार स्विकारला

  • 25 Dec 2022 07:18 AM (IST)

    भंडाऱ्यात कारागृह बगिच्यात बाटलीतून पोहोचला मोबाईल आणि खर्रा

    मोबाईल आणि खर्राप्रकरणी तीन कैद्यांची चौकशी

    कारागृहाच्या भिंतीजवळून भंडारा- तुमसर रस्ता जात असल्याने त्या रस्त्यावरुन ही बॉटल कुणीतरी फेकली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे

    तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीविरुध्द गुन्हा दाखल

    आता भंडारा पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहेत

  • 25 Dec 2022 06:20 AM (IST)

    पुणे जिल्ह्यातील वेल्हा तालुक्यातील राजगड किल्ला परिसरात लावले फलक

    पर्यटनाबाबत माहिती देणारे आणि दिशा दाखवणारे फलक

    वनविभाग आणि गुंजवणे वन कमिटीने लावले फलक

    रात्रीअपरात्री गडावर येणाऱ्या पर्यटकांना दिशादर्शक फलकांचा होणार फायदा

  • 25 Dec 2022 06:18 AM (IST)

    मुंबईतील पोर्तुगीज चर्चला आकर्षक रोषणाई

    चर्चमध्ये येशू जन्माचा देखावा उभारण्यात आलाय

    मध्यरात्री या चर्चमध्ये दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी होणार आहे

    मुख्य प्रार्थनेनंतर ख्रिस्ती बांधव एकमेकांना केक आणि मिठाई देऊन शुभेच्छा देणार आहेत

  • 25 Dec 2022 06:15 AM (IST)

    मुरुड किनारा फुलला पर्यटकांनी, विकेंडला पर्यटकांची गर्दी

    31 डिसेंबरचे वेध लागल्यामुळे पर्यटक कोकणात दाखल झाले आहेत

    यातच विकेंडमुळे पर्यटक मोठ्या प्रमाणात किनारपट्टीवरती निसर्गाचा मनमुराद आनंद लुटताना दिसत आहेत

    दापोली तालुक्यातील मुरुड समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांची प्रचंड गर्दी

    मुरुड आणि दापोली तालुक्यातील वातावरण पर्यटकांना भुरळ पाडत असतं यामुळेच पर्यटक या भागात मोठ्या संख्येने असतात

  • 25 Dec 2022 06:11 AM (IST)

    अभिनेत्री तुनिषा शर्मा आत्महत्याप्रकरणी अभिनेता शीजान खान याला अटक

    वालीव पोलिसांनी केली शीजान खानला अटक

    तुनिषाची आई वनिता शर्मा यांच्या तक्रारीवरून शीजान खान यांच्या विरोधात वालीव पोलीस ठाण्यात भादंवि 306 अन्वये रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला

Published On - Dec 25,2022 6:07 AM

Follow us
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.