नवरात्री 2026
मंत्र
या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः।।
म्हणजे देवी पृथ्वी, अग्नि, वायू, जल, आकाश या समस्त भूतांमध्ये शक्तीच्या रुपात अस्तित्वात आहे. या शक्तीमुळेच समस्त भूत आणि सकल पदार्थ गतिमान आहेत. त्या परम शक्तीला माझा अनेकवार नमस्कार आहे.
लेख
व्हिडीओ
गॅलरी
Adinath : आनंदाची बातमी! प्राजक्ता माळी आणि आदिनाथ कोठारे आले एकत्र
5 Images
दुर्गा पूजेत आलियाचा गुलाबी साडीतील मोहक लूक पाहून चाहतेही थक्क!
6 Images
हिमेश रेशमियाचा कोट्यवधींचा पेंटहाऊस; प्रायव्हेट कॅफे अन् शाही थाट
6 Images
म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांना झटका! 29 पैकी 22 फंड निगेटिव्ह
6 Images
दसऱ्याच्या मुहूर्तावर सोन्या-चांदीच्या दरात घसरण, आज 10 ग्रॅमसाठी...
5 Images
विजयादशमी मेळाव्यातील डॉ. मोहन भागवतांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे
6 Images
माझ्याकडे पैसेच उरलेले नाहीत,10-12वर्षे जगले तर..अभिनेत्रीने हात पसरले
5 Imagesबातम्या
नवरात्रोत्सव
सनातन परंपरेत शक्तीच्या साधनेसाठी नवरात्रीच्या 9 दिवसाला सर्वाधिक शुभ आणि पुण्यदायी मानलं जातं. नवरात्रीच्या पावन पर्वात देवी दुर्गेची 9 स्वरुपात पूजा केली जाते. हिंदू मान्यतेनुसार नवरात्रीत शक्तीच्या नऊ स्वरुपात शैलपुत्री, माँ ब्रह्मचारिणी, माँ चंद्रघंटा, माँ कुष्मांडा, देवी स्कंद माता, माता कात्यायनी, माँ कालरात्री, देवी महागौरी आणि सिद्धिदात्रींचा समावेश आहे. त्यांची या नऊ दिवसात पूजा केली जाते. त्यांची पूजा केल्याने आयुष्यातील सर्व संकट दूर होतात असं मानलं जातं.
या नऊ दिवसात विधी-विधानानुसार व्रत, जप-तप केलं जातं. त्यामुळे वर्षभर भगवती मातेची कृपा भक्तांवर होते. देवीच्या कृपेने भक्तांना कधी धन धान्याची कमी जाणवत नाही. शारदीय नवरात्रीत दुर्गा पूजेसाठी विशेष मंडप टाकून तिची साधना आणि आराधना केली जाते. पश्चिम बंगालमध्ये हा सर्वात मोठा पर्व मानला जातो. पश्चिम बंगालमध्ये महिषासुरमर्दिनीची विशेष पूजा केली जाते. ढोल वाजत दुर्गा पूजा केली जाते. आरती केली जाते. तर महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये नवरात्रोत्सवात देवी बसवल्या जातात. देवीची नऊ दिवस उपासना करून गरबा खेळला जातो.