Swargate Rape Case : ‘दत्ता गाडेला अटक करायला उशीर झाला, पण..’, पुण्याचे पोलीस आयुक्त स्पष्टच बोलले

Swargate Rape Case : ‘दत्ता गाडेला अटक करायला उशीर झाला, पण..’, पुण्याचे पोलीस आयुक्त स्पष्टच बोलले

| Edited By: | Updated on: Feb 28, 2025 | 12:01 PM

Pune Police Commissioner Press Conference: पुण्याच्या स्वारगेट बसस्थानक अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याला पुणे पोलिसांकडून अटक करण्यात आलेली आहे. त्यानंतर आज पोलीस आयुक्तांनी पत्रकार परिषद घेऊन त्याबद्दल माहिती दिली.

स्वारगेट अत्याचार प्रकरणात एक विशेष पथक तपासासाठी तयार केलं आहे. पुरावे तयार केले जात आहे. स्पेशल कौन्सिलची नियुक्ती होणार आहे. फास्ट ट्रॅकमध्ये खटला चालवणार असल्याची माहिती पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे. स्वारगेट अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याला मध्यरात्री अटक केल्यानंतर आज पत्रकार परिषद घेऊन पोलीस आयुक्तांनी संपूर्ण घटनेबद्दल तपशीलवार माहिती दिली.

पुढे बोलताना अमितेश कुमार म्हणाले की, स्वारगेट पोलीस स्टेशन, क्राईम ब्रांच अंदाजे ५०० पोलीस अधिकारी आणि कर्मचारी या ऑपरेशनमद्ये होते. तीन दिवसापासून. स्थानिक नागरिक ४०० ते ५०० लोकांचं सहकार्य मिळालं. आमचे डॉग स्क्वॉडने वेगवेगळ्या ठिकाणी गेले. उसाच्या शेतं श्वानाने दाखवले होते. ड्रोनचा वापर करून आरोपी ट्रेस झाला होता. या प्रयत्नानतंर काल १ वाजून १० मिनिटाने आरोपीला ताब्यात घेतलं. सकाळी प्रक्रिया पूर्ण करून अटक केली. आता कोर्टात दाखल केलं. महिलांच्या सुरक्षेविषयी एक आढावा घेतला. निर्जनस्थळी, एसटी स्टँड , रेल्वे स्थानक, डार्क स्पॉट, टेकडी स्पॉट, हॉटस्पॉटचे सेफ्टी ऑडिट सुरू आहे. पालिका आणि इतर विभागाशी मिळून डार्क स्पॉटच्या इथे दिवे लावणार आहे. मार्शलकडून निर्जनस्थळी क्यूआरकोड मॅपिंग केली जाणार आहे. आरोपी अटक करण्यात उशीर झाला आहे. तीन दिवस लागले. पहिल्या दिवशी फिर्याद आल्यावर दीड ते दोन तासात वेगवेगळ्या टीम कामाला लागल्या. २३ सीसी कॅमेरे एसटी स्टँडच्या आतील भागातील. ४८ कॅमेरे बाहेरचे तपासले. दीड ते दोन तासाच आरोपीचं नाव निष्पन्न केलं. तांत्रिक पुरावा गोळा केला. त्यात आमचे पथक गुनाट गावात दोनच्या सुमारास पोहोचलं होतं. पूर्ण प्रयत्न करून आरोपी सापडला नाही. काल अखेर पकडला. गावातील नागरिकांनी सहकार्य केलं. आम्ही त्यांचे आभारी आहोत. आम्ही गावात भेट देऊन नागरिकांचा सत्कार करणार आहोत. मदत करणाऱ्या नागरिकांचं अभिनंदन करणार असल्याचंही त्यांनी यावेळी म्हंटलं आहे.

Published on: Feb 28, 2025 12:01 PM