AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune Election Results 2026 LIVE : पुण्याच्या प्रभाग क्रमांक 9, 10 मध्ये पुन्हा भाजपची जादू चालणार? की राष्ट्रवादी गडाला सुरूंग लावणार?

Pune Election Results 2026 LIVE : पुण्याच्या प्रभाग क्रमांक 9 आणि 10 मध्ये गेल्यावेळी भाजपचा दबदबा पहायला मिळाला होता. या दोन्ही प्रभागामधील एकूण सात वार्डमध्ये भाजपचे उमेदवार विजयी झाले होते. तर एका वार्डामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारानं बाजी मारली होती. यावेळी देखील भाजप आपलं हे यश कायम ठेवणार का याबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे.

Pune Election Results 2026 LIVE : पुण्याच्या प्रभाग क्रमांक 9, 10 मध्ये पुन्हा भाजपची जादू चालणार? की राष्ट्रवादी गडाला सुरूंग लावणार?
pune Election Results 2026Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jan 16, 2026 | 2:29 PM
Share

पुणे महापालिकेसाठी 15 जानेवारी रोजी मतदान झालं आहे, या महापालिकेची मुदत संपल्यानंतरही निवडणुका झाल्या नव्हत्या अखेर निवडणुकीला मुहूर्त लागला. 16 जानेवारी रोजी निकाल जाहीर होत आहे. पुणे महापालिकेत गेल्यावेळी भाजपने दणदणीत यश मिळवलं होतं. एकूण 172 जागांपैकी 97 जागांवर भाजपचे उमेदवार विजयी झाले होते. 2017 मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला होता. तर राष्ट्रवादीला देखील चांगला यश मिळालं होतं. राष्ट्रवादीच्या वाट्याला पुण्यात 39 जागा आल्या. काँग्रेस आणि शिवसेनेला म्हणाव असं या महापालिकेत यश मिळालं नाही, शिवसेनेचे दहा तर काँग्रेसचे 9 नगरसेवक या निवडणुकीत निवडून आले. मात्र यावेळी परिस्थिती बदललेली आहे. या वेळी राष्ट्रवादी आणि शिवसेनेत फूट पडल्यामुळे महापालिका निवडणुकीत चुरस पहायला मिळू शकते.

प्रभाग क्रमांक 9 – पुण्याच्या प्रभाग क्रमांक 9 मध्ये पुण्याचा बाणेर बालेवाडी, आणि पाषाण या भागाचा समावेश होतो. या प्रभागात एकूण चार वार्ड असून, गेल्यावेळी या प्रभागात भाजपचाच दबदबा दिसून आला होता, तीन वार्डामध्ये भाजपचे उमेदवार विजयी झाले होते, तर एका वार्डात राष्ट्रवादीच्या उमेदवारानं विजयाचा गुलाल उधळला होता. वार्ड क्रमांक 9 अ मधून भाजपच्या उमेदवार स्वप्नाली सायकर या विजयी झाल्या होत्या, तर ब मधून भाजपच्या उमेदवार ज्योती कलमकर या विजयी झाल्या, क मधून भाजपचे उमेदवार अमोल बालवाडकर यांनी बाजी मारली, तर ड मध्ये मात्र राष्ट्रवादीचे उमेदवार बाबूराव चांडोरे विजयी झाले होते.

पुणे महापालिका निवडणूक निकाल लाईव्ह

प्रभाग क्रमांक 10 – पुण्याच्या प्रभाग क्रमांक दहामध्ये बावधन आणि कोथरूड डेपो या भागाचा समावेश होतो. या प्रभागातील चारही वार्डात गेल्यावेळी भाजपने बाजी मारली होती. प्रभाग क्रमांक 10 अ मधून भाजपचे उमेदवार किरण पाटील हे विजयी झाले होते. प्रभाग क्रमांक ब मधून श्रद्धा प्रभुणे पाठक या विजयी झाल्या होत्या तर क मधून अल्पना गणेश वरपे या विजयी झाल्या आणि ड मध्ये भाजपचेच उमेदवार दिलीप पाटील हे विजयी झाले. दरम्यान याही वेळी भाजपची जादू कायम राहणार का हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

महत्त्वाच्या लिंक्स

महाराष्ट्र निवडणूक निकाल 2026

महाराष्ट्र महापालिका निवडणूक निकाल 2026 मतमोजणीचे लाईव्ह अपडेट्स

बीएमसी महाराष्ट्र निवडणूक निकाल LIVE TV

महाराष्ट्र महानगरपालिकेचा सर्वात वेगवान निकाल पाहा फक्त टीव्ही 9 मराठीवर LIVE

पुणे महापालिका निवडणूक निकाल 2026 LIVE

Follow Us
जय पवार यांची प्रतिक्रिया:निर्णय बारामतीकरांचा, विरोधकांना खुलं आव्हान
जय पवार यांची प्रतिक्रिया:निर्णय बारामतीकरांचा, विरोधकांना खुलं आव्हान.
बारामती पोटनिवडणुकीत ठाकरेंचा पाठिंबा कोणाला? मोठी माहिती समोर!
बारामती पोटनिवडणुकीत ठाकरेंचा पाठिंबा कोणाला? मोठी माहिती समोर!.
दमानिया यांच्या खुलाशांवरून जयश्री खाडिलकर यांनी व्यक्त केला संताप
दमानिया यांच्या खुलाशांवरून जयश्री खाडिलकर यांनी व्यक्त केला संताप.
बारामती पोटनिवडणुकीवरून मुख्यमंत्री फडणवीस यांचं आवाहन काय?
बारामती पोटनिवडणुकीवरून मुख्यमंत्री फडणवीस यांचं आवाहन काय?.
दमानियांकडे कॉल्स डिटेल्स आल्या कुठून? राऊतांनी या मंत्र्याच्या....
दमानियांकडे कॉल्स डिटेल्स आल्या कुठून? राऊतांनी या मंत्र्याच्या.....
ठाकरेंची सेना बारामतीत उमेदवार देणार की नाही?
ठाकरेंची सेना बारामतीत उमेदवार देणार की नाही?.
शरद पवारांच्या भेटीला जयंत पाटील, सिल्व्हर ओकवर खलबतं सुरू
शरद पवारांच्या भेटीला जयंत पाटील, सिल्व्हर ओकवर खलबतं सुरू.
सुनेत्रा पवारांनी केला उद्धव ठाकरेंना फोन, राजकीय हालचालींना वेग
सुनेत्रा पवारांनी केला उद्धव ठाकरेंना फोन, राजकीय हालचालींना वेग.
नाशिकच्या दिंडोरीत भीषण अपघात; विहिरीत कार कोसळून 9 जणांचा मृत्यू
नाशिकच्या दिंडोरीत भीषण अपघात; विहिरीत कार कोसळून 9 जणांचा मृत्यू.
सिलेंडरसाठी संघर्ष सुरूच; नागपूर, अमरावती, मुंबईत नागरिक हैराण
सिलेंडरसाठी संघर्ष सुरूच; नागपूर, अमरावती, मुंबईत नागरिक हैराण.