AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune Election Results 2026 LIVE : वडगाव शेरी, येरवडामध्ये कोण मारणार बाजी? भाजप दबदबा कायम राखणार?

Pune Election Results 2026 LIVE : पुणे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 5 मध्ये गेल्यावेळी भाजपचं वर्चस्व होतं, चारही वार्डामध्ये भाजपचे उमेदवार विजयी झाले होते, तर प्रभाग क्रमांक 6 मध्ये शिवसेनेचे 3 आणि एमआयएमचा एक उमेदवार विजयी झाला होता.

Pune Election Results 2026 LIVE :  वडगाव शेरी, येरवडामध्ये कोण मारणार बाजी? भाजप दबदबा कायम राखणार?
पुणे महापालिका निवडणूक Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jan 16, 2026 | 2:34 PM
Share

पुणे महापालिकेमध्ये 15 जानेवारी रोजी मतदान झालं आहे, 16 रोजी मतमोजणी होणार आहे. पुणे महापालिकेत एकूण 41 प्रभाग असून, 41 प्रभागातून 172 उमेदवार पुणे महापालिका निवडणुकीच्या रिंगणात आहेत. गेल्यावेळी या निवडणुकीत भाजपला मोठं यश मिळालं होतं, 2017 मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपच्या तब्बल 97 जागा निवडून आल्या होत्या, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला 39 जागा मिळाल्या होत्या, इतर पक्षाला अपेक्षित असं यश या निवडणुकीत मिळालं नव्हतं. काँग्रेसला अवघ्या 9 जागांवर तर शिवसेनेला दहा जागांवर समाधान मानावं लागलं होतं. तर मनसेला दोन आणि एमआयएमला एक जागा मिळाली होती. आज आपण प्रभाग क्रमांक 5 आणि 6 मध्ये नेमकी काय स्थिती होती? त्याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.

प्रभाग क्रमांक 5 – प्रभाग क्रमांक पाचमध्ये चारही वार्डात भाजपाचं वर्चस्व दिसून आलं, चारही वार्डात भाजपचेचे उमेदवार विजयी झाले. प्रभाग क्रमांक 5 मध्ये पुण्याच्या वडगाव शेरी आणि कल्याणी नगर या भागाचा समावेश होतो. प्रभाग क्रमांक 5 अ मधून भाजपच्या उमेदवार सुनीता गलांडे या विजयी झाल्या तर ब मधून भाजपच्या उमेदवार शितल शिंदे या विजयी झाल्या होत्या, क मधून भाजपचे उमेदवार योगेश मुळीक आणि ड मधून संदीप झरड हे विजयी झाले.

पुणे महापालिका निवडणूक निकाल लाईव्ह 

प्रभाग क्रमांक 6 – प्रभाग क्रमांक सहामध्ये गेल्यावेळी शिवसेनेनं बाजी मारली होती. प्रभाग क्रमांक सहामध्ये पुण्यातील येरवडा या भागाचा समावेश होतो. प्रभाग क्रमांक 6 अ मधून शिवसेनेचे उमेदवार अविनाश साळवे हे विजयी झाले होते. ब मधून श्वेता चव्हाण या विजयी झाल्या होत्या, क मधून एमआयएमच्या उमेदवार अश्विनी लांडगे तर ड मधून शिवसेनेचे उमेदवार संजय भोसले हे विजयी झाले होते. शिवसेनेचे दहा जे उमेदवार विजयी झाले त्यातील तीन नगरसेवक याच वार्डामधून विजयी झाले होते. तर एमआयएमला जी गेल्यावेळी पुणे महापालिकेच्या निवडणुकीत एकमेव जागा मिळाली होती, ती याच प्रभागामधून मिळाली होती. एमआयएमच्या उमेदवार अश्विनी लांडगे या विजयी झाल्या होत्या.

महत्त्वाच्या लिंक्स

महाराष्ट्र निवडणूक निकाल 2026

महाराष्ट्र महापालिका निवडणूक निकाल 2026 मतमोजणीचे लाईव्ह अपडेट्स

बीएमसी महाराष्ट्र निवडणूक निकाल LIVE TV

महाराष्ट्र महानगरपालिकेचा सर्वात वेगवान निकाल पाहा फक्त टीव्ही 9 मराठीवर LIVE

पुणे महापालिका निवडणूक निकाल 2026 LIVE

Follow Us
जय पवार यांची प्रतिक्रिया:निर्णय बारामतीकरांचा, विरोधकांना खुलं आव्हान
जय पवार यांची प्रतिक्रिया:निर्णय बारामतीकरांचा, विरोधकांना खुलं आव्हान.
बारामती पोटनिवडणुकीत ठाकरेंचा पाठिंबा कोणाला? मोठी माहिती समोर!
बारामती पोटनिवडणुकीत ठाकरेंचा पाठिंबा कोणाला? मोठी माहिती समोर!.
दमानिया यांच्या खुलाशांवरून जयश्री खाडिलकर यांनी व्यक्त केला संताप
दमानिया यांच्या खुलाशांवरून जयश्री खाडिलकर यांनी व्यक्त केला संताप.
बारामती पोटनिवडणुकीवरून मुख्यमंत्री फडणवीस यांचं आवाहन काय?
बारामती पोटनिवडणुकीवरून मुख्यमंत्री फडणवीस यांचं आवाहन काय?.
दमानियांकडे कॉल्स डिटेल्स आल्या कुठून? राऊतांनी या मंत्र्याच्या....
दमानियांकडे कॉल्स डिटेल्स आल्या कुठून? राऊतांनी या मंत्र्याच्या.....
ठाकरेंची सेना बारामतीत उमेदवार देणार की नाही?
ठाकरेंची सेना बारामतीत उमेदवार देणार की नाही?.
शरद पवारांच्या भेटीला जयंत पाटील, सिल्व्हर ओकवर खलबतं सुरू
शरद पवारांच्या भेटीला जयंत पाटील, सिल्व्हर ओकवर खलबतं सुरू.
सुनेत्रा पवारांनी केला उद्धव ठाकरेंना फोन, राजकीय हालचालींना वेग
सुनेत्रा पवारांनी केला उद्धव ठाकरेंना फोन, राजकीय हालचालींना वेग.
नाशिकच्या दिंडोरीत भीषण अपघात; विहिरीत कार कोसळून 9 जणांचा मृत्यू
नाशिकच्या दिंडोरीत भीषण अपघात; विहिरीत कार कोसळून 9 जणांचा मृत्यू.
सिलेंडरसाठी संघर्ष सुरूच; नागपूर, अमरावती, मुंबईत नागरिक हैराण
सिलेंडरसाठी संघर्ष सुरूच; नागपूर, अमरावती, मुंबईत नागरिक हैराण.