AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

स्वारगेट बलात्कार प्रकरणानंतर मोठा निर्णय, पुण्यात काय घडणार?

स्वारगेट बसस्थानकात शिवशाही बसमध्ये एका तरूणीवर झालेल्या बलात्काराच्या घटनेनंतर येथील सुरक्षेचा मुद्दा एरणीवर आला आहे. त्या पार्श्वभूमीवर एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

स्वारगेट बलात्कार प्रकरणानंतर मोठा निर्णय, पुण्यात काय घडणार?
स्वारगेट बलात्कार प्रकरणानंतर मोठा निर्णयImage Credit source: social
| Updated on: Mar 01, 2025 | 8:45 AM
Share

पुण्यातील स्वारगेट परिसरातील शिवशाही या एसटी बसमध्ये एका 26 वर्षांच्या तरूणीवर बलात्कार करण्यात आला. याप्रकणातील आरकोपी दत्तात्रय गाडे याला 70 तासांच्या शोधमोहिमेनंतर अखेर काल अटक करण्यात आली. त्याला कोर्टासमोर हजर करण्यात आल्यानंतर न्यायालयाने 12 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. मात्र स्वारगेट बस स्टँडसारख्या वर्दळीच्या ठिकाणी झालेल्या या घटनेने प्रचंड खळबळ माजली असून राज्यभरात संतापाचे वातावरण आहे. राज्यात आणि पुण्यातही कायदा सुव्यवस्थेचे वातावरण आहे की नाही, गुन्हेगारांना वचक कधी बसणार? असे प्रश्न विरोधकांकडून तसेच जनेतकडूनही विचारला जात आहेत. स्वारगेट अत्याचार प्रकरणातनंतर आता एक मोठा निर्णय घेण्यात येणार आहे.

स्वारगेट बसस्थानकावर सुरक्षारक्षक वाढणार

स्वारगेट बसस्थानकावरील बलात्काराच्या घटनेनंतर येथील सुरक्षेचा मुद्दा एरणीवर आला आहे. त्या पार्श्वभूमीवर स्वारगेट एसटी प्रशासनाकडून 36 सुरक्षारक्षकांची मागणी करण्यात आली आहे. त्यामध्ये सहा महिला सुरक्षारक्षक देखील असणार आहेत, असे एसटी प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. सुरक्षित प्रवासासाठी एसटीला प्राधान्य देण्यात येते. विशेषतः सवलतीमुळे सध्या महिला प्रवाशांची संख्या वाढली आहे. परंतु मंगळवारी घडलेल्या घटनेनंतर एसटी बसस्थानकात सुरक्षेची कमतरता असल्याचे दिसून आले. याला एसटी प्रशासनाला जबाबदार धरण्यात आले आहे. त्यामुळे बसस्थानक आणि महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, या घटनेनंतर शिवाजीनगर एसटी स्थानकातील काही सुरक्षारक्षक स्वारगेट स्थानकात तैनात करण्यात आले आहे. स्वारगेट बसस्थानकातील सुरक्षा वाढविण्यासंबंधी वरिष्ठांकडे पाठविण्यात प्रस्ताव आला असल्याचे विभाग नियंत्रक प्रमोद नेहुल यांनी सांगितलं.

रेकॉर्डवरील आरोपींच्या झाडाझडतीचे पुणे पोलिस आयुक्तांचे आदेश

स्वारगेट आगारात झालेल्या बलात्काराच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी बलात्कार, विनयभंग अशा प्रकारचे गुन्हे दाखल असलेल्या शहरातील सराईतांची झाडाझडती घेण्याचे आदेश दिले आहेत. महिलांवरील अत्याचारांच्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या, तसेच बलात्कार आणि विनयभंगाचे गुन्हे दाखल असलेल्या सराईतांना पोलीस ठाण्यात बोलावून त्यांची चौकशी करावी, असे आदेश सर्व पोलीस ठाण्यांच्या प्रमुखांना देण्यात आल्याची माहिती आयुक्त आमितेश कुमार यांनी दिली

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.