AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PMC Election 2026 : 271.85 कोटी रुपये एवढी संपत्ती असलेला पुण्यातील सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? कुठल्या पक्षाने दिलीय उमेदवारी

PMC Election 2026 : पुणे महापालिकेची निवडणूक लढवणारा पुण्यातील सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? त्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्याकडे मर्सिडिज बेन्झ, बीएमडब्ल्यू आणि इनोव्हा क्रिस्टा अशा एकापेक्षा एक आलिशान, महागड्या गाड्या आहेत.

PMC Election 2026 : 271.85 कोटी रुपये एवढी संपत्ती असलेला पुण्यातील सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? कुठल्या पक्षाने दिलीय उमेदवारी
Richest Candidates In Pune Civic Polls
| Updated on: Jan 03, 2026 | 10:05 AM
Share

महापालिकेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून मुंबई इतकीच पुणे महानगर पालिकेची सुद्धा चर्चा आहे. मागच्या 20-25 वर्षात पुण्याचा वेगाने विस्तार झाला आहे. मुंबई इतकच पुण्याच्या रिअल इस्टेट मार्केटच सुद्धा महत्व आहे. आज पुण्यात अनेक नामांकित आयटी कंपन्यांची ऑफिसेस आहेत. पुण्याचं रुपडं पालटलं आहे. जुनं पुणं आणि आताच पुणं यात खूप फरक आहे. पुण्यातील राजकीय घडामोडी राज्याच्या राजकारणावर प्रभाव टाकतात. आता पुणे महानगर पालिकेच्या निवडणुका होत आहेत. पुणे महानगर पालिकेची एकूण सदस्य संख्या 162 आहे. पुण्यात भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचं वर्चस्व आहे. पुण्यात शेवटची महापालिकेची निवडणूक 2017 साली झाली होती. यात भाजपने 97 जागा जिंकून बाजी मारलेली.

यंदा भाजपचं लक्ष्य पूर्ण बहुमताचं आहे. भाजपने पुण्यातून उमेदवाऱ्या जाहीर केल्या आहेत. यात भाजपने उमेदवारी दिलेले सुरेंद्र पठारे हे पुण्याच्या निवडणुकीमध्ये उतरलेले सगळ्यात श्रीमंत उमेदवार ठरले आहेत. त्यांच्याकडे तब्बल 271.85 कोटी रुपयांची संपत्ती आहे. सुरेंद्र पठारे यांनी निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांनी त्यांची मालमत्ता 271.85 कोटी रुपये एवढी दाखवली आहे. सुरेंद्र पठारे यांच्याकडे मर्सिडिज बेन्झ, बीएमडब्ल्यू आणि इनोव्हा क्रिस्टा अशा आलिशान गाड्या आहेत. रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक असून सुमारे 1.75 किलो सोन्याचे दागिने आहेत. दुसऱ्या क्रमांकावर खडकवासल्याचे दिवंगत आमदार रमेश वांजळे यांची मुलगी सायली वांजळे आहे. सायली वांजळे यांच्या नावावर 77.65 कोटी रुपयांची संपत्ती आहे.

पुण्यातील निवडणुकीसंबंधी निवडणूक आयोगाने काय अहवाल मागवलाय?

उमेदवारांनी माघार केव्हा घेतली? त्यांनी दबावाचा काही आरोप केला का? याची शहानिशा करून सविस्तर अहवाल द्या, असा निवडणूक आयोगाने यंत्रणांना आदेश दिला आहे. निवडणूक आयोगाने पुणे जिल्हाधिकाऱ्यांकडून अहवाल मागवला आहे. काही ठिकाणी सत्ताधारी नेत्यांकडून अर्ज मागे घेण्यासाठी दबाव आणला जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे.

महापालिका निवडणुकीतील उमेदवारांना आज चिन्ह वाटप होणार

राजकीय पक्षाच्या लढती स्पष्ट झाल्यानंतर आज इतर उमेदवारांनाही चिन्ह वाटप करण्यात येणार. अपक्ष उमेदवारांनी सुचवलेल्या चिन्हा मधून एका चिन्हाचे वाटप उमेदवारांना करण्यात येणार. पक्षाची संख्या मोठी असल्याने चिन्ह मतदारापर्यंत पोहोचवण्यासाठी उमेदवारांना शर्तीचे प्रयत्न करावे लागणार. पुण्यातील भाजपा उमेदवाराचा प्रचाराचा शुभारंभ आज समता भूमी मधुन होत आहे.

उद्धव ठाकरेंचा शिंदेंवर घणाघात, सूर्याजी पिसाळशी केली गद्दारीची तुलना
उद्धव ठाकरेंचा शिंदेंवर घणाघात, सूर्याजी पिसाळशी केली गद्दारीची तुलना.
आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघात बंड कायम; उमेदवारानं अर्ज मागे नाहीच
आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघात बंड कायम; उमेदवारानं अर्ज मागे नाहीच.
'तपोवनमधील झाडं तोडणार, असं बोलणाऱ्या मंत्र्याचा माज उतरवायचाय...'
'तपोवनमधील झाडं तोडणार, असं बोलणाऱ्या मंत्र्याचा माज उतरवायचाय...'.
अर्ज गिळणाऱ्या उमेदवाराची माघार, उमेदवाराला अश्रू अनावर; शिंदे म्हणाले
अर्ज गिळणाऱ्या उमेदवाराची माघार, उमेदवाराला अश्रू अनावर; शिंदे म्हणाले.
उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी बंडखोरीला ऊत
उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी बंडखोरीला ऊत.
हरिभाऊ राठोड यांच्यासोबत वाद अन् व्हायरल व्हिडीओवर नार्वेकरांचा खुलासा
हरिभाऊ राठोड यांच्यासोबत वाद अन् व्हायरल व्हिडीओवर नार्वेकरांचा खुलासा.
नाशकात हायव्होल्टेज ड्रामा, बंडखोर उमेदवाराला कार्यकर्त्यांनी कोंडलं
नाशकात हायव्होल्टेज ड्रामा, बंडखोर उमेदवाराला कार्यकर्त्यांनी कोंडलं.
तो बदनाम माणूस, त्याला मतदान करू नका, इच्छुक नाराज उमेदवारांचा गोंधळ
तो बदनाम माणूस, त्याला मतदान करू नका, इच्छुक नाराज उमेदवारांचा गोंधळ.
राहुल नार्वेकर-हरिभाऊ राठोड यांच्यात बाचाबाची, कारण काय? Video व्हायरल
राहुल नार्वेकर-हरिभाऊ राठोड यांच्यात बाचाबाची, कारण काय? Video व्हायरल.
कल्याण-डोंबिवलीत महायुतीचे 9 उमेदवार नगरसेवक, कोणाचे किती बिनविरोध?
कल्याण-डोंबिवलीत महायुतीचे 9 उमेदवार नगरसेवक, कोणाचे किती बिनविरोध?.