AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune Land Scam : पुण्यात आणखी एक जमीन घोटाळा समोर, कृषी विभागाची 5 एकर जमीन कुणी घातली घशात? तहसीलदारांसह 9 जणांवर गुन्हा

Agriculture Land Scam : पुण्यात पार्थ पवार यांचा हायप्रोफाईल जमीन व्यवहार गाजत असतानाच आता अजून एक जमीन घोटाळा समोर आला आहे. त्यामुळे प्रशासनापासून तर यंत्रणांमध्ये भूकंप झाला आहे. टोळी युद्धाने भयभीत झालेल्या पुणेकरांची आता जमीन घोटाळ्यांनी झोप उडाली आहे.

Pune Land Scam : पुण्यात आणखी एक जमीन घोटाळा समोर, कृषी विभागाची 5 एकर जमीन कुणी घातली घशात? तहसीलदारांसह 9 जणांवर गुन्हा
पुण्यात अजून एक घोटाळा
| Updated on: Nov 07, 2025 | 10:42 AM
Share

Pune News : पार्थ पवार यांच्या कंपनीचा कोरेगाव पार्क येथील जमीन व्यवहार राज्यात गाजत असतानाच पुण्यात दुसरा मोठा जमीन घोटाळा समोर आला आहे. यामुळे प्रशासनापासून ते राजकारणात भूंकप आला आहे. पुण्यात एकामागून एक जमीन घोटाळे समोर येत आहेत. राजकीय वरदहस्ताशिवाय इतके धाडस भुरटे जमीन माफिया करू शकणार नाही असा पुणेकरांचा सूर आहे. पार्थ पवार अडचणीत आलेल्या जमीन व्यवहार प्रकरणात गुन्हा दाखल झालेल्या शीतल तेजवानी आणि दिग्विजय पाटील यांचा अजून एक कारनामा समोर आला आहे.

शीतल जमीन माफिया?

पार्थ पवार अडचणीत आलेल्या जमीन व्यवहार प्रकरणात गुन्हा दाखल झालेल्या शीतल तेजवानीचं आणखी एक धक्कादायक प्रकरण समोर आलंय. शीतल आणि तिचे पती सागर सुर्यवंशीने बनावट कागदपत्रांच्या आधारे 10 कर्ज उचलली, यातून तब्बल 41 कोटींची रक्कम इतरत्र गुंतवली होती. पिंपरी चिंचवड मधील सेवा विकास बँकेतील या घोटाळ्याप्रकरणी सागरला सीआयडी, पिंपरी चिंचवड पोलीस आणि ईडी कडून अटक झाली होती. शीतलने मात्र अटकपूर्व जामीन मिळवला होता. त्यामुळं शीतलने केवळ जमीन व्यवहार प्रकरणात नव्हे तर कर्ज प्रकरणात ही फसवणूक केल्याचं समोर आलंय.

कृषी खात्याच्या जमिनीवरच डोळा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे शहरातील मुंबई कुळ वहिवाट आणि शेतजमीन अधिनियम 1948 अंतर्गत महानगरपालिका क्षेत्र नसतानाही बोपोडी येथे हा जमीन अपहार करण्यात आला. 5 एकर जमीन घशात घालण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही जमीन 1883 पासून कृषी खात्याकडे होती. शासनाच्या ताब्यात असताना आणि वहिवाट असतानाही हा जमीन घोटाळा करण्याची मजल लँड माफियांनी मारली. त्यामुळे यामागे मोठे राजकीय पाठबळ असल्याचे समोर येत आहे. शीतल तेजवानी आणि तिचे या प्रकरणातील सर्व भागीदारांची चौकशी करण्याची मागणी विरोधकांनी सुरु केली आहे. तिने अजून कुठे जमीन घोटाळे केले हे समोर येणे आवश्यक असल्याचे विरोधकांचे म्हणणे आहे.

खडक पोलीस ठाण्यात गुन्हा

याप्रकरणात तहसीलदार सूर्यकांत येवले, हेमंत गवंडे, राजेंद्र विध्वंस, ऋषिकेश विध्वंस, मंगल विध्वंस, विद्यानंद पुराणिक, जयश्री एकबोटे, शीतल तेजवानी आणि द्विग्विजय पाटील या सर्व 9 जणांविरोधात खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नायब तहसीलदार प्रविण चव्हाण यांनी तक्रार दाखल केली होती. 12 फेब्रुवारी 2024 ते 1 जुलै 2025 या दरम्यान हा कारनामा केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी तपास सुरू आहे.

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.