मै दिल्ली में बैठा हूँ, मेरा पत्ता सफदरजंग लेन… अटक करो; संजय राऊत यांनी अमित शाह यांना फोन केला, काय झाली चर्चा?
प्रवीण राऊत, सुधीर पाटकरांवरील ईडीच्या धाडीने राऊत प्रचंड चिडले होते. त्यांनी थेट अमित शहांना फोन लावला होता. संजय राऊत यांनी लिहीलेल्या 'नरकातील स्वर्ग' या पुस्तकातून त्यांनी हे गौप्यस्फोट केले आहेत.

मला अटक करून सूड घ्या असं आवाहन संजय राऊत यांनी अमित शहांना दिलं होत. ईडीच्या अटकेआधी राऊतांनी शहांना फोन करून संताप व्यक्त केला होता. प्रवीण राऊत, सुधीर पाटकरांवरील ईडीच्या धाडीने राऊत प्रचंड चिडले होते. त्यांनी थेट अमित शहांना फोन लावला होता. संजय राऊत यांनी लिहीलेल्या ‘नरकातील स्वर्ग’ या पुस्तकातून त्यांनी हे गौप्यस्फोट केले आहेत. अटकेआधी अमित शहांना फोन करत राऊतांनी तीव्र शब्दांत आपला संताप व्यक्त केला होता, असंही या पुस्ताकात नमूद करण्यात आलं आहे. राऊत यांच्या पुस्तकाचे आज अनावरण होणार असून त्यापूर्वीच विविध गौप्यस्फोटांमुळे हे पुस्तक चांगलंच चर्चेत आलं आहे. प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिर येथे आज संध्याकाळी 6 वाजता पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम होणार असून यावेळी उद्धव ठाकरे, शरद पवार, जावेद अख्तर उपस्थित राहणार आहेत.
ईडी अटकेच्या अनसीन घटनांचा ‘नरकातील स्वर्ग’ पुस्तकातून राऊतांचा दावा
1) पत्राचाळीसंदर्भात प्रवीण राऊत, सुजीत पाटकरांच्या सीएवर एकाचवेळी धाडी पडल्या.
2) 1 फेब्रुवारी 2023 धाडीनंतर प्रवीण आणि सुजित यांना ईडी कार्यालयात नेण्यात आलं.
3) संसदेच अधिवेशन सुरू असल्याने संजय राऊत दिल्लीत होते.
4) त्याच रात्री 10 वाजात राऊत यांनी अमित शहांना फोन लावला, मला गृहमंत्र्यांशी बोलायचं आहे, मी संजय राऊत बोलतोय असं ते म्हणाले.
5) एक मिनिटी, देता हूँ, असं उत्तर समोरून मिळालं. गृहमंत्री महत्वाच्या बैठकीत आहेत, मोकळे झाले की ते तुम्हाला फोन करतील असं सांगण्यात आलं.
6) अर्जंट है, राऊतांचं संभाषण ऐकून उपस्थिथ असलेले मित्र हादरले. तुम्ही हे काय करताय असा प्रश्न उपस्थित मित्रांनी विचारला.
7) काहीच नाही, मी राज्यसभा सदस्य आहे. मी गृहमंत्र्यांशी भेटू आणि बोलूही शकतो, असं राऊत म्हणाले.
8) 10 मिनिटांनी गृहमंत्रालयातून फोनो आला, गृहमंत्रीजी बोलू इच्छितात असं सांगण्यात आलं.
9) संजयजी बोलिये. आपने फोन किया था, असं समोरून अमित शाह म्हणाले.
10) अमितभाई आपलं राजकीय भांडणं आहे, आणि त्यासाठी तुम्ही मला टार्गेट करू शकता असं राऊत त्यांना म्हणाले.
11) मैं समझा नहीं, राऊतांच्या वक्तव्यावर अमित शाहांनी विचारलं.
12) मला टार्गेट करायचं असेल तर या क्षणी मी दिल्लीत आहे. ईडीला सांगा, मला अटक करा ! असं राऊत त्यांना म्हणाले. माझ्यासाठी इतर निरपराध लोकांना का त्रास देताय ? त्यानं काय साध्य होणार ? असा सवाल राऊतांनी विचारला.
13) कारण नसताना मुंबईत माझ्या मित्रांवर धाडी घालण्यात आल्या, त्यांना ईडीवाले उचलून घेऊन गेले असा आरोप राऊतांनी केला.
14) संजयजी मुझे कुछ जानकारी नहीं, मैं देखता हूँ असं अमित शाह त्यांना म्हणाले.
15) सर आपण गृहमंत्री आहात,राज्यसभा सदस्यांसदर्भात कारवाई सुरू आहे, असं राऊतांनी त्यांना सांगितलं.
16) अमित शहांनी फोन ठेवला, लगेच 5व्या मिनिटाला शेलारांचा फोन आला.
17) संजयजी काय प्रकरण आहे ? मला अमित शहांचा फोन आला होता समजून घ्या म्हणाले असं शेलार राऊतांना म्हणाले.
18) आशिष, गृहमंत्र्यांना सगळा विषय माहीत आहे. त्यांच्या समंतीशिवाय हे शक्य नाही असं राऊतांनी म्हटलं.
19) प्रवीण आणि सुजितला तू देखील ओळखतोस. माझं म्हणणं आहे सरळ मला अटक करा आणि सूड घ्या , इतरांना कशाला छळताय ? असा सवाल राऊतांनी केला.
20) गृहमंत्री शहांना फोन करून मी माझ्या भावना व्यक्त केल्या, तो संताप होता असं राऊत म्हणाले.
21) रात्री 1 वाजता प्रवीणला अटक केल्याचं समजलं आणि त्याआधी सुजितला ईडीने सोडलं, असंही राऊतांनी पुस्तकात म्हटलं.
22) धाडी सुरू असतानाच ईडीचे तत्कालीन संचालक संजय मिश्रा पंतप्रधान कार्यालयात गेले. संजय मिश्रांनी मुंबईतील धाडींसंदर्भात आणि माझ्या मुसक्या आवळण्यासंदर्भात पंतप्रधान मोदींना ब्रीफ केलं असा दावा राऊतांनी केला.
23) आम्हाला फार मोठं घबाड सापडलंय, असं त्यांचं म्हणणं होतं आणि ते पुढे फोल ठरल्याचं राऊत म्हणालेत.
असे अनेक गौप्यस्फोट राऊतांनी या पुस्तकात केले असून प्रकाशनाआधीच हे पुस्तक प्रचंड चर्चेत आलं आहे. पुस्तकात खासदार राऊतांनी अनेक दावे केले आहेत. आपल्याला ईडीकडून अटक होण्याआधी मित्रपरिवाराला त्रास दिला जात होता असा दावा संजय राऊत यांनी त्यामध्ये केला.
