मनोज जरांगेंचं नाव घेत प्रकाश आंबेडकर यांचं मोठं विधान; म्हणाले, दहशत निर्माण करण्याचा…

Prakash Ambedkar on Manoj Jarange Patil : आरक्षण बचाव यात्रा समारोपीय सभा छत्रपती संभाजीनगरमध्ये पार पडली. यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी संबोधित केलं. तेव्हा मनोज जरांगे यांचं नाव घेत प्रकाश आंबेडकर यांनी मोठं विधान केलं आहे. आंबेडकर काय म्हणाले? वाचा सविस्तर...

मनोज जरांगेंचं नाव घेत प्रकाश आंबेडकर यांचं मोठं विधान; म्हणाले, दहशत निर्माण करण्याचा...
मनोज जरांगे पाटील आणि प्रकाश आंबेडकर
Follow us
| Updated on: Aug 07, 2024 | 6:46 PM

वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आरक्षण बचाव यात्रा काढली. या यात्रेनिमित्त आंबेडकर आज छत्रपती संभाजीनगरमध्ये होते. त्यावेळी त्यांनी उपस्थितांना संबोधित केलं. यावेळी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचं नाव त्यांनी घेतलं. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. ही परिस्थिती का झाली? राजकीय पक्षांनी भूमिका न घेतल्याने झाली. पश्चिम महाराष्ट्र देखील फूट दिसते. याची तीव्रता मराठवाड्यात आहे. इतर जिल्ह्यात देखील आहे. निवडणुकांमध्ये मराठा सामाज आपल्याला दाखवून देईल म्हणतात. हे म्हणतात की आम्ही ओबीसी समाजाला मतदान करणार नाही. ओबीसी म्हणतात ती आम्ही मराठ्यांना मतदान करणार नाही. 14 पासून 29 तारखेपर्यंत मनोज जरांगे भूमिका घेतील असा सांगतायेत. त्यावेळी काय होतं ते पाहू, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

जरांगेंवर प्रकाश आंबेडकरांची टीका

मनोज जरांगे यांची मागणी मराठ्यांना ओबीसमधून आरक्षण दिलं पाहिजे, अशी आहे. सागे सोयऱ्यांना आरक्षण द्या असं त्यांचं म्हणणं आहे. याबाबत राजकीय पक्षांनी भूमिका घेण्यापेक्षा समाजाने भूमिका घेतली आहे. आम्ही यात्रा काढली. तेव्हा आम्हाला नावं ठेवली गेली. 40 वर्षांचा मला अनुभव आहे. यात आंबेडकर चळवळीतील बां#X@ समोर असतात. यात पाकिटचे बांडगुळ असतात. जरांगे यांनी म्हटलं निवडणूक लढतो जे राजकीय भांडण राहील सामजिक भांडण होणार नाही, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

मुंबई, पुणे, कोल्हापूर याठिकाणी पावसाची परिस्थिती होती. ही यात्रा कशी सफल होईल? यासाठी लोक सहभागी होत होते. आरक्षण हा सामाजिक प्रश्न आहे. त्याला राजकीय रंग लागतं कामा नये. यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. जे जे आरक्षणातील होल्डर छगन भुजबळ आणि काँग्रेस इतरांना निमंत्रण दिलं होतं. उद्देश हा होता ही, आरक्षणाबाबत जागृतता यावी…, असंही ते म्हणाले.

आरक्षण हा सामाजिक प्रश्न- आंबेडकर

दोन्ही बाजूने लग्नावर बहिष्कार होत होता. आजही आम्ही म्हणतो की आरक्षण हा सामाजिक प्रश्न राहिला आहे. राजकीय जरी असला तरी त्याचा तोडगा निघाला पाहजे. त्यांना बोलावलं. पण दुर्दैव असं की कुणी राजकीय भूमिका घ्यायला कुणी तयार नाही, असं प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी म्हटलं आहे.

प्रसूतीसाठी गर्भवतीला पुराच्या पाण्यातून नेले; बांबूची झोळी अन् पायपीट
प्रसूतीसाठी गर्भवतीला पुराच्या पाण्यातून नेले; बांबूची झोळी अन् पायपीट.
सरन्यायाधीशांच्या घरी मोदी, विरोधकांच्या टीकेवर फडणवीसांचं प्रत्युत्तर
सरन्यायाधीशांच्या घरी मोदी, विरोधकांच्या टीकेवर फडणवीसांचं प्रत्युत्तर.
शिवसेनेकडून मुस्लिम महिलांना बुरखा विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
शिवसेनेकडून मुस्लिम महिलांना बुरखा विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
'मग अजितदादांना कुठे फेकायचं तेही सांगा',शरद पवार गटातील नेत्याचा सवाल
'मग अजितदादांना कुठे फेकायचं तेही सांगा',शरद पवार गटातील नेत्याचा सवाल.
खर्गे राजीनामा देणार? भाजप आक्रमक, कुणी केली राजीनाम्याची मागणी
खर्गे राजीनामा देणार? भाजप आक्रमक, कुणी केली राजीनाम्याची मागणी.
'त्या' पत्रानंतर किरीट सोमय्या म्हणाले, 'मला कोणतंही पद नको, तर मला..'
'त्या' पत्रानंतर किरीट सोमय्या म्हणाले, 'मला कोणतंही पद नको, तर मला..'.
'माझी विनंती, आता फसायच नाही', बार्शीच्या आमदारान जरांगेंना जोडले हात
'माझी विनंती, आता फसायच नाही', बार्शीच्या आमदारान जरांगेंना जोडले हात.
'जरांगे म्हणतील का..राहुल गांधी फडणवीसांचा माणूस?' भाजप नेत्याचा सवाल
'जरांगे म्हणतील का..राहुल गांधी फडणवीसांचा माणूस?' भाजप नेत्याचा सवाल.
हा रस्ता म्हणावा की काय? मुंबईच्या या भागातील रस्त्याला भलं मोठं भगदाड
हा रस्ता म्हणावा की काय? मुंबईच्या या भागातील रस्त्याला भलं मोठं भगदाड.
बारामती अन् साताऱ्यात बाप्पाच्या सजावटीत थेट दादांची लाडकी बहीण योजना
बारामती अन् साताऱ्यात बाप्पाच्या सजावटीत थेट दादांची लाडकी बहीण योजना.