सैन्यानं लाहोर, कराची काबीज केलं असतं पण…संजय राऊतांचा मोठा दावा!
अमेरिकेच्या मध्यस्थाच्या भूमिकावर ठाकरे गटाचे नेते तथा खासदार संजय राऊत यांनी सरकारवर थेट प्रहार केला आहे. लष्कराने लाहोर आणि कराची ही शहरंदेखील ताब्यात घेतली असती पण सरकारने माघार घेतली, असं राऊतांनी म्हटलंय.

Sanjay Raut : भारत पाकिस्तान यांच्यातील तणाव अद्याप निवळलेला नाही. अमेरिकेच्या मध्यस्थीनंतर या दोन्ही देशांत शस्त्रसंधी घडून आलेली आहे. या शस्त्रसंधीनंतर भारताने पाकिस्तानचे धोरण तसेच दहशतवाद यांच्याविरोधात कठोर भूमिका घेतली आहे. दहशतवाद आणि दहशतवादाला खतपणाी घालणारे सरकार यांना आम्ही वेगवेगळं बघत नाही, असं भारत सरकारनं स्पष्ट केलंय. असे असतानाच आता अमेरिकेच्या मध्यस्थाच्या भूमिकावर ठाकरे गटाचे नेते तथा खासदार संजय राऊत यांनी सरकारवर थेट प्रहार केला आहे. लष्कराने लाहोर आणि कराची ही शहरंदेखील ताब्यात घेतली असती पण सरकारने माघार घेतली, असं राऊतांनी म्हटलंय. ते नाशिकमध्ये माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते.
म्प यांना विचारले होते का ?
भारताने युद्ध का पुकारले होते ? भारतीय सैन्याला चार दिवस भेटले असते तर फक्त पाकव्याप्त काश्मीरच नव्हे तर लाहोर आणि कराचीवरही सैन्याने ताबा मिळवला असता. पण अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या दबावापुढे मोदी यांच्या सरकारने कच खाल्ली, असा थेट आरोप राऊत यांनी केला. तसेच पाकव्याप्त काश्मीर मागताना ट्रम्प यांना विचारले होते का ? ट्रम्प यांचे पुढचे ट्विट काय असेल ते आता बघावे लागेल, असा टोलाही त्यांनी मोदी सरकारला लगावला.
त्यांच्या घरी खिचडी बनत नाही म्हणून….
पुढे बोलताना त्यांनी राज्यातील राजकारणावरही भाष्य केलं. काही दिवसांपूर्वी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते उदय सामंत यांच्यात भेट झाली होती. यावर बोलताना “भेट होऊ. द्या त्यांना काम काय आहे. त्यांच्या घरी खिचडी बनत नाही. शिवाजी पार्कला चांगले हॉटेल आहेत तिथे उत्तम खिचडी मिळते. लोक तिथे सकाळी फिरायला जातात तसे उदय सामंत येत असतील,” अशी टोलेबाजी संजय राऊतांनी केली.
तुमच्या पक्षाची निशाणी खिचडी ठेवा
तसेच, लोकशाहीत कोणी कोणाकडे जाण्यावर बंधन नाही. या छुप्या राजकारणातच त्यांचा पराभव दिसतो आहे. तुम्ही भाजप, अजित पवारांसोबत आहात इतर पक्षांसोबतही तुम्ही संधान जुळवत आहात. यापुढे तुमच्या पक्षाची निशाणी खिचडी ठेवा, असा टोला संजय राऊत यांनी शिंदेंच्या शिवसेनेला लगावला.
