AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बिनविरोध निवडणुकीवरून संजय राऊत यांचा गंभीर आरोप, म्हणाले, भाजपा आणि शिंदेंचे छपरी लोक…

महापालिकेच्या निवडणुकीचे वारे राज्यात वाहत आहे. 29 महापालिकेचे मतदान 15 जानेवारी होणार आहे. त्यापूर्वी गंभीर आरोप केली जात आहेत. बिनविरोधात निवडणुका होत असल्याने विरोधकांकडून टीका केली जात आहे.

बिनविरोध निवडणुकीवरून संजय राऊत यांचा गंभीर आरोप, म्हणाले, भाजपा आणि शिंदेंचे छपरी लोक...
sajnya raut
| Updated on: Jan 06, 2026 | 10:27 AM
Share

राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील 29 महापालिकेच्या निवडणुका जाहीर केल्या. मात्र, बिनविरोध निवडणुका होत असल्याने जोरदार टीका केली जात आहे. सत्ताधारी आणि निवडणूक आयोगावर टीका केली जात आहे. यादरम्यान संजय राऊत यांनी अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. संजय राऊत म्हणाले की, निवडणूक आयोगाला स्पष्ट दिसतंय की, बिनविरोध सरळ मार्गाने झाली नाही. निवडणूक आयोगाकडून राहुल नार्वेकर यांनी क्लीनचीट देण्यात आली. बिनविरोध निवडणुका ही धमकी, पैसे आणि यंत्रणांचा गैरवापर याच्यामुळे झालेली आहे. निवडणूक आयोगाने पालिकेने ज्या अधिकाऱ्यावर ठपका ठेवला होता, त्यालाही क्लीनचीट दिली. पैसे देऊन ज्याठिकाणी लोकांनी टोकण घेतले, त्यांना अर्ज भरू दिली नाहीत. मग आपचे उमेदवार आहेत, जनता दलाचे उमेदवार आहेत.

शिवसेना आणि मनसेचे उमेदवार बबन महाडिक हे रांगेत उभे आहेत. त्यांना विधानसभा अध्यक्षांच्या दहशतीमुळे त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करून घेतला नाही. निवडणूक आयोगाच्या डोळ्याच्या खाचा झाल्या आहेत का? की डोळे नसून त्यांच्या डोळ्यात गारगोट्या आहेत… त्यांना जर हे दिसत नसेल ही स्थिती. जर हे सर्व निवडणूक आयोगाला दिसत नसेल तर निवडणूक आयोगा सत्ताधाऱ्यांचा एजंट म्हणून काम करतो.

पुढे संजय राऊत यांनी म्हटले की, 70 ठिकाणी महाराष्ट्रात बिनविरोध होतात या निवडणूक आयोगाच्या काळात. यापूर्वी किती झाले हे आम्हाला दाखवा ना.. या महाराष्ट्रात मोठंमोठे नेते होऊन गेले. पण कोणी बिनविरोध निवडणूक होऊ दिली नाही. मनोहर जोशी होते, नगरसेवक पण कधी झाली का बिनविरोध? मग हे छपरी टपरी शिंदे आणि भाजपाचे गुंड लोक हे बिनविरोध निवडून आणले जातात आणि निवडणूक आयोग त्यांना क्लीनचीट देतयं.

निवडणूक आयोगाचा क्लीनचीटचा हा कारखाना देशासाठी आणि राज्यासाठी धोकादायक आहे. प्रत्येक ठिकाणी निवडणूक आयोगाने घोटाळा केला, नियमाच्या बाहेर जाऊन काम केले जातंय, कायद्याचे उल्लंघन केलंय. सत्ताधारी पक्षाला मदत होईल, असे काम केले जातंय. पण निवडणूक आयोगाला या प्रत्येक गोष्टीचा हिशोब द्यावा लागेल. प्रत्येक गोष्टीला अंत असतो.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...