शिवसेना-भाजपमध्ये दरी पडण्यास जबाबदार कोण?, संजय राऊत यांनी घेतलं बड्या नेत्याचं नाव; राजकारणात मोठी खळबळ
संजय राऊतांच्या "नरकातला स्वर्ग" या पुस्तकाच्या प्रकाशनपूर्वीच जोरदार चर्चा सुरू आहे. पुस्तकात भाजप-शिवसेना युती तुटण्यामागील कारणे आणि राऊतांनी केलेले आरोप चर्चेचा विषय आहे

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी लिहीलेल्या ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकाचे आज संध्याकाळी रविंद्र नाट्य मंदीर येथे प्रकाशन होणार आहे. मात्र त्यापू्र्वीच या पुस्तकाची बरीच चर्चा सुरू आहे, आणि त्याला कारण म्हणजे राऊतांनी या पुस्तकात केलेल विविध दावे आणि खळबळजनक खुलासे. या पुस्तकाबद्दल बोलतानात, माध्यमांशी आज सकाळी संवाद साधताना संजय राऊतांनी एक मोठं विधान केलं असून त्यामुळे आता आणखी खळबळ माजण्याची शक्यता आहे.
25 वर्षांपेक्षा अधिक काळ महाराष्ट्रात भाजप -शिवसेना युती होती, मात्र गेल्या दशकभरात हे राजकारण बदलले आणि भाजप-सेनेची युती तुटली , त्यात फूट पडली आणि पाहतात पाहता दोन्ही पक्षांमध्ये मोठी दरी निर्माण झाली. याचसंदर्भात बोलताना आज संजय राऊत यांनी एक महत्वाचे विधान केलं. भाजप आणि अमित शाहांबद्दलही ते बोलले. मी तुरुंगात असताना ते मला भेटण्यासाठी प्रयत्न करत होते. पुस्तकातील सर्व गोष्ट सांगू शकत नाही. पुस्तक कोण घेणार. पुस्तकात आहे सर्व.
अमित शाह दिल्लीत आल्यावर भाजप आणि शिवसेनेत दरी पडण्यास सुरुवात झाली. अमित शाह यांना अरुण जेटलींनीही समजावलं होतं. असं करू नका. शिवसेना आपला जुना पक्ष आहे, असं जेटलींनी शाह यांना सांगितलं होतं. एकदा जेटलीही मला म्हणाले होते की, मी शाह यांना दोनदा समजावलं. जेटली आजारी होते. २०१४ची ही गोष्ट आहे. तेव्हा जेटलींनी शाह यांना सांगितलं की शिवसेना आपला जुना मित्र पक्ष आहे. सर्वात जुना मित्र पक्ष आहे. त्यांच्यासोबत आपल्याला राहावं लागेल. भारतीय जनता पक्ष आणि अमित शहांनी मात्र विरोधकांना क्रूर पद्धतीने नष्ट करण्याचा प्रकार सुरू केला. त्याचे देशात अनेक बळी गेले असं राऊत म्हणाले.
अमित शहा दिल्लीत आले आणि भाजप-शिवसेनेत दरी निर्माण झाली..
भाजप आणि शिवसेनेत दरी पडण्यास अमित शाह जबाबदार असल्याचा दावा राऊतांनी केला. “अमित शाह दिल्लीत आल्यावर भाजप आणि शिवसेनेत दरी पडण्यास सुरुवात झाली. अमित शाह यांना अरुण जेटलींनीही समजावलं होतं. असं करू नका, शिवसेना आपला जुना पक्ष आहे, असं जेटलींनी शाह यांना सांगितलं होतं असा दावा राऊत यांनी केला. एकदा अरूण जेटली मलाही म्हणाले होते की, मी शाह यांना दोनदा समजावलं. जेटली आजारी होते. 2014 सालची ही गोष्ट आहे. तेव्हा जेटलींनी शाह यांना सांगितलं की शिवसेना आपला जुना मित्र पक्ष आहे. सर्वात जुना मित्र पक्ष आहे. त्यांच्यासोबत आपल्याला राहावं लागेल.” असं राऊत म्हणाले. राऊतांनी अमित शाहांवर केलेल्या या आरोपामुळे आता नवी खळबळ माजली असून राजकीय वातावरणही तापण्याची शक्यता आहे.