सुपर बाईकची धूम ठरली अखेरची, राईड दरम्यान अपघात होऊन तरुणाचा दुर्दैवी अंत

Nupur Chilkulwar

|

Updated on: Jan 12, 2021 | 3:25 PM

सुपर बाईकची धूम ठोकत असताना तोल गेल्याने दुभाजकाला धडक होऊन एका तरुणाचा अंत (Youth Died) झाला आहे

सुपर बाईकची धूम ठरली अखेरची, राईड दरम्यान अपघात होऊन तरुणाचा दुर्दैवी अंत
Follow us

नवी मुंबई : मित्राने नवीनच घेतलेल्या सुपर बाईकवरची धूम जिवावर बेतल्याचा प्रकार सोमवारी (Super Bike Accident) नवी मुंबईतील पामबीच मार्गावर घडला. सुपर बाईकची धूम ठोकत असताना तोल गेल्याने दुभाजकाला धडक होऊन एका तरुणाचा अंत (Youth Died) झाला आहे (Super Bike Accident).

सुपर बाईकची राईड घेण्यासाठी तळोजावरुन कोपरखैरणे आला

कोपरखैरणे येथे राहणाऱ्या अरबाज अन्सारी याने हायाबुसा ही सुपर बाईक घेतली होती. ती पाहण्यासाठी त्याचाच तळोजा येथील मित्र स्वप्निल चंद्रकांत झिंगाडे (वय 26) हा कोपरखैरणेला आला होता. दोघेही बायकर असून जुने मित्र आहेत. त्यामुळे स्वप्निल हा सुपर बाईकची पहिली राईड घेण्यासाठी पामबीच मार्गावर आला होता.

पामबीचमार्गे तो सीबीडीच्या दिशेने जात असताना नेरुळ तलावालगत त्याचा तोल गेला. यामुळे बाईक उजवीकडे कलंडली असता, स्वप्निल हा खाली पडून रस्त्याच्या दुभाजकावरील तारेत अडकून पडला, तर मोटरसायकल सुमारे 200 मिटर अंतरापर्यंत घासत गेली (Super Bike Accident).

हा अपघात पाहताच प्रत्यक्षदर्शी आणि वाहतूक पोलिसांनी त्या ठिकाणी धाव घेतली. मात्र, दुभाजकावर आदळल्याने स्वप्निलचा जागीच मृत्यू झाल्याचे वरिष्ठ निरीक्षक श्याम शिंदे यांनी सांगितले.

ताबा सुटल्याने दुर्घटनाअपघाताच्या वेळी सुपर बाईक अधिक वेगात होती. त्यामुळे स्वप्निलचा ताबा सुटल्याने हा अपघात घडला. या प्रकरणी नेरुळ पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

Super Bike Accident

संबंधित बातम्या :

Shripad Naik | हायवेवरील शॉर्टकट जीवघेणा, अपघातात श्रीपाद नाईक अत्यवस्थ, पत्नी आणि पीएचा मृत्यू

शोएब मलिकच्या स्पोर्टस कारचा मोठा अपघात, बोनेटचा भाग चक्काचूर

धक्कादायक! पोलादपूरमधल्या ‘या’ ठिकाणीच घडला अपघात, 2 जणांचा मृत्यू, 34 गंभीर जखमी

हरिद्वारमध्ये मोठा रेल्वे अपघात, ट्रायल दरम्यान रेल्वेखाली चिरडून चोघांचा मृत्यू

Non Stop LIVE Update

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI