Palghar | मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर टेम्पोंना आग, चालकाचा होरपळून मृत्यू

Palghar | मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर टेम्पोंना आग, चालकाचा होरपळून मृत्यू

| Edited By: | Updated on: Feb 25, 2022 | 5:41 PM

पालघरमध्ये (Palghar) मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर दोन टेम्पोना भीषण आग (Fire) लागल्याची घटना घडली. यात एकाचा होरपळून मृत्यू (Dead) झाला आहे. दोन वाहनांची धडक झाल्याने दोन्ही वाहने आगीच्या भक्षस्थानी पडली.

पालघरमध्ये (Palghar) मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर दोन टेम्पोना भीषण आग (Fire) लागल्याची घटना घडली. यात एकाचा होरपळून मृत्यू (Dead) झाला आहे. दोन वाहनांची धडक झाल्याने दोन्ही वाहने आगीच्या भक्षस्थानी पडली. पालघरमधील मेंढवन येथे हा अपघात झाला आहे. या अपघातात दोन्ही टेम्पो जळून खाक झाले आहेत. एवढेच नाही तर आगीत एका टेम्पो चालकाचाही होरपळून मृत्यू झाला आहे. चालक पैलाद बाबू ठाकूर असं या आगीत होरपळून मृत्यू झालेल्या चालकाचे नाव आहे. त्यासोबतच टेम्पोसह साहित्यही जळून खाक झाले आहे. अपघातानंतर अग्निशामक दलाची एकही गाडी वेळेत घटनास्थळी दाखल झाली नाही. दरम्यान आग लागल्यानंतर धुराचे मोठमोठे लोट ट्रकमधून येत होते. परिसरात धुराचे साम्राज्य निर्माण झाले होते. जीवितहानीसह मोठी आर्थिक हानीही यात झाली.