Maharashtra Breaking News LIVE 2 June 2025 : पुण्यातील हडपसर भागात युवकांकडून दगडफेक,कोयते उगारून दहशत
Maharashtra Political News LIVE in Marathi : आज 2 जून 2025. देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

आषाढी एकादशीसाठी लाखो वारकरी पंढरपुरात वारीने जात असतात. या वारीसाठी शेगावचे गजानन महाराज यांची पालखी आज मार्गस्थ होणार आहे. गजानन महाराज पालखीचे यंदा 56 वे वर्ष आहे. ही पालखी 4 जुलै रोजी पंढरपूर पोहचणार आहे. दहावीचा निकालानंतर राज्यात अकरावी प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. अकरावीच्या प्रवेशासाठी राज्यात 10,00,332 विद्यार्थ्यांनी नोंदणी झाली आहे. सर्वात जास्त नोंदणी पुणे विभागात झाली आहे. पुणे विभागातून 1,64,983 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. मुंबईतील चर्चगेट रेल्वे स्थानकाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी धनगर समाजाचे नेते प्रकाश शेंडगे यांनी केली आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) प्रवाशांसाठी ‘लवचिक भाडे’ योजना सुरू करणार आहे. या योजनेअंतर्गत गर्दी नसलेल्या महिन्यांमध्ये प्रवासाच्या तिकीटांवर सुमारे १५ टक्क्यांपर्यंत सूट दिली जाणार आहे. यासह राज्यातल्या, देशभरातल्या सामाजिक, राजकीय, क्रीडा व इतर विषयातील महत्वाच्या बातम्या व अपडेट्स जाणून घेण्यासाठी दिवसभर हा ब्लॉग फॉलो करत रहा…
LIVE NEWS & UPDATES
-
पुण्यातील हडपसर भागात युवकांकडून दगडफेक,कोयते उगारून दहशत
पुण्यातील हडपसर भागातील रामटेकडी परिसरात टोळक्याने कोयते उभारून दगडफेक केल्याची घटना समोर आली आहे. तसेच आम्हीच इथले भाई असे म्हणत दहशत माजवली आहे. टोळक्याने केलेल्या दगडफेकीत 2 महिला जखमी झाल्या आहेत. या प्रकरणात वानवडी पोलिसांनी 6 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या 6 जणांमध्ये दोघे अल्पवयीन असल्याची माहिी पोलिसांनी दिलीय. एकाला ताब्यात घेतलं असून इतरांचा शोध घेतला जात आहे.
-
किनवटच्या तहसीलदार शारदा चोंडेकर यांना कारणे दाखवा नोटीस
नांदेडमधून मोठी बातमी समोर आली आहे. मंत्री नरहरी झिरवळांच्या दौऱ्याला अनुपस्थित राहिल्याने किनवटच्या तहसीलदार शारदा चोंडेकर यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. किनवटच्या तहसीलदार शारदा चोंडेकर यांना कारणे दाखवा नोटीस देण्यात आली आहे. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी तहसीलदार शारदा चोंडेकर यांना कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे. तसेच दोन दिवसात समाधानकारक खुलासा सादर न केल्यास कारवाईचा करण्याचाही इशारा दिला आहे.
-
-
बांगलादेशींना परत पाठवण्याच्या प्रकरणाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली
आसाममधून बांगलादेशींना परत पाठवण्याच्या पुश बॅक पॉलिसीला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. याचिकाकर्त्याच्या वकिलाने सांगितले की, सर्वोच्च न्यायालयाने अलीकडेच आसाममधून अनेक लोकांना जबरदस्तीने बांगलादेशात पाठवल्याच्या विरोधात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करण्यास नकार दिला आहे.
-
राहुल गांधी 4 जून रोजी चंदीगडला जाणार, काँग्रेस नेत्यांसोबत बैठक घेणार
काँग्रेस नेते राहुल गांधी 4 जून रोजी एक दिवसाच्या चंदीगड दौऱ्यावर येणार आहेत. ते हरियाणा संघटनेच्या नेत्यांसोबत एक महत्त्वाची बैठक घेणार आहेत. ते सकाळी 11.10 वाजता एअर इंडियाच्या विमानाने दिल्लीहून चंदीगडला पोहोचतील. ते दुपारी 12 वाजताच्या सुमारास हरियाणा काँग्रेस समितीच्या चंदीगड कार्यालयात पोहोचतील. हे ठिकाण देखील बदलले जाऊ शकते. राहुल गांधी पहिल्या टप्प्यात 12:15 ते दुपारी 1 या वेळेत हरियाणा काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांसोबत बैठक घेतील.
-
सिक्कीममध्ये भूस्खलनात 3 सुरक्षा कर्मचारी ठार, 6 बेपत्ता
सिक्कीममध्ये भूस्खलनात तीन लष्करी जवानांचा मृत्यू झाला आहे आणि सहा सैनिक बेपत्ता आहेत. त्यांना शोधण्यासाठी मोठ्या प्रमाणात बचाव मोहीम राबवली जात आहे.
-
-
पंतप्रधान मोदी सायंकाळी 5 वाजता आयएटीएच्या वार्षिक सर्वसाधारण सभेला संबोधित करणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या इंस्टाग्रामवर लिहिले की, ‘आज संध्याकाळी 5 वाजता मी भारत मंडपम येथे आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक संघटनेच्या (IATA) वार्षिक सर्वसाधारण सभेला संबोधित करणार आहे. या बैठकीत विमान वाहतूक क्षेत्रातील प्रमुख भागधारक सहभागी होत आहेत.
-
दादर, लोअर परळ परिसरात जोरदार पावसाला सुरुवात
दादर लोअर परळ परिसरात जोरदार पावसाला सुरुवात
उकाड्याने हैरान झालेल्या नागरिकांना दिलासा
-
कोळीबांधवांसाठी नितेश राणेंचा पहिला जनता दरबार
कोळीबांधवांसाठी नितेश राणेंचा पहिला जनता दरबार.
भाजप प्रदेश कार्यालयात आज कोळीबांधवांसाठी जनता दरबाराचे आयोजन.
कोळी बांधवांसाठी पहिलाच जनता दरबार म्हणुन कोळीबांधव नितेश राणेंच कोळी संस्कृतीत करणार स्वागत.
-
एका व्यक्तिची 6 कोटी 29 लाखांची फसवणूक केलेल्या सायबर चोरट्याला पुणे पोलिसांकडून अटक
पुण्यात एका राजकीय पक्षाशी निगडित असणाऱ्या महिलेच्या पतीला सायबर गुन्हामध्ये पुणे पोलिसांनी जेरबंद केल आहे. मनी लॉड्रिग व्यवहारात डिजिटल अटक करण्याची भीती दाखवून पुण्यातील एका ज्येष्ठ नागरिकाची 6 कोटी 29 लाखांची फसवणूक केल्याचं समोर आलं आहे. तुषार हरिश्चंद्र वाजंत्री असं या सायबर भामट्याचं नाव असून त्याला पनवेल परिसरातून अटक करण्यात आली असून त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
-
रुग्णाला भेटण्यासाठी आलेल्या नातेवाईकाच्या खिशात गांजा; पोलिसांमध्ये तक्रार
उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात रुग्णाला भेटण्यासाठी आलेल्या नातेवाईकाच्या खिशात गांजा आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. सुरक्षारक्षकाने केलेल्या तपासणी दरम्यान ही बाब समोर आली असून याप्रकरणी मध्यवर्ती रुग्णालयाच्या अधीक्षकांनी मध्यवर्ती पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.मध्यवर्ती पोलिसांनी संबंधित रुग्णाच्या नातेवाईकाला ताब्यात घेतलं असून पुढील कारवाई सुरू आहे.
-
धाराशिव मधील शेतकऱ्याचं एमआयडीसीच्या बोर्डवर चढून शोले स्टाईल आंदोलन
धाराशिवच्या वडगाव सिद्धेश्वर मध्ये एमआयडीसी मध्ये जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांनी आंदोलन केलं आहे. विष प्राशन करून मरणाची परवानगी द्यावी अथवा जमिनीचा मोबदला द्यावा त्वरित द्यावा म्हणून आंदोलन करण्यात आलं. औद्योगिक विकास महामंडळाने 2012 साली संपादित केलेल्या जमिनीचा मावेजा मिळावा या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे.
-
राऊत नाशिकमध्ये असताना ठाकरे सेनेचे उपनेते बडगुजर मुख्ंयमंत्र्यांच्या भेटीला
संजय राऊत नाशिकच्या दौऱ्यावर असताना ठाकरे सेनेचे उपनेते सुधाकर बडगुजर हे मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला गेले आहेत. भेटीचे कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे. तसेच बडगुजर हे मुख्यमंत्र्यांना कोणतेतरी निवेदन देताना दिसत आहे.
-
आठवडाभरात शरद पवार गटाला सलग दुसरा धक्का
जालना जिल्ह्यातील आठवडाभरात शरद पवार गटाला सलग दुसरा धक्का बसला आहे. *पंचायत समितीच्या माजी सभापतीने भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजप आमदार नारायण कुचे यांच्या उपस्थितीमध्ये वडीगोद्री येथे पक्षप्रवेश सोहळा पार पडला. माजी मंत्री राजेश टोपे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पदाधिकाऱ्यांने शरद पवार गटाला राम राम ठोकला आहे.
-
मोकाट कुत्र्याच्या हल्ल्यात चार वर्षीय बालकाचा मृत्यू
जळगावच्या नागेश्वर कॉलनीमधील बालकावर मोकाट कुत्र्याने हल्ला केला. या कुत्र्याने लहान मुलाचा चेहरा, मान, गळ्याचे लचके तोडले. यात या बालकाचा मृत्यू झाला. अन्य चार ते पाच जणांनाही कुत्र्याने चावा घेतला आहे.
-
सोलापुरातील ब्रिटिशकालीन हिप्परगा तलाव मे महिन्यातच फूल
मागील 155 वर्षापासून सोलापूर शहराला पाणीपुरवठा करणारा ब्रिटिशकालीन हिप्परगा तलाव पूर्ण भरला आहे. मे महिन्याच्या अखेरीस पहिल्यांदाच हा तलाव पूर्ण क्षमतेने भरल्याचे पाहायला मिळत आहे. ब्रिटिशांनी 1868 साली या तलावाच्या निर्मितीला सुरुवात केली आणि 1871 साली बांधकाम पूर्ण झाले होते. या तलावात जवळपास 3 टीएमसी इतकी साठवण क्षमता आहे . हे तलाव जवळपास 18 किमी क्षेत्रावर विस्तारलेले आहे. दरम्यान हे तलाव पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे तलावाचे सौंदर्य फुलले आहे.
-
मुंबई-अहमदाबाद महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी, वाहनांच्या लांबच लांब रांगा
मुंबई-अहमदाबाद महामार्गावर आज सकाळपासून गायमुख येथे एका कंटेनरचा अपघात झाल्यामुळे प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. ठाणे रोडवरील या अपघाताचा परिणाम ठाणे, घोडबंदर आणि वसई रोडवरील महामार्गावर झाला आहे. मुंबई लेनवर वर्सोवा ते पेल्हार फाटा या दरम्यान वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. गुजरात लेनवर वाहतूक धीम्या गतीने सुरू असली तरी मुंबईकडे येणाऱ्या लेनवर मात्र वाहतुकीचा खोळंबा अधिक आहे.
-
नाशिकमधील पंचवटीत एका इसमाची हत्या, परिसरात खळबळ
नाशिकच्या पंचवटी भागातील पेठ रोडवर मध्यरात्री अज्ञात व्यक्तींनी संजय सासे नावाच्या एका इसमाची हत्या करण्यात आली आहे. डोक्यात धारदार शस्त्राने वार करून संजय सासे यांना संपवण्यात आले. स्थानिक रहिवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय सासे हे बाबागिरी करत होते. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, पंचवटी पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
-
वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण : शशांक हगवणे आणि लता हगवणे यांना उद्या न्यायालयात हजर करण्यात येणार
वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात येरवडा कारागृहात असलेल्या शशांक हगवणे आणि त्याची आई लता हगवणे यांना महाळुंगे पोलीस उद्या ताब्यात घेणार आहेत. या दोघांविरोधात महाळुंगे पोलीस ठाण्यात बंदुकीचा धाक दाखवून फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल आहे. ज्या जेसीबी संदर्भात त्यांनी फसवणूक केली होती, तो जेसीबी महाळुंगे पोलिसांनी जप्त केला आहे. या गुन्ह्याच्या पुढील तपासासाठी शशांक आणि लता हगवणे या दोघांचा ताबा उद्या दुपारी ३ वाजता येरवडा कारागृहातून घेऊन खेड येथील न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
-
मुंबईतील डिलिव्हरी सेवा देणारी कंपनी झेप्टो (Zepto) अडचणीत
मुंबईतील प्रसिद्ध डिलिव्हरी सेवा देणारी कंपनी झेप्टो (Zepto) अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन केल्याने अडचणीत सापडली आहे.
महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासन (FDA) ने धारावीतील झेप्टोच्या गोदामाची तपासणी केली असता गंभीर त्रुटी आढळून आल्या आणि त्यानंतर कंपनीचा अन्न व्यवसाय परवाना तात्काळ निलंबित करण्यात आला आहे.
-
पावसाळी कामांच्या संदर्भात मंत्री चंद्रकांत पाटील यांची महानगरपालिका आयुक्तांसोबत बैठक
पावसाळी कामांच्या संदर्भात मंत्री चंद्रकांत पाटील यांची महानगरपालिका आयुक्तांच्या सोबत पुणे महानगरपालिकेतल बैठक झाली.
आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग रचना संदर्भात महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांच्या सोबत मंत्री चंद्रकांत पाटील यांची चर्चा झाली.
-
हगवणे प्रकरणानंतर लक्ष्मण हाके यांची फॉर्च्युनर चर्चेत
हगवणे प्रकरणानंतर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांची फॉर्च्युनर गाडी आणि त्यानंतर शेतकरी संघटनेचे नेते अतुल खूपसे पाटील यांचीही चर्चेत आहे.
करमाळयात फॉर्च्युनर गाडीची सोशल मीडियात चर्चा.
आजकाल हगवणे प्रकरणानंतर फॉर्च्युनर मधून उतरला की संशय येतो, म्हणून अतुल खूपसे यांनी गाडीवर वेगळा मजकूर लिहिला आहे.
” तशी तर मी मोठ्या घरची राणी मात्र बदनाम केलं मला हगवणे यांनी मी फॉर्च्युनर,माझा रुबाबच वेगळा,हगवणे कुटुंबामुळे नाव ठेवू लागलाय गाव सगळा अतुल भाऊंनी मला रोखीत विकत घेतलय, पण हगवणे मुळे फॉर्च्युनरला लोकांनी धु धु धुतलय गाडीवर” हा मजकूर चर्चेत आला आहे.
-
छत्तीसगडमध्ये माओवाद्यांनी लावलेले 10 IED पोलिसांनी केले निष्क्रीय
छत्तीसगडमध्ये माओवाद्यांनी लावलेले 10 IED पोलिसांकडून निष्क्रीय करण्यात आले.छत्तीसगडच्या नारायणपूर जिल्ह्यातील कोहकामेटा भागातला हा प्रकार आहे.
-
शेगावचे संत गजानन महाराजांची पालखी आज शेगाववरून पंढरपूरसाठी रवाना
बुलढाणा जिल्ह्यातील शेगावचे संत गजानन महाराजांची पालखी आज शेगाववरून पंढरपूरसाठी रवाना झाली. ही पालखी दरवर्षी आषाढी एकादशी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी जात असते. यावर्षी पालखीचे 56 वे वर्ष असून 55 वर्षांची परंपरा कायम आहे
-
छत्तीसगड – माओवाद्यांनी लावलेले दहा IED ब्लास्ट पोलिसांनी केले निष्क्रिय
छत्तीसगड – माओवाद्यांनी लावलेले दहा IED ब्लास्ट पोलिसांनी निष्क्रिय केले. नारायणपूर जिल्ह्यातील कोहकामेटा मुख्य मार्गावर लावले होते आयईडी. या मार्गावर अभियान सुरू करताच मोठ्या प्रमाणात IED असल्याचं जवानांच्या लक्षात आलं. याच मार्गावर दोन दिवसा अगोदरही 3 नागरिक IED ब्लास्टमुळे गंभीर जखमी झाले होते.
-
मुंबईत दोन अन्न व्यावसायिकांवर धडक कारवाई, परवाना निलंबित, एफआयआर दाखल
मुंबईत दोन अन्न व्यावसायिकांवर धडक कारवाई करण्यात आली असून त्यांचे परवाने निलंबित करण्यात आले. त्यांच्याविरोधात एफआयआरसुद्धा दाखल झाला आहे. मुंबईतील धारावी इथल्या किरणकार्ट टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड (झेप्टो) या अन्न व्यावसायिकावर अन्न सुरक्षा विभागाने धडक कारवाई केली आहे.
अन्न सुरक्षा अधिकारी राम बोडके यांनी अचानक तपासणी केली असता बुरशी लागलेले अन्न, अस्वच्छ परिसर, थेट जमिनीवर ठेवलेले अन्न, साचलेल्या पाण्याजवळ साठवलेले उत्पादन आणि कालबाह्य खाद्यपदार्थ साठवलेले असल्याचे आढळले.
त्यामुळे सहाय्यक आयुक्त अनुपमा पाटील यांनी कंपनीचा परवाना तात्काळ निलंबित केला असून, सर्व नियामक अटी पूर्ण होईपर्यंत व्यवसाय सुरू करता येणार नाही.
-
माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू
माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरु आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार हे बारामती दौऱ्यावर आहेत. सकाळी बारामती शहरातील राष्ट्रवादी भवनात ते माळेगावच्या कार्यक्षेत्रातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेणार आहेत. मुलाखतीनंतर मुख्यमंत्री अजित पवार यांची पत्रकार परिषद देखील होणार आहे
-
वारजे टेकडी परिसरात एकाचा संशयास्पद मृत्यू
वारजे टेकडी परिसरात एकाचा संशयास्पद मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. या व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची पोलिसांची प्राथमिक माहिती आहे. व्यक्ती कोण आहे, गळफास नेमका का घेतलाय याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत. गळफास घेणाऱ्या व्यक्तीची अद्याप ओळख पटली नसल्याची पोलिसांची माहिती आहे.
-
रवी वर्माला आज कोर्टात हजर करणार
पाकिस्तानशी हेरगिरी प्रकरणात ठाण्यातील कळवा परिसरातील राहणारा रवी मुरलधर वर्मा याची पोलीस कोठडी आज संपणार आहे. त्याला ठाणे न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
-
पुणे विद्यापीठात प्रवेशासाठी परीक्षा
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आवारातील शैक्षणिक विभागांमध्ये असलेल्या अभ्यासक्रमास प्रवेशासाठी परीक्षा घेण्यात येणार आहे. पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ऑनलाईन परीक्षा तीन ते पाच जून दरम्यान होणार होणार आहे.
-
उत्तर महाराष्ट्रात पावसाची शक्यता
मुंबई, नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रात पुढच्या दोन दिवसांत हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. 1 ते 6 जूनपर्यंत सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, कोकणपट्ट्यात रिमझिम पाऊस पडणार आहे.
-
पेंग्विनच्या जोड्यांना आणखी तीन पिले
भायखळा मधील राणीच्या बागेतील अर्थात वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणीसंग्रहालयातील पेंग्विनच्या जोड्यांना आणखी तीन पिले झाली आहेत.यामध्ये दोन नर आणि एक मादी आहे. राणीच्या बागेतील पेंग्विनची संख्या २१ झाली आहे.
-
पुणे विमानतळावरून 235 विमानांची ये जा होणार
पुणे विमानतळावरुन आता 235 विमानांची ये जा होणार आहे. यापूर्वी दिवसाला 220 विमानांची ये जा होत होती. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी याबाबत हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल अमरप्रीत सिंग यांना पत्र लिहिले होते. त्यानंतर हवाई दलाकडून आता आणखी पंधरा विमानांना उड्डाणासाठी मंजुरी देण्यात आली आहे.
Published On - Jun 02,2025 8:16 AM
