AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra Breaking News LIVE : बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात आणखी एकाला अटक

| Edited By: | Updated on: Aug 29, 2025 | 7:46 AM
Share

Maharashtra Political News LIVE in Marathi : देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

Maharashtra Breaking News LIVE : बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात आणखी एकाला अटक
Breakin News

मनोज जरांगे पाटील मराठा समाजाच्या आरक्षण आणि इतर मागण्यासाठी मुबंई जात असताना अहिल्यानगर येथे पोहचतील आणि ते या ठिकाणी मराठा समाज बांधवशी संवाद साधतील. मनोज जरांगे पाटील जुन्नर मध्ये दाखल. रात्रभर ठीक ठिकाणी जरांगे पाटील यांचे स्वागत करण्यात आले. रात्री 9 वाजता मनोज जरांगे पाटील जुन्नर मध्ये मुक्कांच्या ठिकाणी येणार होते. जुन्नर मधील शिवाजी चौकात जरांगे पाटील यांचे स्वागत. जुन्नर तालुका सकल मराठा बांधवाकडून जल्लोषात स्वागत. मराठा आरक्षणावरून दादर स्टेशन परिसरात राजकीय बॅनरबाजी. मनोज जरांगेंच्या मुंबई कूचदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या समर्थनाचे लागले बॅनर. बॅनर वर मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांचा फोटोसह”इतिहास शिव्यांना नाही, कर्तृत्वाला लक्षात ठेवतो” असा मजकूर. मराठा समाजाला पहिल्यांदा आरक्षण देणारे फडणवीस असा बॅनरवर दावा करण्यात आला आहे.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 28 Aug 2025 08:15 PM (IST)

    मनोज जरांगे पाटील यांचं पुण्यात आगमन

    मनोज जरांगे पाटील पुण्यात पोहोचले असून, त्यांचं इथे भव्य स्वागत करण्यात आलं आहे.  यावेळी क्रेनच्या सहाय्याने मनोज जरांगे पाटील यांना हार घालून, त्यांचं जंगी  स्वागत करण्यात आलं आहे. मनोज जरांगे पाटील हे आंदोलनासाठी मुंबईच्या दिशेनं निघाले आहेत.

  • 28 Aug 2025 06:43 PM (IST)

    बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात आणखी एकाला अटक

    आमदार बाबा सिद्दी हत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. या हत्या प्रकरणातील आणखी एकाला अटक करण्यात आली आहे. मुंबई गुन्हे शाखेने आरोपी अमोल गायकवाड याला पुण्यातून अटक करण्यात आली आहे. गायकवाड हत्येआधी आणि नंतरही प्रमुख आरोपी शुबम लोणकरसह संपर्कात होता, अशी माहिती समोर आली आहे.

  • 28 Aug 2025 06:33 PM (IST)

    साईबाबा संस्थानचा भक्तांसाठी मोठा निर्णय

    साईभक्तांना शिर्डीत आता फ्री पार्कींग सुविधा देण्यात येणार आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते या सेवेचं लोकार्पण करण्यात आलं आहे. शिर्डीतील साईनगर परीसरात पार्कींगसाठी व्यवस्था करण्यात आली आहे. एकाच वेळेस हजारो वाहने उभी राहू शकतील इतक्या मोठ्या जागेवर पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच मंदिरात जाण्यासाठी भक्तांना मोफत बसचीही व्यवस्था करण्यात आली आहे.

  • 28 Aug 2025 06:17 PM (IST)

    नंदुरबारमधील नवापूर शहरात जोरदार पाऊस, अनेक भागात पाणीच पाणी

    नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर शहरात होत असलेल्या पावसामुळे अनेक भागात पाणी साचलं आहे. नवापूर शहरातील देवलफडी परिसरात अनेक घरात पावसाचं पाणी शिरलं आहे. देवळीफडी भागात घरात चार ते पाच फुटांपर्यंत पाणी साचलं आहे. त्यामुळे घरातील अनेक वस्तूचं नुकसान झालं आहे.

    तसेच सखल भागात पाणी साचलंय. त्यामुळे स्थानिकांना साचलेलं पाणी काढण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. पाण्याचा निचरा होण्यासाठी जेसीबीच्या सहाय्याने काम सुरू आहे.

  • 28 Aug 2025 06:06 PM (IST)

    नांदेडमधील मण्याड नदीने धोक्याची पातळी ओलांडली

    नांदेडमधील मण्याड नदी कंधार, मुखेड आणि देगलूर तालुक्यातून वाहते. या मण्याड नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे हजारो हेक्टर वरील शेती पिकांना त्याचा फटका बसला आहे. वझरगा, तुपशेगाव, गळेगाव यासह अनेक गावातील पिके पाण्याखाली गेली आहेत. त्यामुळे शेतकरी हवालदील झाला आहे.

  • 28 Aug 2025 05:55 PM (IST)

    नांदेडच्या नायगाव शहरात ढगफुटी सदृश्य पाऊस

    -नांदेडच्या नायगाव शहरात ढगफुटी सदृश्य पाऊस पडला. यामुळे सखल भागात पाणी साचलं आहे. नांदेड महानगरपालिकेचे अग्निशमन दलाचे जवान बचाव कार्यात सहभागी झाले आहेत.  नायगाव येथे सकाळपासून रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. सकाळपासून आयसर वाहनावर आसरा घेतला होता. 20 ते 25 जणांची सुखरूप सुटका केली.

  • 28 Aug 2025 05:45 PM (IST)

    राज ठाकरेंच्या घरी आम्ही येतो, यावर्षी नवीन लोकं पाहिली- शिंदे

    राज ठाकरेंच्या घरी नवीन लोकं पाहून आनंद झाला, असा टोला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला. एकनाथ शिंदे राज ठाकरे यांच्या घरी गणपतीच्या दर्शनाला गेले होते. यावेळी त्यांनी हे वक्तव्य केले.

  • 28 Aug 2025 05:31 PM (IST)

    शक्तिपीठ महामार्ग भूसंपादनाचा आदेश पारित

    शक्तिपीठ महामार्गाच्या भूसंपादनाचा आदेश पारित करण्यात आला आहे. यातून कोल्हापूर जिल्ह्याला वगळण्यात आलं आहे. फक्त वर्धा ते सांगली जिल्ह्यापर्यंत भूसंपादनाला मान्यता दिली आहे. महामार्गाच्या भूसंपादनासाठी 20 हजार 787 कोटी रुपये मंजूर केला आहे.

  • 28 Aug 2025 05:25 PM (IST)

    इंडिया अलायन्सचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार बी सुदर्शन रेड्डी उद्या मुंबईला भेट देणार

    इंडिया अलायन्सचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार बी सुदर्शन रेड्डी उद्या मुंबईला भेट देणार आहेत. या काळात ते उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान मातोश्रीला भेट देतील. ते सिल्व्हर ओक, शरद पवार आणि काँग्रेस नेत्यांसह महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांनाही भेटतील आणि त्यांना मतदान करण्याची विनंती करतील. यासोबतच ते दुपारी टिळक भवन येथे पत्रकार परिषदही घेतील.

  • 28 Aug 2025 05:03 PM (IST)

    सर्वतीर्थ टाकेद येथे दर्शनासाठी येणाऱ्या पीकअपला गाडीला अपघात

    इगतपुरी सर्वतीर्थ टाकेद येथे दर्शनासाठी येणाऱ्या पीकअपला गाडीला अपघात झाला.  रस्त्यावरील चिखलातून गाडी घसरत जाऊन रस्त्याच्या खाली पलटी झाली. या अपघातात पिकअपमधील दहा ते बारा महिला जखमी झाल्या आहेत.  मालेगावहुन ऋषिपंचमीनिमित्त दर्शन व स्नानासाठी महिला आल्या होत्या.  जखमींना पुढील उपचारासाठी सर्वतीर्थ टाकेद येथील रुग्णालयात दाखल केले आहे.

  • 28 Aug 2025 03:49 PM (IST)

    तर जरांगे पाटील यांनी अटक करा – लक्ष्मण हाके यांची मागणी

    आंदोलनासाठी घालून दिलेल्या अटी शर्तीचे पालन न केल्यास मनोज जरांगे पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करावी अशी मागणी ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केली आहे.

  • 28 Aug 2025 03:39 PM (IST)

    तीन महिने सरकार झोपा काढत होतं का – हर्षवर्धन सपकाळ

    सरकार लोकशाहीला घाबरत आहे, म्हणून ते कोर्टाला पुढ करत आहे अशी प्रतिक्रीया काँग्रेसचे नेते हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली आहे. गेल्या 3 महिन्यात सरकारने काय केलं ? सरकार झोपा काढत होतं का असाही सवाल त्यांनी केला आहे.

  • 28 Aug 2025 03:26 PM (IST)

    हत्या करण्यापूर्वी त्या प्रेमी युगुलांची धिंड काढली

    दोन दिवसांपूर्वी वडिलांनी आपल्या विवाहित मुलगी आणि तिच्या प्रियकराला हातपाय बांधून विहिरीत फेकले होते. नांदेडच्या उमरी तालुक्यातील करकाळा शिवारात  ही घटना घडली होती. आता त्या प्रेमी युगुलांची हत्या करण्यापूर्वी त्यांचे हात बांधून गावातून धिंड काढली होती अशी माहिती उघड झाली आहे

  • 28 Aug 2025 03:16 PM (IST)

    कायद्याच्या चौकटीबाहेर जाऊन कोणी वागू नये- देवेंद्र फडणवीस

    लोकशाही पद्धतीने आंदोलन करण्याचा अधिकार सगळ्यांना आहे. मात्र कायद्याच्या चौकटीबाहेर जाऊन कोणी वागू नये असा सल्ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जरांगे यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिला आहे.

  • 28 Aug 2025 02:57 PM (IST)

    आशिष विजय वाकोडे यांनी शेकडो कार्यकर्त्यांसहित काँग्रेसमध्ये प्रवेश

    मराठवाड्यातील शहीद लोकनेते विजय वाकोडे बाबा यांचे चिरंजीव आशिष विजय वाकोडे यांनी आज दादर टिळक भवन येथे शेकडो कार्यकर्त्यांसहित काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश केला आहे.

  • 28 Aug 2025 02:50 PM (IST)

    मुंबईमध्ये गणेशोत्सवामुळे गर्दी आहे, मनोज जरांगेंनी एकच दिवस आंदोलन करावं, शंभूराजे देसाई यांचा सल्ला

    मुंबईमध्ये गणेशोत्सव सुरु आहे. देश विदेशातून भाविक येतात त्यांची गैरसोय नको म्हणून मनोज जरांगे यांनी एक दिवसीय आंदोलन करावे असा सल्ला पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई यांनी तासगाव येथे बोलताना दिला. गणेश उत्सवात कोणतीही गैरसोय भाविकांची होऊ नये यामुळे त्यांनी एकच दिवस आंदोलन करावं याचबरोबर नियमांचाही पालन करावे असेही शंभुराजे देसाई यांनी म्हटलं आहे.

  • 28 Aug 2025 02:36 PM (IST)

    साधू महंतांचा कुंभमेळ्याच्या प्राधिकरणावर आक्षेप

    साधू महंतांचा कुंभमेळ्याच्या प्राधिकरणावर आक्षेप आहे. शासनाने तयार केलेल्या प्राधिकरणात साधू महंतांचा समावेश नसल्याने साधू महंत संतापले असल्याचं म्हटलं जातं. प्रशासकीय अधिकाऱ्यांनाच घेऊन प्राधिकरण स्थापन करणार असाल तर आमचा आक्षेप असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमधील तेरा आखाड्यांचे प्रत्येकी दोन प्रतिनिधी प्राधिकरणावर घ्या अशी नाशिकमध्ये आयोजित करण्यात आलेल्या संत संमेलनात साधू महंतांनी मागणी केली आहे.

  • 28 Aug 2025 02:29 PM (IST)

    नांदेड जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये पावसाचा हाहाकार, ढगफुटी सदृश्य पाऊस

    नांदेड जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये पावसाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. आमदार चिखलीकर यांनी मुख्यमंत्री फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना याबाबतची माहितीही दिली आहे. नांदेडच्या कंधार तालुक्यातील चिखली गावात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आहे. चिखली गावातील घरात पाणी शिरलं असल्याने अनेकांचे संसार उघड्यावर पडले आहेत. तसेच आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी केली.

  • 28 Aug 2025 02:11 PM (IST)

    विरार इमारत दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना 5 लाखांची मदत जाहीर

    विरार पूर्व नारंगी बायपास रोडवरील विजय नगर मध्ये जी रमाबाई अपार्टमेंट नावाची इमारत कोसळल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत 17 जणांचा मृत्यू झाला आहे. विरार इमारत दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना 5 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे.

  • 28 Aug 2025 01:57 PM (IST)

    खासदार विशाल पाटील यांच्या वक्तव्याची चर्चा

    उद्धव ठाकरेंची शिवसेना खूप लोकांनी सोडून देखील मुंबईमध्ये शिवसेनेला भरपूर मते पडतात.त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेकडून आपल्याला खूप काही शिकण्यासारखे आहे,मुंबईत मयताला खांदा देण्याचे काम देखील शिवसेना करत असते, असे म्हणत खासदार विशाल पाटील यांनी ठाकरेंच्या मुंबईमधील शिवसेनेच्या सेवाभावी कार्यपद्धतीचे कौतुक केले. सांगलीच्या जत मध्ये काँग्रेस कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना खासदार विशाल पाटील यांनी हे विधान केले आहे, लोकसभा निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेना उमेदवारामुळेच विशाल पाटील यांना अपक्ष खासदारकीची निवडणूक लढवावी लागली होती. त्यामुळे खासदार विशाल पाटील यांच्या या विधानाची राजकीय वर्तुळात बरीच चर्चा होत आहे

  • 28 Aug 2025 01:40 PM (IST)

    आंदोलकाला वाहिली श्रद्धांजली

    जुन्नर येथे सतीश देशमुख यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. त्यांना मनोज जरांगे आणि मराठा बांधवांनी शिवनेरीच्या पायथ्याशी श्रद्धांजली वाहिली.

  • 28 Aug 2025 01:30 PM (IST)

    न्याय मिळाल्याशिवाय शांत बसणार नाही

    मराठा आरक्षणाची लढाई सर्वांनीच हाती घेतली आहे. कायदा तोडायचा नाही. हातातोंडाशी आलेला घास गमावू नका. न्याय मिळाल्याशिवाय आता शांत बसणार नाही असा इशारा शिवनेरीच्या पायथ्याशी मनोज जरांगे पाटील यांनी दिले.

  • 28 Aug 2025 01:20 PM (IST)

    आता लोक ऐकणार नाहीत-धनंजय देशमुख

    मराठा आंदोलनात काल वैभवी देखील यामध्ये सहभागी झाली होती. माझ्यासह अनेक गाड्या घेऊन मस्साजोगचे गावकरी आंदोलनात सहभागी झालेले आहेत. परवा संतोष देशमुख हत्याप्रकरणाची सुनावणी असल्याने मी बीडला परत जाणार आहे. मस्साजोगचे गावकरी पूर्णवेळ या आंदोलनात सहभागी असतील. राशन सह लोक मुंबईत जात आहेत आता जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहणार आहे. 5000 लोकांची परवानगी दिली असली तरी मात्र आता लोक ऐकणार नाहीत अशी प्रतिक्रिया धनंजय देशमुख यांनी दिली.

  • 28 Aug 2025 01:10 PM (IST)

    ईरई धरणाची सर्व 7 सारे उघडली

    दमदार पावसामुळे चंद्रपूर शहरालगतच्या ईरई धरणाची सर्व 7 सारे उघडली, चंद्रपूर शहर आणि जिल्ह्यात गेले दोन दिवसांनी मुसळधार पाऊस पडत आहे. ऐन गणेशोत्सवात या पावसाने गणेश भक्तांची परीक्षा घेतली आहे. ईरई धरण सध्या 98 टक्के भरले असून धरणाची चार दारे अर्ध्या मीटरने तर दोन दारे पाव मीटरने उघडली आहेत.

  • 28 Aug 2025 01:00 PM (IST)

    नांदेड जिल्ह्यात पावसाचा हाहा:कार

    नांदेडच्या नायगाव शहरात पाणी शिरले. सुरक्षित ठिकाणी जाताना नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. पुराच्या पाण्यात अडकलेली कार नागरिकांनी ढकलून बाहेर काढली. नायगाव शहरातील अनेक नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने मोठ्या प्रमाणात संसार उपयोगी साहित्याचे नुकसान झाले.

  • 28 Aug 2025 01:00 PM (IST)

    ज्येष्ठ अभिनेते बाळ कर्वे यांचे निधन

    मराठी चित्रपटसृष्टीमधून एक दु:खद बातमी समोर येत आहे. ज्येष्ठ अभिनेते बाळ कर्वे यांचे निधन झाले आहे. वयाच्या 95व्या वर्षी त्यांचा मृत्यू झाला. मुंबईतील राहत्या घरात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने मराठी चित्रपटविश्वावर शोककळा पसरली आहे.

  • 28 Aug 2025 12:45 PM (IST)

    नांदेडमध्ये हिप्परगा येथे ढगफूटी

    नांदेडच्या मुखेड तालुक्यातील हिप्परगा येथे ढगफुटी झाली आहे. अचानक आलेल्या पाण्यामुळे अनेकांच्या घरात पाणी शिरले आहे. अनेक संसार उपयोगी गोष्टी पाण्याखाली गेल्या आहेत. पावसाचा जोर पाहता गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.

  • 28 Aug 2025 12:30 PM (IST)

    श्री सिद्धी महागणपती तीर्थक्षेत्रावर गणरायाच्या दर्शनासाठी राज्यभरातून भाविक

    गणेश उत्सव असल्यामुळे श्री सिद्धी महागणपती तीर्थक्षेत्रावर गणरायाच्या दर्शनासाठी राज्यभरातून भाविक येत असल्याचे पाहायला मिळत आहे. धुळे , नंदुरबार याबरोबरच राज्यभरातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमधील भाविक मोठ्या कुटुंबासह दर्शनासाठी येत असतात. मूर्तीच्या वैशिष्ट्यांबरोबरच या ठिकाणी 200 टन वजनाची घंटा तसेच इतरही अनेक वैशिष्ट्य असल्याने भाविक आवर्जून दर्शनासाठी येत असतात.

  • 28 Aug 2025 12:15 PM (IST)

    जालन्यातून हजारो मराठा बांधव रेल्वेने मुंबईकडे रवाना

    मनोज जरांगे पाटील उद्या सकाळी मुंबईच्या आझाद मैदानावरती उपोषण करणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर जालना जिल्ह्यातून हजारो मराठा बांधव रेल्वेने मुंबईकडे रवाना झाले आहे.

  • 28 Aug 2025 11:59 AM (IST)

    नाशिकमध्ये विश्व हिंदू परिषदेच्या संत संमेलनाला सुरुवात

    नाशिकमध्ये विश्व हिंदू परिषदेच्या संत संमेलनाला सुरुवात झाली आहे. गणेशोत्सव आणि आगामी सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर एक दिवसीय संत संमेलनाचे आयोजन करण्यात आलं आहे. नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमधे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळा कामांचा आढावा घेण्यात येणार आहे. बैठकीला अखिल भारतीय संत समितीचे राष्ट्रीय महामंत्री स्वामी जितेन्द्रनंद सरस्वती उपस्थित आहेत.

  • 28 Aug 2025 11:50 AM (IST)

    विरार इमारत दुर्घटनेत 15 जणांचा मृत्यू

    विरारच्या रमाबाई अपार्टमेंट या इमारतीमध्ये राहणाऱ्या रहिवाशांवर काळाने घाला घातला आहे. १० ते १२ वर्षांपूर्वीच्या चार मजली इमारतीचा एक भाग कोसळून २५ ते २६ जण मलब्याखाली दबले होते. तर वीसहून अधिक जणांना सुखरुप बाहेर काढण्यात आलं आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत 15 जणांचा मृत्यू झाला आहे.

  • 28 Aug 2025 11:40 AM (IST)

    नांदेडमध्ये पावसाचा हाहाकार

    नांदेडमध्ये पावसाचा हाहाकार सुरू असून नांदेड दक्षिण भागात जोरदार पाऊस कोसळतोय. नांदेडच्या नायगाव तालुक्यातील कोलंबी गावात पाणी शिरलंय. तर धो धो पावसात माणिकराव ठाकरे आणि खासदर रवींद्र चव्हाण यांचा पाहणी दौरा सुरू आहे.

  • 28 Aug 2025 11:30 AM (IST)

    मनोज जरांगे पाटील शिवाई देवी मंदिरात दाखल

    मनोज जरांगे पाटील हे जुन्नरमधील शिवाई देवी मंदिरात दाखल झाले आहेत. याठिकाणी त्यांच्या हस्ते देवीची आरती करण्यात येणार आहे.

  • 28 Aug 2025 11:20 AM (IST)

    आठवडाभराच्या विश्रांतीनंतर गोंदियात मुसळधार पाऊस

    आठवडाभराच्या विश्रांतीनंतर गोंदिया जिल्ह्यात आज सकाळी मुसळधार पावसाने हजेरी लावली. 1 तास बरसलेल्या या पावसामुळे ग्रामीण भागातील अनेक रस्त्यांना नाल्याचं स्वरूप आलं आहे. तर या पावसामुळे धान्य उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

  • 28 Aug 2025 11:10 AM (IST)

    जरांगे यांना पाठिंबा देण्यासाठी नाशिकमध्ये मराठा समाज बांधवांची बैठक

    नाशिक- जरांगे यांना पाठिंबा देण्यासाठी नाशिकमध्ये मराठा समाज बांधवांनी बैठकीचं आयोजन केलंय. नाशिकच्या कालिका मंदिरात बैठकीचं आयोजन करण्यात आलं असून त्यांनी जरांगे यांच्या आंदोलनाला एकमुखी पाठिंबा दिला आहे. अनेक आंदोलक मुंबईकडे रवाना होणार आहेत.

  • 28 Aug 2025 10:58 AM (IST)

    मुंबईत पावसाची सुरुवात; दादर आणि आसपास परिसरात पावसाची संतत धार सुरू

    सकाळपासून ढगाळ वातावरण; अधूनमधून पावसाचा जोर वाढत आहे… दुपारनंतर पावसाचा जोर वाढल्यास विसर्जनासाठी येणाऱ्या गणेश भक्तांना अडचणी होण्याची शक्यता.. दीड दिवसाच्या गणपती विसर्जनाची तयारी पावसामुळे प्रभावित होण्याची शक्यता…

  • 28 Aug 2025 10:50 AM (IST)

    जायकवाडी धरणाच्या 18 दरवाज्यातून गोदावरी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग;जायकवाडीचा पाणीसाठा ९८.५७ टक्क्यावर

    नाशिक येथे झालेल्या मोठ्या प्रमाणात मुसळधार पावसामुळे वरील धरणातून 51 हजार 725 क्युसेक वेगाने जायकवाडी धरणात पाण्याची आवक होत आहे. त्यामुळे सद्यस्थितीला जायकवाडी धरणाचा पाणीसाठा 97% च्या वर गेल्यामुळे 21 दिवसात सलग दुसऱ्यांदा जायकवाडी धरणाचे अठरा दरवाजे अडीच फुटांनी उघडून गोदावरी नदी पात्रात 47 हजार 160 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात आलाय. रात्रीतून आणखी पाण्याची आवक वाढल्यास नदीपात्रात विसर्ग वाढवण्यात येईल अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. त्यामुळे छत्रपती संभाजीनगर, जालना,बीड,परभणी,नांदेड या जिल्ह्यातील गोदावरी परिसरातील नागरिकांनी सतर्क रहावे अस आवाहन करण्यात आले…

  • 28 Aug 2025 10:37 AM (IST)

    नांदेड जिल्ह्यात जोरदार पावसाने पुन्हा कहर

    नांदेडच्या मुखेड तालुक्यातील लेंडी धरणातून विसर्ग सुरु… नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा… यापूर्वी लेंडी धरणा जवळील हसनाळ व रावणगाव येथील घर झाली उद्ध्वस्त…

  • 28 Aug 2025 10:16 AM (IST)

    फडणवीसांनी शब्दाला जागून मागण्या पूर्ण कराव्यात – संजय राऊत

    विधानसभेआधी सरकारने जरांगेंशी चर्चा केली होती… फडणवीसांनी शब्दाला जागून मागण्या पूर्ण कराव्यात… मराठी माणसाला मागण्यांसाठी आंदोलन करण्याचा अधिकार… गेली 10 वर्ष जातीजातीत भेदभाव करण्याचं काम… मुख्यमंत्र्यांनी आंदोलकांशी संवाद साधणं गरजेचं… असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे…

  • 28 Aug 2025 10:07 AM (IST)

    मराठ्यांनी थोडं संयमानं घ्यावं… मनोज जरांगे आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम

    मराठा समाजाने चालीवर चाल टाकायला शिकावं… आंदोलक भर पावसात मुंबईच्या दिशेने… समाजाच्या वेदना मुख्यमंत्र्यांनी समजून घ्याव्यात… जाणूनबुजून एक दिवसाची परवानगी दिली… फडणवीस आंदोलकांना थांबवणार नाही… अशी आशा… असं वक्तव्य मनोज जरांगे यांनी केलं आहे…

  • 28 Aug 2025 09:50 AM (IST)

    समाजाला मुर्ख बनवण्याचे काम करण्यात आले- जरांगे पाटील

    मनोज जरांगे पाटील यांनी नुकताच म्हटले की, समाजाला मुर्ख बनवण्याचे काम आतापर्यंत करण्यात आले आहे.

  • 28 Aug 2025 09:49 AM (IST)

    जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील अद्याप मतदारसंघात

    मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभुमीवर राज्य सरकारच्या भुमिकेकडे लक्ष. राधाकृष्ण विखे पाटील भेट घेणार अशी सुत्राची माहिती…

  • 28 Aug 2025 09:24 AM (IST)

    सोलापुरातील काँग्रेस पक्षातील मराठा समाजाचे पदाधिकारी मुंबईकडे रवाना

    यावेळी सकल मराठा समाजाच्या माध्यमातून काँग्रेसचे पदाधिकारी रेल्वेने मुंबईकडे रवाना झाले. मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही मुंबईला निघालो असल्याची माहिती

  • 28 Aug 2025 09:01 AM (IST)

    ताडदेवच्या वेलिंग्डन हाइट्समधील रहिवाशांना उच्च न्यायालयाकडून दिलासा नाही

    आजच घरे रिकामी करण्याचा आदेश. ताडदेव येथील वेलिंग्डन हाइट्स इमारतीच्या वरच्या १८ मजल्यांवरील रहिवाशांना आजच आपली घरे रिकामी करावी लागणार आहेत..

  • 28 Aug 2025 08:59 AM (IST)

    विरार इमारत दुर्घटना, 32 तासानंतरही रेस्क्यू ऑपरेशन सुरू

    विरार इमारत दुर्घटनाप्रकरणी 32 तासानंतरही रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. आतापर्यंत 24 जणांना रेस्क्यू करण्यात आले असून, 24 पैकी 15 जणांचे मृतदेह बाहेर काढले आहेत. आणखी 2 मृतदेह इमारतीच्या ढिगाऱ्याखाली असण्याची शक्यता आहे. 9 जणांवर वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

  • 28 Aug 2025 08:43 AM (IST)

    लालबागच्या राजाच्या नगरीत भाविकांची मोठी गर्दी

    लालबागच्या राजाच्या नगरीत भाविकांची मोठी गर्दी. आज राजकीय नेते आणि सेलेब्रिटी घेणार दर्शन. दुसऱ्या दिवशी देखील भाविकांची अलोट गर्दी

  • 28 Aug 2025 08:21 AM (IST)

    पुण्यात 35 हजार महिलांचे अर्थवशीर्ष पठण

    ॠषिपंचमीनिमित्त 35 हजार महिलांचे अर्थवशीर्ष पठण. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टकडून दरवर्षी अथर्वशीर्ष पठण. मंडळच्यावतीने ट्रस्टच्या 133 व्या वर्षी गणेशोत्सवात ॠषिपंचमीनिमित्त 35 हजार महिलांचे अर्थवशीर्ष पठण. पहाटे 6 वाजता ॠषिपंचमीनिमित्त दरवर्षीप्रमाणे 35 हजार महिलांचे सामुदायिकरीत्या अर्थवशीर्ष पठण.

  • 28 Aug 2025 08:19 AM (IST)

    मनोज जरांगे पाटील जुन्नर मध्ये दाखल

    मनोज जरांगे पाटील जुन्नर मध्ये दाखल. रात्रभर ठीक ठिकाणी जरांगे पाटील यांचे स्वागत करण्यात आले. रात्री 9 वाजता मनोज जरांगे पाटील जुन्नर मध्ये मुक्कांच्या ठिकाणी येणार होते. जुन्नर मधील शिवाजी चौकात जरांगे पाटील यांचे स्वागत.

  • 28 Aug 2025 08:18 AM (IST)

    गणपती आगमनानंतर विसर्जनासाठी मुंबई पालिका सज्ज

    दीड दिवसाच्या गणपतीपासून सात दिवस व अनंत चतुर्दशीच्य विसर्जन नियोजित. सार्वजनिक मंडळांच्या मोठ्या मुर्तींसाठी समुद्र परिसरात तर इतर घरगुती व लहान मोठ्यांसाठी शहरभर विविध ठिकाणी कृत्रिम तलाव उभारले गेले. निर्माल्य जमा करण्यासाठी मोठमोठ्या कुंड्यांची व्यवस्था. सार्वजनिक मंडळाच्या मुर्त्यांसाठी समुद्रकिनाऱ्यावर भरती-ओहोटीची माहिती देणारे फलक.

Published On - Aug 28,2025 8:16 AM

Follow us
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.