AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra Breaking News LIVE : वसईतील हॉलमध्ये लिफ्टमध्ये प्रवीण दरेकर अडकले

| Edited By: | Updated on: Jul 21, 2025 | 8:09 AM
Share

Maharashtra Political News LIVE in Marathi : देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

Maharashtra Breaking News LIVE : वसईतील हॉलमध्ये लिफ्टमध्ये प्रवीण दरेकर अडकले
फाईल फोटो

ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या ‘सामना’मधील मुलाखतीचा दुसरा आणि अंतिम भाग आज प्रसिद्ध झाला. सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी घेतलेल्या या मुलाखतीत ठाकरे यांनी विविध मुद्द्यांवरून टीका केली आहे. यावेळी त्यांनी राज ठाकरेंसोबत युती, महापालिका निवडणुका, पंतप्रधान नरेंद्र मोदींची निवृत्ती, धारावी प्रकल्प यावर भाष्य केले. तर दुसरीकडे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. मध्यरात्रीच्या सुमारास देवळाली ते नाशिक दरम्यान ओव्हरहेड वायर तुटल्याने डाऊन मार्गावरील वाहतुकीला फटका बसला. विशेष म्हणजे, अस्वली ते पाडळी दरम्यानची वायर दुरुस्त झाल्यानंतर लगेचच नाशिक रोडजवळ ही दुसरी घटना घडली. रेल्वेचे पथक युद्धपातळीवर काम करत असले तरी, यामुळे अप मार्गावरील गाड्या ५ ते ६ तास उशिराने धावत आहेत. तसेच येत्या २१ जुलैपासून पावसाळी अधिवेशन सुरु आहे. या पावसाळी अधिवेशनापूर्वी केंद्र सरकारने आज सकाळी ११ वाजता सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. या बैठकीत सरकार विरोधकांकडून सहकार्य मागण्याची शक्यता आहे. कारण सध्या विरोधक अहमदाबाद विमान अपघात, ऑपरेशन सिंदूर आणि मतदार यादी यांसारख्या मुद्द्यांवरून सरकारला घेरण्याची रणनिती आखताना दिसत आहेत. यासह देश-विदेश, राज्य, क्रीड, मनोरंजन अशा अनेक क्षेत्रांतील बातम्यांचे लेटेस्ट अपडेट्स मिळवण्यासाठी दिवसभर हा ब्लॉग फॉलो करा.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 20 Jul 2025 07:55 PM (IST)

    रत्नागिरी:आरेवारे येथील समुद्रात बुडून चौघांचा मृत्यू

    काल सायंकाळी रत्नागिरीतल्या आरेवारे येथील समुद्रात बुडून चौघांचा मृत्यू झाला आहे. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. समुद्रात पोहायला गेले असताना चौघांना लाटेने या चौघांना गिळंकृत केलं होतं.

  • 20 Jul 2025 07:41 PM (IST)

    छत्रपती संभाजीनगर: रेबीजच इंजेक्शन घेण्यासाठी संपूर्ण गावाची रुग्णालयात धाव

    छत्रपती संभाजीनगरच्या फारोळा गावात एक वेगळाच प्रकार घडला आहे. आठ दिवसांपूर्वी या गावातील एका गायीच्या वासराला पिसाळलेला कुत्रा चावला होता. काल सकाळी हे वासरू मृत्युमुखी पडले. विशेष म्हणजे वासरू गायीचं दूध पित असल्याने गायीला देखील याचं इन्फेक्शन झाल्याची अफवा गावात पसरली. या गाईचं दूध गावातील अनेक घरांना पुरवले जात होते. त्यामुळे आपल्याला देखील इन्फेक्शन होईल म्हणून अख्ख गावं शासकीय रुग्णालयात रेबीजच इंजेक्शन घेण्यासाठी पोहचले आहे.

  • 20 Jul 2025 07:27 PM (IST)

    नाशिकमध्ये चार बांगलादेशी महिलांना अटक

    क्राइम ब्रांच युनिट एकच्या पथकाने कारवाई कारवाई करत चार बांगलादेशी महिलांना अटक केली. या चार महिलांसह एका पुरुषालाही अटक करण्यात आली आहे. हे सर्वजण बनावट कागदपत्र तयार करून नाशिकमध्ये वास्तव्य करत असल्याची माहिती समोर आली आहे.

  • 20 Jul 2025 07:15 PM (IST)

    पुण्यात 25 वर्षीय तरुणीचा विनयभंग

    महाराष्ट्राची संस्कृती राजधानी म्हणून पुण्याची विशेष ओळख आहे. अशातच आता पुण्यातील धनकवडी परिसरात शंकर महाराज मठाजवळ राजधानी अपार्टमेंटमध्ये 45 वर्षीय अखिलेश राजगुरू नावाच्या भोंदू ज्योतिषानं 25 वर्षीय तरुणीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी सहकार नगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • 20 Jul 2025 07:07 PM (IST)

    नवी मुबंईत पावसाची हजेरी

    नवी मुबंईत पावसाची हजेरी

    जुईनगर आणि बेलापूर तसेच वाशी परिसरात पाऊस

    सर्वत्र ढगाळ वातावरण

    मोठ्या पावसाची शक्यता

  • 20 Jul 2025 06:54 PM (IST)

    नाशिकमधून चार बांगलादेशी महिलांना अटक

    नाशिकमधून चार बांगलादेशी महिलांना अटक

    क्राइम ब्रांच युनिट एकच्या पथकाने केली कारवाई

    चार महिलांसह एका पुरुषालाही करण्यात आली अटक

    बनावट कागदपत्र तयार करून नाशिकमध्ये होते वास्तव्यास

    पोलिसांच्या तपासात दासनामक व्यक्तीकडून बनावट कागदपत्र तयार करून घेतल्याचे उघड

  • 20 Jul 2025 06:15 PM (IST)

    बीड शहरातील एकनाथ नगर भागात चोरांचा सुळसुळाट

    बीड शहरातील एकनाथ नगर भागात पाण्याच्या टाकीजवळ चोरी झाल्याचं सीसीटीव्हीत कैद झाले आहे. यामुळे आता नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पाहायला मिळत आहे. या भागात आता नागरिकांकडून पोलीस गस्त घालण्याची मागणी केली जात आहे.

  • 20 Jul 2025 06:05 PM (IST)

    अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर पंढरपूर येथे पावसाला सुरुवात

    पंढरपूर ( सोलापूर ) –

    अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर पंढरपूर येथे पावसाला सुरुवात

    अचानक पाऊस सुरू झाल्याने नागरिकांची तारांबळ

    पाऊस आल्याने उकाड्यापासून काहीसा दिलासा

  • 20 Jul 2025 06:00 PM (IST)

    वसईतील हॉलमध्ये लिफ्टमध्ये प्रवीण दरेकर अडकले

    वसईतील हाँलमध्ये लिफ्टमध्ये प्रवीण दरेकर अडकले कार्यकर्त्यांनी लिफ्ट तोडून प्रवीण दरेकरांना बाहेर काढलं

    पाच ते सात मिनिट लिफ्टमध्ये प्रवीण दरेकर अडकले

  • 20 Jul 2025 05:28 PM (IST)

    बुलढाण्या तूर पिकांवर गेरूलसीड बिटल किडीचा प्रादुर्भाव

    बुलढाणा : तूर पिकांवर गेरूलसीड बिटल किडीचा प्रादुर्भाव ..
    उत्पादनात घट येण्याची शक्यता ..
    तर कृषी विभागाने शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याची गरज ..
  • 20 Jul 2025 04:40 PM (IST)

    नवी मुबंईत पावसाला सुरवात, सर्वत्र ढगाळ वातावरण

    नवी मुबंईतून मोठी बातमी समोर आली आहे. नवी मुबंईतून पावसाला सुरवात झाली आहे. जुईनगर आणि बेलापूर तसेच वाशी परिसरात पावसाने हजेरी लावली आहे. सर्वत्र ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे.

  • 20 Jul 2025 04:22 PM (IST)

    उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विधान भवनमध्ये खात्यांतर्गत बैठका

    उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विधान भवनमध्ये खात्यांतर्गत बैठका सुरु आहेत. या बैठकीला जिल्ह्यातील पोलीस विभाग महसूल विभागाचे अधिकारी हजर आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार बैठकीला पोहोचले आहेत. पुण्यातील विधान भवनात ही बैठक सुरू आहे.

  • 20 Jul 2025 04:05 PM (IST)

    दिवा स्थानकावर 20 दिवसांपासून आंदोलन सुरू, नक्की मागणी काय?

    दिवा स्थानकात 20 दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. रेल्वे प्रशासनाच्या निष्क्रीयतेवर आंदोलक संतप्त झाले आहेत. आंदोलकांनी एल्गार मोर्चा काढून रेल रोकोचा इशारा दिला आहे. फास्ट लोकल थांब्याच्या मागणीसाठी समाजसेविका अश्विनी केंद्रें यांच्याकडून धरणे आंदोलन केले जात आहे. आंदोलकांनी रेल्वे प्रशासनाच्या प्रतिकात्मक प्रतिकृतीचा निषेधपूर्वक तुडवून एल्गार केला आहे.

  • 20 Jul 2025 02:35 PM (IST)

    बुलढाण्यात राख वाहतूक; ट्रक चालकांचा निष्काळजीपणा

    भुसावळमधून अकोला आणि बुलढाणा जिल्ह्यात राख वाहतूक पाहायला मिळाली. ही राख वाहतूक करणाऱ्या ट्रक चालकांचा निष्काळजीपणा समोर आला आहे. तसेच नाशिकच्या प्रदुषणात 16 टक्क्यांनी वाढ झाल्याचं देखील समोर येत आहे.

  • 20 Jul 2025 02:12 PM (IST)

    मी कोणताही रमी खेळत नव्हतो: मंत्री माणिकराव कोकाटे

    कोकाटे रमी खेळत असतानाचा व्हिडीओ ट्वीट करण्यात आला.मात्र याला कोकाटे यांनी साफ नकार दिला आहे. “मी कोणताही गेम खेळत नव्हतो. मोबाईल स्क्रोल करताना जाहिरात समोर आली होती. आणि कोणीही व्हिडीओ काढू द्या मला फरक पडत नाही” असं म्हणत त्यांनी या गोष्टीला नकार दिला आहे.

  • 20 Jul 2025 01:45 PM (IST)

    गटारी निमित्ताने मटणाच्या दुकानासमोर लांबच लाब रांगा

    विरारमध्ये गटारी निमित्ताने मटणाच्या दुकानावर लांबच लाब रांगा लागल्या आहेत. आज रविवार आणि गटारी असल्याने मटण खवय्यांनी मटण खरेदीसाठी तोबा गर्दी झाली आहे. खवय्यांनी आतिश शिस्तीत रांगा लावून मटण खरेदी करण्यासाठी पसंदी दाखवली आहे.

  • 20 Jul 2025 01:30 PM (IST)

    कल्याणमध्ये ग्राहकाचा कपड्याच्या दुकानांमध्ये गोंधळ

    कल्याणमध्ये ग्राहकाने कपड्याच्या दुकानात मोठा गोंधळ घातल्याची घटना समोर आली आहे. तीस हजाराचा लेहंगा परत घेत नसल्याने चक्क सुरा काढून दुकानातच ‘घागरा’वर सुऱ्याने हल्ला केला आहे. दुकानदाराला ठार मारण्याची धमकी दिली, बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलीसांचा तपास सुरू केला आहे.

  • 20 Jul 2025 01:11 PM (IST)

    मुलींच्या स्वच्छतागृहात आढळला नाग

    शालेय विद्यार्थिनी स्वच्छतागृहात गेल्या असता त्यांना दरवाजा जवळच नागाचा लहान पिल्लू आढळून आला. यात्यांनी या घटनेची माहिती शाळेतील महिला शिक्षकांसह प्राचार्यांना दिली.प्राचार्यांनी घटनेची गंभीर दखल घेत स्वच्छतागृहाकडे जाणाऱ्या मुलींना थांबविले. सर्पमित्राला पाचारण केले. सर्पमित्र सुशिल शिल यांनी मोठ्या शिताफिने नाग सापाच्या पिल्लाला जिवंत पकडून दांडेगाव येथील जंगलात सोडून जीवनदान दिल्याची घटना घडली.

  • 20 Jul 2025 12:58 PM (IST)

    पावसामुळे वातावरण आल्हाददायक

    नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यात पावसामुळे सध्या आल्हाददायक वातावरण आहे तालुक्यात समाधानकारक पाऊस झाल्यामुळे तालुक्यातील अनेक धबधबे प्रवाहित झाले आहेत इगतपुरी तालुक्यातील भावली धबधबा ओसांडून वाहत आहे धबधबा पाहण्यासाठी नाशिक जिल्हा त्याचबरोबर राज्यभरातून अनेक पर्यटक या ठिकाणी आता येऊ लागले आहेत. पर्यटक ध्वनिक्षेपक लावून नृत्य करताना दिसत आहे.

  • 20 Jul 2025 12:50 PM (IST)

    संसदेच्या सर्व पक्षीय बैठकीला अजित पवार यांच्या पक्षाची दांडी

    पावसाळी अधिवेशनापुर्वी केंद्र सरकारने बोलावलेल्या बैठकीला महाराष्ट्रातून खासदार राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार यांच्या पक्षाकडून सुप्रिया सुळे, शिवसेना पक्षाकडून श्रीकांत शिंदे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाकडून अरविंद सावंत उपस्थित आहेत. मात्र, अजित पवार यांच्या पक्षाचा एकही नेता उपस्थित नाही. नियोजित दौरे असल्याने एकही नेता उपस्थित नाहीत.

  • 20 Jul 2025 12:34 PM (IST)

    धान्याची मोठी नासाडी

    मीरा भाईंदर पूर्वेकडील 41 फ 329 या रेशन दुकानात धान्याचे मोठ्या प्रमाणात नासाडी झाली. नागरिकांमध्ये संताप आहे. नवघर गाव, खंडोबा मंदिराजवळ असलेल्या भाईंदर पूर्वेतील रेशन दुकानाची अवस्था अतिशय धक्कादायक आहे. जिथे गोरगरीब लोक आपल्या हक्काच्या धान्यासाठी तासन्‌तास रांगेत उभे असतात, तिथे हा रेशन दुकानदार धान्याचे नुकसान करतोय. लोकांना ना व्यवस्थित धान्य मिळतंय, ना सन्मान. दुकानात गोंधळ, अपमान आणि बेशिस्तपणा यामुळे सामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत.

  • 20 Jul 2025 12:20 PM (IST)

    पावसाने डोळे वटारले

    नांदेड जिल्ह्यातील अनेक भागात 15 ते 20 दिवसापासून पावसाचा खंड पडला आहे. खरीप हंगाम धोक्यात आला. सोयाबीन पिकाने माना टाकल्या. माळरान जमिनीवरील सोयाबीन वाळायला सुरुवात झाली आहे. लागवड खर्च निघणे शक्य नसल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. सरकारने आम्हाला मदत करावी शेतकऱ्याची आर्त हाक दिली आहे.

  • 20 Jul 2025 12:10 PM (IST)

    वैर माझ्याशी होतं तर माझ्या या मातीची बदनामी का?

    200 दिवस न बोलता काढलेत. या दिवसांमध्ये झालेली एक गोष्ट माझ्या जिव्हारी लागली. बीड जिल्ह्याची बदनामी झाली. वैर माझ्याशी होतं तर माझ्या या मातीची बदनामी का? असा सवाल आमदार धनंजय मुंडे यांनी केला.

  • 20 Jul 2025 12:00 PM (IST)

    आखाड महिन्याचा शेवटचा रविवार पुणेकरांची मटण आणि चिकन मार्केटमध्ये गर्दी

    येत्या गुरुवारपासून पवित्र श्रावण महिन्याला सुरुवात होत आहे. त्यापूर्वी नॉनव्हेज प्रेमींनी आज पुण्यातल्या मटण आणि चिकन मार्केटमध्ये मोठी गर्दी केलेली पाहायला मिळत आहे..आज रविवारचा मुहूर्त साधत मटन खाण्यासाठी आजचा शेवटचा रविवार असल्याने पुणेकरांनी पहाटेपासून मोठी गर्दी या मटणाच्या दुकानाच्या बाहेर गेलेली पाहायला मिळत आहे.. पहाटे पाच पासून लोकांनी मोठी रांग पुण्यातील मटन दुकानांच्या बाहेर लावलेली आहे.तीन दिवसात श्रावण महिन्याला सुरुवात होत आहे त्यानंतर या नॉनव्हेज प्रेमींना मटण आणि चिकन खाता येणार नाही

  • 20 Jul 2025 11:50 AM (IST)

    “आमिर, शाहरुख रमी खेळतात, मग कोकाटे खेळले तर काय झालं?”

    शेतकरी आत्महत्या होत असताना कृषीमंत्री विधीमंडळात रमी खेळतायत. आमिर खान, शाहरुख खान रमी खेळतो. इतर हिरो रमी खेळतात मग माणिकराव कोकाटे रमी खेळले तर काय?, अशी प्रतिक्रिया प्रताप सरनाईकांनी दिली.

  • 20 Jul 2025 11:37 AM (IST)

    दहावी-बारावी विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा, शासन आपल्या दारी या कार्यक्रमाचे आयोजन

    शिवसेनेच्या वतीने दहावी आणि बारावी विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आणि शासन आपल्या दारी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये गोरेगावमधील नेस्को सेंटर येथे या कार्यक्रमाचे विशेष आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला आनंदराज अडसूळ, खासदार रवींद्र वायकर, शितल म्हात्रे उपस्थित आहेत.

  • 20 Jul 2025 11:20 AM (IST)

    संसदेत सर्वपक्षीय बैठकीला सुरुवात

    संसदेत सर्वपक्षीय बैठकीला सुरुवात झाली आहे. ठाकरे गटाकडून अरविंद सावंत तर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून सुप्रिया सुळे उपस्थित आहेत.

  • 20 Jul 2025 11:20 AM (IST)

    रमी खेळतानाचा कृषिमंत्र्यांच्या व्हिडीओवर संजय राऊतांची प्रतिक्रिया

    “शेतकऱ्यांना भेटायला कृषिमंत्रीला वेळ नाही. गेल्या काही काळापासून कृषिमंत्र्याची विधानं सगळ्यांनी पाहिली आहेत. अशा आमदारांना कृषी मंत्रीपद देऊन सरकारने महाराष्ट्राला कोणतं योगदान दिलं? कोणाचे व्हिडिओ पैशाच्या पेटीबरोबर तर कोणाचे व्हिडिओ खेळताना तर कोण चड्डी बनियानवर मारामारी करतात.. ही महाराष्ट्राची परिस्थिती आहे,” अशी टीका संजय राऊतांनी केली.

  • 20 Jul 2025 11:10 AM (IST)

    पवना नदीवरील दहा गावांना जोडणारा साकव लोखंडी पूल वाहतूकीसाठी कायमचा बंद

    मावळ तालुक्यातील दहा गावांना जोडणारा पवना नदीवरील लोखंडी साकव पूल आता वाहतुकीसाठी पूर्णतः बंद करण्यात आला आहे. मावळ तालुक्यात इंद्रायणी नदीवरील कुंडमळा येथील पूल पडून दुर्घटना घडली. त्यानंतर धोकादायक असणाऱ्या पूलावरून प्रशासनाने त्वरित वाहतूक बंद केली. पवना नदीवरील या पुलावरून देखील वाहतूक चारचाकी वाहनांसाठी बंद करण्यात आली होती. केवळ दुचाकी आणि पादचाऱ्यांना हा पूल वाहतुकीसाठी खुला ठेवण्यात आला होता. मात्र चारचाकी वाहनचालक प्रशासनाच्या दुर्लक्ष करत सर्रास वाहतूक करत होते.

  • 20 Jul 2025 10:57 AM (IST)

    आखाड महिन्याचा शेवटचा रविवार पुणेकरांची मटण आणि चिकन मार्केटमध्ये गर्दी

    येत्या गुरुवारपासून पवित्र श्रावण महिन्याला सुरुवात होत आहे. त्यापूर्वी नॉनव्हेज प्रेमींनी आज पुण्यातल्या मटण आणि चिकन मार्केटमध्ये मोठी गर्दी केलेली पाहायला मिळत आहे… आज रविवारचा मुहूर्त साधत मटन खाण्यासाठी आजचा शेवटचा रविवार असल्याने पुणेकरांनी पहाटेपासून मोठी गर्दी या मटणाच्या दुकानाच्या बाहेर गेलेली पाहायला मिळत आहे.. पहाटे पाच पासून लोकांनी मोठी रांग पुण्यातील मटन दुकानांच्या बाहेर लावलेली आहे.तीन दिवसात श्रावण महिन्याला सुरुवात होत आहे त्यानंतर या नॉनव्हेज प्रेमींना मटण आणि चिकन खाता येणार नाही .म्हणून आजच हे सगळे आपल्या आवडत्या नॉनव्हेज पदार्थावर ताव मारणार आहेत.. यासाठीच शहरातील सर्व दुकानांबाहेर मटण आणि चिकन खरेदीसाठी आता पुणेकरांच्या लांबच लांब रांगा दिसत आहेत… पुण्याच्या मटन मार्केट मधून आज जवळपास 3000 किलो मटणाची विक्री होण्याचा अंदाज विक्रेत्यांनी वर्तवला आहे..

  • 20 Jul 2025 10:47 AM (IST)

    देवळाली ते नाशिक रोड रेल्वे स्थानकादरम्यान ओव्हरहेड वायर तुटल्याने रेल्वे सेवा विस्कळीत

    रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून युद्ध पातळीवर काम सुरू देवळाली स्टेशनच्या पुढे असलेल्या संसरी गेटवर ओर हेड वायर तुटल्याने आठ ते दहा गाड्यांवर परिणाम… ओव्हर हेड वायर रिपेरिंग चे काम सुरू देवळाली रेल्वे स्थानकाजवळील संसरी गेट जवळ रेल्वेचे कर्मचारी अधिकारी दाखल… मेकॅनिकल विभागाच्या इंजिनसह कर्मचारी अधिकारी दाखल काम सुरू

  • 20 Jul 2025 10:30 AM (IST)

    पालकमंत्री प्रताप सरनाईकांकडून पोलीस विभाग फैलावर

    तुळजापुरात पोलिस विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक… तुळजापूर ड्रग्ज प्रकरण, तुळजापुरातील वाढते अवैध धंदे… पवनचक्की माफीयांची जिल्ह्यात वाढलेली गुंडगिरी, हायवेवर होणारी लुटमार आणि जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेचा बैठकीत आढावा… पवनचक्कीच्या वादातून पोलिसांकडून शेतकऱ्यांना मारहाणीचा मुद्दा विधानसभेत झाला होता उपस्थितीत

  • 20 Jul 2025 10:00 AM (IST)

    ठाकरे बंधू एकत्रच, कुणाला काही अडचण आहे का? – संजय राऊत

    ठाकरे बंधू एकत्रच, कुणाला काही अडचण आहे का? भविष्यातील घडामोडींकडे फक्त लक्ष ठेवून राहा… असं म्हणत संजय राऊत यांनी राज ठाकरेंच्या विरोधातील याचिकेवर देखील प्रतिक्रिया दिली, ‘ठाकरेंना गु्न्हे, याचिका काही नवीन नाहीत…’ असं संजय राऊत म्हणाले.

  • 20 Jul 2025 09:56 AM (IST)

    OHE ब्रेकडाऊनमुळे रेल्वे विस्कळीत; कसारा स्थानकावर प्रवाशांची गर्दी, नाशिककडे प्रवासासाठी वाहनांची वाट

    इगतपुरी-नाशिक दरम्यान ओव्हरहेड इक्विपमेंट (OHE) ब्रेकडाऊनमुळे रेल्वे सेवा ठप्प… कसारा स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी; नाशिककडे जाण्यासाठी खाजगी वाहनांचा आधार… सात गाड्यांचे मार्ग वळवले; साईनगर शिर्डी वंदे भारत एक्सप्रेस लोणावळामार्गे वळवली… कल्याण स्थानकातही प्रवाशांचा संताप; दिव्यातून गाड्या वळवल्याने प्रवास अधिक त्रासदायक

  • 20 Jul 2025 09:35 AM (IST)

    नाशिक ते देवळाली रेल्वे स्थानकाच्या दरम्यान ओव्हर हेड वायर तुटल्याने अप आणि डाऊन दोन्ही मार्गावरील रेल्वे सेवा विस्कळीत

    पंचवटी ,सेवाग्राम ,गरीब रथ हावडा मेल राजधानी एक्सप्रेस मनमाड छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल वंदे भारत एक्सप्रेस गाड्या लेट… रात्री अकरा वाजेच्या दरम्यान ओव्हर हेड वायर तुटल्याने रात्रीतूनच रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले काम… मात्र काम चालू असल्याने रेल्वे वाहतूक सेवा विस्कळीत… नाशिक रोड रेल्वे स्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी… मात्र आता रेल्वे वाहतूक सेवा सुरळीत

  • 20 Jul 2025 09:33 AM (IST)

    विदर्भ आणि कोकणात जोरदार पावसाची शक्यता, मुंबईत सध्या ढगाळ वातावरण

    मुंबईत सध्या सर्वत्र ढगाळ वातावरण आहे. हवामान खात्याने हलक्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे. दुसरीकडे, विदर्भ आणि कोकणातील सर्वच जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्राबद्दल बोलायचे झाल्यास, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज असून, इतर जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मराठवाड्यातही धाराशिव आणि लातूर जिल्ह्यांत काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे, तर इतर जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे.

  • 20 Jul 2025 09:31 AM (IST)

    पनवेल शहराचा स्वच्छ सर्वेक्षणमध्ये देशात 6 वा क्रमांक, ओडीएफमध्ये सर्वोच्च वॉटरप्लस मानांकन कायम

    पनवेल शहराने स्वच्छतेत मोठी प्रगती केली आहे. केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षण २०२४-२५ मध्ये, तीन ते दहा लाख लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये पनवेलने देशात सहावा क्रमांक पटकावला आहे. ही कामगिरी पनवेलच्या स्वच्छतेसाठी घेतलेल्या प्रयत्नांचे यश दर्शवते. इतकेच नाही, तर पनवेलने कचरामुक्त शहरासाठी थ्री-स्टार मानांकन आणि ओपन डेफिकेशन फ्री (ओडीएफ) मध्ये सर्वोच्च ‘वॉटरप्लस’ श्रेणी सलगपणे कायम ठेवली आहे.

  • 20 Jul 2025 09:24 AM (IST)

    मुक्ताईनगर तालुक्यात गतवर्षाच्या तुलनेत कपाशी लागवडीचे उत्पन्न 35 टक्क्याने घटलं

    तालुक्यात सर्वत्र मका लागवडीकडे कल शेतकऱ्यांचा वाढला असून 3500 हेक्टरवर मका लागवड केल्याची माहिती… कपाशीला भाव मिळत नसल्याने यावर्षी शेतकऱ्यांनी कपाशी लागवडीकडे फिरवली पाठ मक्याची सर्वाधिक लागवड केली… त्यातच सध्या शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहे… या बाबीचा आढावा आमच्या प्रतिनिधीने घेतला

  • 20 Jul 2025 09:18 AM (IST)

    मध्य रेल्वेची वाहतूक कोलमडली, गाड्या 5 ते 6 तास उशिराने

    मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. काल मध्यरात्रीच्या सुमारास देवळाली ते नाशिक दरम्यान ओव्हरहेड वायर तुटल्याने ही वाहतूक विस्कळीत झाली. ही घटना मध्य रेल्वेच्या डाऊन मार्गावर घडली. ज्यामुळे वाहतुकीला मोठा फटका बसला. विशेष म्हणजे, या घटनेच्या थोड्या वेळापूर्वीच अस्वली ते पाडळी दरम्यानची ओव्हरहेड वायर तुटली होती. तिचे काम पूर्ण झाल्यावर लगेचच नाशिक रोडजवळ ही दुसरी वायर तुटण्याची घटना घडली. रेल्वेचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून, ओव्हरहेड वायर पुन्हा बसवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र, या घटनेमुळे मध्य रेल्वेच्या अप मार्गावरील वाहतूक पूर्णपणे कोलमडली असून, गाड्या पाच ते सहा तास उशिराने धावत आहेत.

  • 20 Jul 2025 09:16 AM (IST)

    केंद्र सरकारचे उद्यापासून पावसाळी अधिवेशन, सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन

    येत्या २१ जुलैपासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनापूर्वी केंद्र सरकारने आज सकाळी ११ वाजता एक सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. केंद्र सरकारचे पावसाळी अधिवेशन २१ ऑगस्टपर्यंत चालेल. या बैठकीत सरकारकडून विविध पक्षांकडून सहकार्य मिळवण्याचा प्रयत्न केला जाण्याची शक्यता आहे. कारण विरोधकांनी विमान अपघात, ऑपरेशन सिंदूर आणि मतदार यादी पुनरावलोकन यांसारख्या मुद्द्यांवरून सरकारला घेरण्याची रणनीती आखली आहे. या संभाव्य संघर्षातून मार्ग काढण्यासाठी सरकार आज विरोधकांना सहकार्य करण्याचे आवाहन करण्याची शक्यता आहे.

Published On - Jul 20,2025 9:06 AM

Follow us
मराठी अन् मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी ठाकरे बंधूंची रणनिती ठरली
मराठी अन् मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी ठाकरे बंधूंची रणनिती ठरली.
मोदी आणि एपस्टीनचं काय नातं? एपस्टीन प्रकरणावरून चव्हाणांचा थेट सवाल
मोदी आणि एपस्टीनचं काय नातं? एपस्टीन प्रकरणावरून चव्हाणांचा थेट सवाल.
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश.
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा.
BMC निवडणुकीसाठी मनसे अ‍ॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी
BMC निवडणुकीसाठी मनसे अ‍ॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी.
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार.
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं..
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं...
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?.
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!.