Maharashtra Breaking News LIVE 9 April 2025 : मुंबईतील वॉटर टँकर सेवा बंद होणार, कारण काय?
Maharashtra Political News LIVE in Marathi : आज 9 एप्रिल 2025. देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची INSCR 2025 पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. बेटी बचाओ बेटी पढाओ मोहिमेच्या अंमलबजावणीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची INSCR 2025 पुरस्काराने सन्मानित करण्यासाठी निवड करण्यात आली आहे. देशभरात वक्फ विधेयक अखेर लागू करण्यात आला आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने अधिसूचना जारी केली आहे.राष्ट्रपतींच्या सहीनंतर वक्फ सुधारणा विधेयक देशभरात लागू करण्यात आला आहे. तात्काळ अंमलबजावणी करण्याचे निर्देश देखील केंद्रीय गृह मंत्रालयाने दिले आहेत. नांदेड जिल्ह्यातील कठडे नसलेल्या विहिरीला एका महिन्यात कठडे बांधून घेण्याचे जिल्हाधिकारी यांचे आदेश. नांदेडच्या आलेगाव शिवारात ट्रॅक्टर विहिरीत पडून सात महिलांचा मृत्यू झाला होता. गोंदिया येथे 60 हजारांवर विद्यार्थी पोषण आहारापासून वंचित आहेत. तांदळाचा पुरवठा न झाल्याने समस्या समोर आली आहे. शाळांचा पोषण आहार तयार करण्यासाठी अन्नधान्याचा पुरवठा करण्याची मागणी शाळांकडून करण्यात आली. पण अद्यापही शाळांना अन्नधान्याचा पुरवठा झालेला नाही. यासह राज्यातल्या, देशभरातल्या सामाजिक, राजकीय, क्रीडा व इतर विषयातील महत्वाच्या बातम्या व अपडेट्स जाणून घेण्यासाठी दिवसभर हा ब्लॉग फॉलो करत रहा…
LIVE NEWS & UPDATES
-
वक्फ बोर्ड सुधारणा कायद्याविरोधात धाराशिवमध्ये मुस्लीम बांधवांचे आंदोलन
वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकाच्या विरोधात धाराशिव येथे मुस्लीम बांधवांच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालया समोर आंदोलन करण्यात आलं, तसेच या विधेयकाविरोधात स्वक्षरी मोहीम देखील घेण्यात आली.
-
पवनचक्कीतील तांब्याच्या तारा लुटणारी टोळी जेरबंद, धाराशिवमध्ये मोठी कारवाई
धाराशिव जिल्ह्यातील नळदुर्ग पोलीस ठाणे हद्दीत गंधोरा पाटी येथील पवनचक्कीवर झालेल्या जबरी चोरी प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत तीन आरोपींना अटक केली आहे. या आरोपींकडून सात गंभीर गुन्ह्यांची उकल झाली असून, एका सुमो गाडीसह तब्बल १२ लाख २३ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.
-
-
ठाणे ते मागाठाणे बोरिवली भुयारी मार्गातील अडथळा दूर
ठाणे ते बोरिवली भुयारी मार्गांत अडथळा ठरणाऱ्या बोरिवलीतील झोपडीधारकांचे तात्पुरते पुनर्वसन
एमएमआरडीएच्या माध्यमातून बोरिवली ते ठाणे भुयारी मार्गाचं काम लवकरच होणार सुरू
मागाठाणे येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाजवळील 87 झोपडीधारकांना संक्रमण शिबिराच्या चाव्या सुपूर्द
पुढील आठवड्यात प्रत्यक्ष कामाला होणार सुरुवात
-
मुंबईतील वॉटर टँकर सेवा बंद होणार, कारण काय?
सेंट्रल ग्राउंड वॉटर ओथोरिटीने घातलेल्या अटीची अमलबजावणी मुंबईमध्ये लागू करण्यास सुरुवात झालेली असताना आता मुंबईवर पाणी बाणी येण्याची शक्यता आहे. कारण आज मध्यरात्री पासून मुंबई वॉटर टँकर असोसिएशनच्या सदस्यांनी १५०० टँकरचा पाणीपुरवठा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने ज्या अटी घातल्या आहेत, त्या मुंबईत पाळणे अशक्य आहे. त्या अटीमध्ये सूट मिळायला हवी, नाईलाजाने हा पाणीपुरवठा बंद करावा लागत आहे. यामुळे मोठा परिणाम मुंबईवर होईल अशी प्रतिक्रिया या टँकर असोसिएशन च्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.
-
जळगावात तापमानाचा पारा मठ्ठ्याच्या दुकानावर नागरिकांची गर्दी
जळगावात तापमानाचा पारा वाढल्यामुळे मठ्ठ्याच्या दुकानावर नागरिकांची गर्दी वाढली. जळगावात तापमानाचा पारा 43 अंशांवर पोहोचल्याने उन्हापासून बचावासाठी नागरिक शीतपेयांचा आधार घेत आहे. जळगावात दिव्याग संस्थेच्या प्रसिद्ध अशा दिलखुश मठ्ठा विक्रीच्या दुकानावर मठ्ठा पिण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. सकाळी 10 वाजेपासून ते रात्री उशिरापर्यंत मठ्ठा पिण्यासाठी नागरिकांची गर्दी होत असल्याचे पाहायला मिळत आहे.
-
-
राहुल गांधी यांचे विधान निगेटिव्ह घेण्याची गरज नाही – अभिषेक मनु सिंघवी
राहुल गांधी यांनी आमच्यासमोर कालच्या बैठकीत सगळ्या समुदायाचे आकडे ठेवले आहेत. मोठ्या समुदयाचे आकडे त्यांनी बैठकीत सांगितले होते असे काँग्रेस नेते अभिषेक मनु सिंघवी यांनी म्हटले होते. सगळ्यांना सोबत घेऊन जाण्याची गोष्ट त्यांनी केली आहे. राहुल गांधी यांनी मुस्लीम, दलित, यांच्यात अडकल्याने ओबीसी आम्हाला सोडून गेल्याचे विधान केले होते.
-
सोलापुरात 68 वर्षीय वृद्ध व्यक्तीने केला 3 शाळकरी मुलींचा विनयभंग
शाळेत शिकणाऱ्या 13 वर्षीय तीन मुलींना पाहून अश्लील वर्तन केल्याप्रकरणी 68 वर्षीय वृद्ध व्यक्ती विरोधात गुन्हा नोंद
-
22 कोटी कर तत्काळ भरा अन्यथा जप्ती – मंगेशकर रुग्णालयाला महापालिकेची नोटीस
थकीत 27 कोटींपैकी 22 कोटी कर तत्काळ भरा अन्यथा महापालिका दोन दिवसांत जप्तीची नोटीस काढणार, अशी नोटीस दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाला महापालिकेतर्फे बजावण्यात आली आहे.
-
मोठी चूक ही डॉ घैसासांची होती, त्यांनी राजीनामा दिला पण त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे – आमदार अमित गोरखेंची मागणी
धर्मादाय आयुक्त आणि यमुना जाधव यांच्या एकत्रित समितीचा अहवाल त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडे पाठवला आहे,थेट फडणवीसांकडे तो अहवाल गेल्याने मला तो पाहायला मिळाला नाही. मात्र माता मृत्यू अहवाल अद्याप येणं बाकी आहे तो आज येण्याची शक्यता आहे. येणारे सगळे अहवाल हे भिसे कुटुंबियांच्या बाजूने असतील.
मी पुन्हा एकदा सांगतो दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे काम चांगलं आहे, ते करत राहतील. पण या प्रकरणात मोठी चूक ही डॉ घैसासांची होती. त्यांनी राजीनामा दिला आहे, मात्र त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी मागणी आ. अमित गोरखे यांनी केली.
-
पालघर मध्ये डॉक्टरने 73 वर्षीय वृद्ध महिलेला चिरडलं
पालघर मध्ये डॉक्टरने 73 वर्षीय वृद्ध महिलेला चिरडलं, वृद्ध महिलेला 8 ते 10 फूट फरफटत नेल्याची माहिती समोर आली आहे.
बोईसरच्या बीएआरसी (तारापूर अनुविद्युत केंद्र रहिवासी संकुल) मधील धक्कादायक घटना आहे. टेप्स हॉस्पिटल मधील डॉक्टर ए . के. दास याचं गाडीवरून नियंत्रण सुटल्याने अपघात झाला. अपघातात वृद्ध महिला छायालता आरेकर (73) यांचा जागीच मृत्यू
-
जळगावात गॅस दरवाढीच्या विरोधात राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन
जळगावात राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीने गॅस दरवाढीच्या विरोधात राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. महामार्गाच्या मधोमध गॅस सिलेंडर ठेवून जोरदार घोषणाबाजी करत राष्ट्रवादी पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या वतीने सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला.
-
तनिषा भिसेंच्या मृत्यूनंतर पिंपरी पालिकेला जाग, 650 रुग्णालयांना नोटिसा
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने उपचारापूर्वी अॅडव्हान्ससाठी मुजोरी दाखवल्याने तनीषा भिसेंचा या गर्भवती महिलेचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यात संतापाची लाट उसळली. या घटनेमुळे राज्यातील वातावरण ढवळून निघाले. त्यानंतर पिंपरी चिंचवड पालिकाही खडबडून जागी झाली आहे. पालिकेच्या वैद्यकीय विभागाने 650 रुग्णालयांना नोटीसा बजावल्या आहेत. कोणत्याच रुग्णांकडून अॅडव्हान्स घेऊ नका, असं घडल्यास रजिस्ट्रेशन रद्द करण्यात येईल, असा इशाराच पालिकेने या नोटीसीद्वारे दिला आहे.
-
सुप्रिया सुळे यांचं पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे. भोर तालुक्यातील रस्त्याच्या संदर्भात हे आंदोलन सुरू आहे. बनेश्वर देवस्थानाकडे जाणारा रस्ता बनवण्याची मागणी केली जात आहे. पण प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करत असल्याने सुप्रिया सुळे यांनी ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे.
-
नांदेडमध्ये अपघातात विद्यार्थी ठार, दोघे जखमी
नांदेडच्या मुखेड तालुक्यातील चांडोळा – बोरगाव रस्त्यावर भीषण अपघात झाला आहे. दुचाकी – ट्रॅक्टरच्या धडकेत शाळकरी विद्यार्थी ठार झाला असून दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. जखमी शाळकरी विद्यार्थ्यांवर मुखेडच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. धनजवरून मुखेडकडे दुचाकीवर बसून परीक्षेला जाताना हा अपघात झाला.
-
सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस
अक्कलकोट तालुक्यातील आंदेवाडी खु, शावळ, कुंभार वस्ती, वागदरी, शिरवळ, बादोले आधी भागात काल सायंकाळी वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला. तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने शेतात ठिकठिकाणी पाणीच पाणी झाले आहे. वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याने अनेक भागातील झाडे जमीनदोस्त झाली आहेत. अक्कलकोट तालुक्यातील अनेक शेतीपिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी मात्र चिंतेत आहेत.
-
संतोष देशमुख हत्याकांडाला चार महिने पूर्ण, धनंजय देशमुख गहिवरले
संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला आज चार महिने पूर्ण होत आहेत. त्यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. आजही तो क्षण डोळ्यासमोर येतो. या चार महिन्यात सर्वच जाती धर्माच्या लोकांनी आम्हाला न्याय देण्याचे काम केले. बीड पोलिस अधीक्षक नवनीत कांवत यांची कामगिरी चांगली आहे. मात्र त्याच्या खालची टीम देखील चांगली कामगिरी केली पाहिजे. वकील उज्ज्वल निकम यांच्यावर आमचा विश्वास आहे. ते आम्हाला न्याय मिळवून देतील अशी अपेक्षा आहे, असं धनंजय देशमुख म्हणाले. संतोष देशमुख यांच्या आठवणीने त्यांना गहिवरून आले होते.
कृष्णा आंधळे का सापडत नाही? हा मोठा प्रश्न आहे. बीड पोलिसांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती जाहीर करावी. फास्ट ट्रॅक कोर्टात सुनावणी व्हावी आणि आरोपींना लवकर शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.
-
अक्कलकोट तालुक्यात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस, अनेक भागातील झाडे जमीनदोस्त
सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस
अक्कलकोट तालुक्यातील आंदेवाडी खु , शावळ, कुंभार वस्ती, वागदरी, शिरवळ, बादोले आधी भागात काल सायंकाळी वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस.
तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने शेतात ठिकठिकाणी पाणीच पाणी झालं असून अनेक भागातील झाडे जमीनदोस्त झाली आहेत.
-
गर्भवती महिलेच्या मृत्यूप्रकरणी मंगेशकर रुग्णालय दोषी, मंगेशकर रुग्णालयावर कारवाई होण्याची दाट शक्यता – सूत्रांची माहिती
गर्भवती महिलेच्या मृत्यूप्रकरणी मंगेशकर रुग्णालय दोषी असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राज्य सरकारच्या दोन्ही अहवालांमध्ये मंगेशकर रुग्णालयावर ठपका ठेवण्यात आला आहे. यामुळे मंगेशकर रुग्णालयावर कारवाई होण्याची दाट शक्यता आहे.
-
मुंबई विमानतळावर विमानावर मधमाश्यांचा हल्ला
मुंबई विमानतळावर विमानावर मधमाश्यांचा हल्ला; क्वीक रिस्पॉन्स टीमने वेळेवर परिस्थिती आटोक्यात आणली.
आकासा एअरच्या मुंबईहून दिल्लीला जाणाऱ्या विमानावर बे नंबर A1 वर थांबले असताना अचानक मधमाश्यांचा थवा जमू लागला. पाहता पाहता संपूर्ण विमानाभोवती मधमाश्यांचा गराडा पडला. एअरपोर्टवरील क्वीक रिस्पॉन्स टीमने त्वरीत प्रतिसाद देत मधमाश्यांना हुसकावून लावले. यासाठी सुरक्षित आणि पर्यावरणस्नेही पद्धती वापरण्यात आली, अशी माहिती सूत्रांनी दिली.
-
रोहित पवारांचा उपसभापती राम शिंदेंवर निशाणा
घटनात्मक पदाची गरिमा कमी होणार नाही याची काळजी घ्यावी , असे म्हणत रोहित पवार यांनी विधानपरिषद उपसभापती राम शिंदेंवर निशाणा साधला आहे.
-
भाजप ग्रामीण अध्यक्षपदाच्या निवडणुकीत राडा
अमरावतीच्या अंजनगाव सुर्जी येथील भाजप शहर ग्रामीण अध्यक्षाच्या निवडणुकीत गदारोळ. भाजप ग्रामीण अध्यक्षपदाच्या निवडणुकीत राडा. अंजनगाव सुर्जीच्या शासकीय विश्रामगृह येथे हमरी तुमरी, वादविवाद. मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित.
-
गोदावरी प्रदूषण बाबत मनसे आक्रमक
गोदावरी प्रदूषण बाबत मनसे आक्रमक. मनसे कार्यकर्त्यांच्या गोदावरीत उड्या मारत आंदोलन. गोदावरी स्वच्छ झाली पाहिजे यासाठी आंदोलन.
-
रेपो रेट संदर्भात RBI चा महत्त्वाचा निर्णय
घर आणि कारचा हप्ता कमी होणार. रेपो रेट 6.25 टक्क्यावरुन 6 टक्क्यावर. RBI चा सर्वसामान्य नागरिकांना दिलासा. RBI कडून रेपो रेट 0.25 टक्क्याने कमी.
-
भारताचे पंतप्रधान ट्रम्प विरोधात गप्प बसलेत – संजय राऊत
भारताचे पंतप्रधान ट्रम्प विरोधात गप्प बसलेत. इतर देश ट्रम्प विरोधात उभे राहिलेत, मोदी मात्र गप्प. मोदी विष्णूचे अवतार मग ट्रम्पवर सुदर्शन चक्र सोडलं पाहिजे असं संजय राऊत म्हणाले.
-
सातारा: फलटणचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांना घरचा आहेर
सातारा: फलटणचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांना घरचा आहेर मिळाला आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे सचिन पाटील यांनी उत्तर कोरेगावच्या पाणी प्रश्नाबाबत रामराजेंच्या नव्याने सुरू होणाऱ्या संघर्ष समितीवर टीका केली. मागील तीस वर्षात सत्तेत असूनही उत्तर कोरेगाव भागातील 26 गावांचा पाणी प्रश्न सोडवला नाही. संघर्ष समितीचे सर्व संपले असून आता आपलं वय झालंय संघर्ष करून उपयोग होणार नाही. तुम्ही संघर्ष करा आम्ही उत्तर कोरेगावातील 26 गावांना न्याय द्यायचे काम करू, अशी टीका रामराजेंचे नाव न घेता त्यांच्याच पक्षाचे आमदार सचिन पाटील यांनी केली.
-
२६/११ चा मास्टरमाइंड तहव्वुर राणाला आज रात्री भारतात आणण्याची शक्यता
२६/११ चा मास्टरमाइंड तहव्वुर राणाला आज रात्री भारतात आणण्याची शक्यता आहे. २६/११ हल्ल्याचा सूत्रधार तहावुर राणा लवकरच भारताकडे प्रत्यार्पित केला जाऊ शकतो अशी सूत्रांची माहिती आहे. एनआयएची एक टीम अमेरिकेत पोहोचली असून प्रत्यार्पणासाठी सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाली आहे. NIA टीम लवकरच भारतात दाखल होणार आहे.
-
सैफवरील चाकूहल्ल्याप्रकरणी हजार पानी चार्जशीट दाखल
अभिनेता सैफ अली खानवरील चाकूहल्ल्याप्रकरणी हजार पानी चार्जशीट दाखल केल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली. सैफ अली खानवर 16 जानेवारी रोजी त्याच्याच राहत्या घरी एका चोराने चाकूहल्ला केला होता.
-
अहमदाबाद- साबरमती तटावर आज काँग्रेस एकवटणार
अहमदाबाद- साबरमती तटावर आज काँग्रेस एकवटणार आहे. अहमदाबादमधील साबरमती तटावर अखिल भारतीय काँग्रेस कमिटीची बैठक आहे. आज अधिवेशनाचा दुसरा दिवस असून थोड्याच वेळात राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी दाखल होणार आहेत. देशभरातील काँग्रेसचे सर्व आमदार खासदार आणि अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सदस्य उपस्थित राहणार आहेत.
-
येत्या 16 एप्रिलला अमरावती विमानतळाचा लोकार्पण सोहळा..
येत्या 16 एप्रिलला अमरावती विमानतळाचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. अमरावतीवरून मुंबईला जाणाऱ्या पहिल्याच विमानाची तिकिटं फुल झाली आहेत. 16 एप्रिलला अमरावती विमानतळावरून पहिलं विमान मुंबईच्या दिशेने झेपावणार आहे. अलायन्स एअरलाइनवर विमान प्रवासाची जबाबदारी आहे. काही वेळेतच तिकिटं बुक झाली आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे, नितीन गडकरी, केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, चंद्रशेखर बावनकुळे या विमानाने प्रवास करणार आहेत.
-
धाराशिवच्या शासकीय रुग्णालयास संगनमत करून बनावट औषधे पुरवठा करणाऱ्या चार जणांवर गुन्हा दाखल
धाराशिवच्या शासकीय रुग्णालयास संगनमत करून बनावट औषधे पुरवठा करणाऱ्या चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धाराशिवच्या अन्न व औषध प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. खोटी कागदपत्रे तयार करून बनावट कंपनीच्या नावे औषधी तयार करून शासकीय रुग्णालयात पुरवठा केला. धाराशिव जिल्ह्यातील सर्वच शासकीय रुग्णालयाला ही बनावट औषध पुरवठा झाल्याची माहिती समोर येत आहे.
-
Maharashtra Breaking : नाशिककर उन्हाने भाजले, तापमान ४१ अंशांवर
किमान तापमानात देखील वाढ 21 अंशावर… दुपारच्या वेळी नाशिक शहरातील बाजारपेठ रस्ते ओस… आज देखील नाशिकमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा… सर्वच शासकीय यंत्रणांना अलर्ट जारी… मनपा, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन, आरोग्य, पोलिस विभागाला उपाययोजनांच्या सूचना..
-
Maharashtra Breaking : जिल्ह्याला पाणीटंचाईचे चटके पाच तालुक्यांत १४ टँकरने पाणीपुरवठा
नाशिक: जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पाणीटंचाईचे संकट दिवसेंदिवस गडद.. उन्हाचा पारा वाढू लागल्यामुळे धरणांतील पाणीसाठ्याबरोबरच जिल्ह्यातील काही भागात भूजल पातळी घटली… पाच तालुक्यातील वाड्या, वस्त्यांवर, गावात पाण्याचे दुर्भिक्ष्य लागले जाणवू… जिल्ह्यातील इगतपुरी, सिन्नर, येवला, सुरगाणा आणि पेठ या तालुक्यात टँकर सुरू करण्यासाठी प्राप्त झालेल्या प्रस्तावांना जिल्हा प्रशासनाची मंजुरी…
-
Maharashtra Breaking : प्रेमप्रकरणातून टोळक्याने युवकावर केले सपासप वार
नाशिकच्या सिडको परिसरात असलेल्या त्रिमूर्ती चौकात घडली घटना… टोळक्याने धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला करत जीवे ठार मारण्याचा केला प्रयत्न… बहिणीसोबत प्रेमसंबंध असल्याच्या संशयातून भावासह त्याच्या मित्रांनी केला तरुणावर हल्ला… घटनेत सागर कोळी हा तेवीस वर्षे युवक गंभीर जखमी… दोन अल्पवयीनांसह तिघांना अंबड पोलिसांनी घेतले ताब्यात…
-
Maharashtra Breaking : काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनाचा आज दुसरा दिवस
देशातील दलित मुस्लिम आणि ब्राह्मणांमध्ये काँग्रेस पक्ष अडकला म्हणूनच ओबीसींनी आमची साथ सोडली…. काँग्रेस नेते विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची अधिवेशनात कबुली… काँग्रेस पक्षाच्या कार्यकारिणीच्या बैठकीत बोलताना राहुल गांधी यांची कबुली… पक्षाने कुणालाही न घाबरता देशातले मुद्दे उचलले पाहिजेत.. अल्पसंख्यांक बद्दल किंवा मुस्लिमांबद्दल काँग्रेस बोलल्यानंतर टीका होते तरीही पक्षाने हेच मुद्दे उचलले पाहिजेत राहुल गांधी यांचे मत..
-
Maharashtra Breaking : अनधिकृत फलकांवर पिंपरी- चिंचवड महानगर पालिकेची जोरदार कारवाई सुरु
‘ग’ आणि ‘ह’ प्रभागात आमदार शंकर जगताप आणि आमदार महेश लांडगेंच्या फलकांवर कारवाई करण्यात आली… अतिउत्साही कार्यकर्ते अशा प्रकारे अनधिकृत फलक लावतात. या आधीही अशा फलकांवर कारवाई करण्यात आलेली आहे… काही दिवसांपूर्वी अनधिकृत फलकांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कारवाईचा इशारा दिला होता…
Published On - Apr 09,2025 7:56 AM
