AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra Breaking News LIVE 22 June 2025 : औरंगजेब यांना केवळ राजकारणासाठी बदनाम केलं गेलं : माजी आमदार आसिफ शेख

Updated on: Jun 23, 2025 | 8:21 AM
Share

Maharashtra Political News LIVE in Marathi : आज 22 जून 2025. देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

Maharashtra Breaking News LIVE 22 June 2025 : औरंगजेब यांना केवळ राजकारणासाठी बदनाम केलं गेलं : माजी आमदार आसिफ शेख
फाईल फोटो

बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्यासाठी मतदान पार पडत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. या निवडणुकीत एकूण १९ हजार ६५१ मतदार असून, शरद पवार गटाचे बळीराजा पॅनेल, चंद्रराव तावरे यांचे सहकार बचाव पॅनेल आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील निळकंठेश्वर पॅनेल यांच्यात कडवी झुंज सुरू आहे. दुसरीकडे, उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा तालुक्यात झालेल्या महात्मा बसवेश्वर पतसंस्थेच्या निवडणुकीत शिंदे गटाच्या शिवसेनेने ठाकरे गटाला पराभूत केले आहे. या निवडणुकीत दोन्ही गटांच्या आजी-माजी खासदारांनी ताकद लावली होती. तर दोन सख्ख्या भावांचे पॅनेल एकमेकांसमोर उभे ठाकले होते. दरम्यान, राज्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. सध्या कोकण किनारपट्टी, घाटमाथा आणि काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढला आहे. मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरींची शक्यता असून, भारतीय हवामान विभागाने लहान होड्यांना समुद्रात न जाण्याच्या सूचना दिल्या आहेत. रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी पुढील चार दिवस ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच मुंबईतील शिवसेना भवन परिसरात बॅनरबाजी पाहायला मिळत आहे. नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त लावलेल्या बॅनरवर ‘हिंदू धर्म रक्षक’ असा उल्लेख आहे. तर मनसेकडून हिंदी भाषेविरोधात बॅनरबाजी करण्यात आली आहे. तर ठाकरे गटाकडून राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येण्याबद्दल बॅनर लावण्यात आले आहे. यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, महाराष्ट्र, क्रिकेट, मनोरंजन, सामाजिक , राजकारण अशा विषयातील महत्वाच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी दिवसभर हा ब्लॉग फॉलो करत रहा.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 22 Jun 2025 07:15 PM (IST)

    परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना डिस्चार्ज, पूर्वेश सरनाईक यांची माहिती

    परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना आज 22 जून रोजी ठाण्यातील खासगी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. प्रताप सरनाईक यांचे पुत्र पूर्वेश सरनाईक यांनी याबाबतची माहिती एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन दिली आहे. प्रताप सरनाईक यांना अस्वस्थ वाटत असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र आता त्यांची प्रकृती स्थिर आहे.

  • 22 Jun 2025 06:55 PM (IST)

    इजिप्तच्या परराष्ट्रमंत्र्यांचा भारत दौरा रद्द

    इराणच्या तीन प्रमुख अणु प्रकल्पांवर अमेरिकेच्या हल्ल्यानंतर पश्चिम आशियातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इजिप्तचे परराष्ट्र मंत्री बद्र अब्देलट्टी यांचा उद्या सोमवारपासून सुरू होणारा दोन दिवसांचा भारत दौरा रद्द करण्यात आला आहे. बद्र अब्देलट्टी उद्या परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्याशी व्यापक चर्चा करणार होते.

  • 22 Jun 2025 06:34 PM (IST)

    पंतप्रधान मोदींनी इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला

    इस्रायल आणि इराणमध्ये सुरू असलेल्या युद्धादरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी फोनवरून संवाद साधला. संभाषणादरम्यान, पंतप्रधानांनी सध्याच्या परिस्थिती आणि सध्या सुरू असलेल्या तणावाबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली.

  • 22 Jun 2025 06:24 PM (IST)

    एअर इंडियाची विमाने इराण, इराक आणि इस्रायलमार्गे जाणार नाहीत

    इस्रायल-इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर एअर इंडियाने एक मोठा निर्णय घेतला आहे. एअर इंडियाची विमाने इराण, इराक आणि इस्रायलमार्गे जाणार नाहीत.

  • 22 Jun 2025 06:05 PM (IST)

    राजा रघुवंशी खून प्रकरणी आणखी एक अटक

    राजा रघुवंशी हत्या प्रकरणात मेघालय पोलिसांनी मध्य प्रदेशातील एका सुरक्षा रक्षकाला अटक केली आहे. अधिकाऱ्याने ही माहिती दिली आहे.

  • 22 Jun 2025 05:58 PM (IST)

    साताऱ्यात जाहिरातीचे होर्डिंग रस्त्यावर, एक दुचाकीस्वार जखमी

    साताऱ्यात पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर बॉम्बे रेस्टॉरंट चौकात अचानक आलेल्या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे जाहिरातीचे होर्डिंग मुख्य हायवेच्या रस्त्यावर आल्यामुळे दुचाकी वरून जाणारा युवक यामध्ये किरकोळ जखमी झाला आहे. पोलिसांनी तात्काळ हे होर्डिंग हटवले असून जखमी युवकावर खाजगी रुग्णालय उपचार सुरु आहेत.

  • 22 Jun 2025 05:42 PM (IST)

    मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून 12 कोटींचा हायड्रोफोनिक गांजा जप्त

    मुंबई कस्टम विभागाने मोठी कारवाई करत 12 कोटींचा हायड्रोफोनिक गांजा जप्त केला आहे. तसेच बँकॉक वरून आलेल्या 2 प्रवाशांना अटक करण्यात आली आहे. उशीत लपवून गांजाची तस्करी केली जात होती अशी माहिती समोर आली आहे.

  • 22 Jun 2025 05:33 PM (IST)

    रत्नागिरी: भाट्ये खाडीत बोटीला भीषण आग

    रत्नागिरीतील भाट्ये खाडीत दोन बोटींना भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या बोटी किनाऱ्यावर नांगर टाकून बांधून ठेवण्यात आल्या होत्या. यातील एका बोटीला आग लागली त्यानंतर शेजारील बोटीने देखील पेट घेतला. या घटनेत कोणतेही जीवीतहानी झाली नाही.

  • 22 Jun 2025 05:16 PM (IST)

    मी भाजपमध्ये जाणार नाही – एकनाथ खडसे

    एकनाथ खडसे यांनी पंढरपुरमध्ये बोलताना मोठं विधान केलं आहे. ‘मी भाजपमध्ये जाण्याचा प्रश्नच येत नाही. भाजपमध्ये परत जाण्याच्या चर्चेला मी पूर्णविराम दिला आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये समाधानी आहे.’ असं खडसे यांनी म्हटलं आहे.

  • 22 Jun 2025 04:44 PM (IST)

    सीएसटी -कर्जत लोकलमध्ये जोरदार राडा, तुंबळ हाणामारी

    सीएसटी – कर्जत धावत्या लोकलमध्ये राडा

    घाटकोपर आणि मुलुंड दरम्यान धावत्या लोकलमध्ये तुंबळ हाणामारी

    गर्दीत धक्का मारत शिवीगाळ करणाऱ्या तरुणांना प्रवाशांनीच दिला चोप

    संतप्त प्रवाशांनी सिग्नलवर ट्रेन थांबताच तरुणांना डब्यातून उतरवलं

  • 22 Jun 2025 04:05 PM (IST)

    कल्यामध्ये खदानीत बुडून 15 वर्षांच्या मुलाचा मृत्यू

    कल्याण मधील मारळ-वरब गावाच्या फॉरेस्ट खदानीत बुडून १५ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू

    शिवम झा असे मृत विद्यार्थ्याचे नाव, तो म्हारळ गावचा रहिवासी असल्याची माहिती

    पोहण्यासाठी गेलेल्या शिवमचा पाण्याचा अंदाज न आल्याने मृत्यू

    विद्यार्थ्याच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ

  • 22 Jun 2025 03:04 PM (IST)

    अंबरनाथमध्ये पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापा

    अंबरनाथमध्ये पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापा

    11 पुरुष आणि 2 महिलांना घेतलं ताब्यात

    कोहोजगावच्या पटेल प्रेस्टीज इमारतीत सुरू होता जुगाराचा अड्डा

    अंबरनाथमध्ये पोलिसांची मोठी कारवाई

  • 22 Jun 2025 01:55 PM (IST)

    हुंडा घेणाऱ्या आणि देणाऱ्याच्या लग्नाला जायच नाही; सुप्रिया सुळेंनी स्पष्ट शब्दातच सांगितलं

    सुप्रिया सुळेंनी हुंडा देण्याबद्दल आणि घेण्याबद्दलच्या रितीरिवाजावर भाष्य केलं आहे. “हुंडा घेणाऱ्या आणि देणाऱ्याच्या लग्नाला जायच नाही. रुखवतात गाडी दिसली की पैसै कुणी दिले असा प्रश्न करायचा. दीड लाखांचा मोबाईल सासऱ्यांकडून कशाल मागता, हिंमतीवर घ्या” असं म्हणत त्यांनी स्पष्टच मत मांडलं आहे.

  • 22 Jun 2025 01:34 PM (IST)

    कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत नागपुरात बैठकीला सुरुवात

    कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत नागपुरात बैठकीला सुरुवात झाली आहे. नितीन गडकरी देखील बैठकीला उपस्थित आहे.

  • 22 Jun 2025 01:22 PM (IST)

    मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांचा आज वर्सोवा दौरा

    मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांचा आज वर्सोवा दौरा आहे. वर्सोवा खाडी जवळील स्थानिक मच्छीमारांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करत आहेत. वर्सोवा येथील कोळी बांधवांसोबत ते मार्केटला ही भेट देणार आहेत.

  • 22 Jun 2025 12:55 PM (IST)

    ज्ञानेश्वर माऊलींची पालखी दिवे घाटात, लाखो वारकरी घाट चढणार

    ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आज दिवे घाटातून पुढे जाणार आहे. लाखो वारकरी माऊलींच्या पालखीसोबत दिवे घाट चढणार आहेत. वारकऱ्यांच्या सुरक्षेतेसाठी संपूर्ण वारीवर पोलिसांची ड्रोनद्वारे करडी नजर असणार आहे. त्यासाठी खास ड्रोन पथक तैनात करण्यात आले आहे.

  • 22 Jun 2025 12:45 PM (IST)

    मीरा रोडमध्ये अमली पदार्थ विरोधी पथकाची मोठी कारवाई

    मीरा रोड येथे अमली पदार्थ विरोधी पथकाने मोठी कारवाई केली आहे. 63.8 ग्रॅम एम.डी अमली पदार्थ, 12 लाख 76 हजारांचा माल, आणि एक मोबाईल फोन एकूण 12 लाख 86 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. नायजेरियन जॉन चुकवू मायकेल याला ताब्यात घेण्यात आले आहे.

  • 22 Jun 2025 12:28 PM (IST)

    ठाण्यात उद्धव ठाकरेंना डिवचणारे झळकले बॅनर

    ठाण्यातील टेंभी नाका परिसरात युवा शिव सेनेकडून बॅनर लावण्यात आले आहे. वर्धापनदिनी उद्धव ठाकरेंनी come on kill me असा उल्लेख भाषणात केला होता. ‘Come on kill me ऐवजी come on save me म्हणाला असता तर शिंदे साहेब मदतीला आले असते. एकनाथ शिंदे मारणाऱ्यातील नसून तारणाऱ्यातील आहेत’ असा उल्लेख बॅनवर करण्यात आला आहे.

  • 22 Jun 2025 12:02 PM (IST)

    भरतीच्या पाण्यात पोहण्यासाठी गेलेल्या पर्यटकांना वसई विरार महापालिकेच्या जीवरक्षकांनी बाहेर काढलं

    विरार- खवळलेल्या समुद्रात पर्यटकांचा अतिउत्साहीपणा समोर आला आहे. भरतीच्या पाण्यात पोहण्यासाठी गेलेल्या पर्यटकांना वसई विरार महापालिकेच्या जीवरक्षकांनी बाहेर काढलं. आज रविवारी सुट्टीच्या दिवशी शेकडो पर्यटक आपल्या कुटुंबासह विरारच्या अर्नाळा, राजोडी, कळंब, नवाबपूर, भुईगाव, वसई सुरुचीबाग समुद्रकिनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात पिकनिकसाठी आले आहेत.

    आज सकाळपासून दुपारपर्यंत समुद्रात भरती असून, दुपारी 1 च्या नंतर ओहोटी सुरू होणार आहे. समुद्र किनाऱ्यावर जीवरक्षक कमी असल्याने पर्यटक अतिउत्साहीपणातून खवळलेल्या समुद्रात जातात आणि आपला जीव गमावतात. त्यामुळे वसई, विरार, नालासोपारा परिसरातील समुद्र किनाऱ्यावर जीवरक्षक, तटरक्षक वाढवावे अशी मागणी करण्यात येत आहे.

  • 22 Jun 2025 11:50 AM (IST)

    संत तुकाराम महाराज यांची पालखी हडपसरमध्ये दाखल

    पुणे – संत तुकाराम महाराज यांची पालखी हडपसरमध्ये दाखल झाली आहे. विठ्ठल नामाचा जयघोष करत पालखी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाली आहे. नियोजित वेळेपेक्षा या वर्षी पालखी हडपसरमध्ये दाखल व्हायला दोन तास उशीर झाला आहे. पालखीचे दर्शन घेण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली.

  • 22 Jun 2025 11:30 AM (IST)

    नंदुरबार जिल्ह्यात दोन दिवसाच्या विश्रांतीनंतर पुन्हा पावसाला सुरुवात

    नंदुरबार जिल्ह्यात दोन दिवसाच्या विश्रांतीनंतर पुन्हा पावसाला सुरुवात झाली आहे. नंदुरबार जिल्ह्यात होत असलेल्या पावसामुळे पेरणी केलेल्या शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे. जिल्ह्यात दमदार अशा पावसाची एण्ट्री झाली आहे. जिल्ह्यात होत असलेल्या पावसामुळे पिण्याच्या पाण्याचे प्रश्न लवकरच सुटणार आहे.

  • 22 Jun 2025 11:20 AM (IST)

    मुंबई महापालिकेच्या तोंडावर उबाठाला मोठा धक्का

    मुंबई महापालिकेच्या तोंडावर उबाठाला मोठा धक्का बसला आहे. ठाकरे गटाचे 2 माजी नगरसेवक थोड्याच वेळात भाजपात प्रवेश करणार आहेत. मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार आणि भाजप गटनेते प्रविण दरेकरांच्या मुख्यालयात प्रदेश उपस्थितीत पक्षप्रवेश होणार आहे. उबाठाच्या माजी नगरसेवकासाठी शिंदेच्या शिवसेनेने ही फिल्डिंग लावल्याची सूत्रांची माहिती आहे.

  • 22 Jun 2025 11:10 AM (IST)

    पुण्यातल्या दोन दिवसांच्या मुक्कामानंतर माऊलींची पालखी आज सासवडमध्ये

    पुण्यातल्या दोन दिवसांच्या मुक्कामानंतर माऊलींची पालखी आज सासवडमध्ये मुक्कामी असेल. दिवे घाटाची अवघड वाट सर करत पालखी सासवडला येणार आहे.  पालखीसोबत आलेल्या इतर दिंड्यांनी दिवे घाटाचा मार्ग चढण्यास सुरुवात केली. ज्ञानोबा तुकारामांच्या नामघोषात संपूर्ण दिवे घाट मार्ग दुमदुमून गेला आहे.

  • 22 Jun 2025 11:00 AM (IST)

    अमरावती शहरातील एसआर पीएफ कॅम्प ऑफिस कार्यालयात शिरला बिबट्या

    अमरावती शहरातील एसआर पीएफ कॅम्प ऑफिस कार्यालयात रात्री 1 वाजताच्या सुमारास बिबट्या शिरला. त्यामुळे या परिसरात सध्या भीतीचं वातावरण आहे. एसआरपीएफ कॅम्प ऑफिसमध्ये बिबट्या शिरताना सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.

  • 22 Jun 2025 10:45 AM (IST)

    ठाण्यात उद्धव ठाकरेंना डिवचणारे झळकले बॅनर

    ठाण्यातील टेंभी नाका परिसरात युवा शिव सेनेकडून लावण्यात आले बॅनर… वर्धापनदिनी उद्धव ठाकरेंनी come on kill me असा उल्लेख भाषणात केला होता… Come on kill me ऐवजी come on save me म्हणाला असता तर शिंदे साहेब मदतीला आले असते… एकनाथ शिंदे मारणाऱ्यातील नसून तारणाऱ्यातील आहेत…

  • 22 Jun 2025 10:16 AM (IST)

    राज्यातलं सरकार जनतेला फसवतंय – संजय राऊत

    राज्यातलं सरकार जनतेला फसवतंय… शेतकरी कर्जमाफी केली जाईल, असा महायुतीचा जाहीरनामा… लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणार, असाही जाहीरनामा.. सारख कारखाना निवजणुकीसाठी दादा ठाण मांडून बसलेत… असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलंकआहे.

  • 22 Jun 2025 10:15 AM (IST)

    श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या चरणी सोन्याचा तुळशीहार अर्पण

    श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या चरणी यवतमाळ येथील माधवानंद महाराज गुरु वामनानंद स्वामी चिन्मयमूर्ती संस्थान यांचे कडून 17 लाख 68 हजार किमतीचा सोन्याचा तुळशीहार अर्पण… सदर सोन्याचा तुळशीहार 232.990 ग्रॅम वजनाचा असून, त्याची किंमत 17 लाख 68 हजार रुपये इतकी आहे… मंदिर समितीच्या वतीने देणगीदार भाविकाचा मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी श्रींची प्रतिमा व उपरणे देऊन येथोचित सन्मान केला

  • 22 Jun 2025 10:03 AM (IST)

    सालेकसा-आमगावमध्ये नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकीची रणधुमाळी….

    100% भाजप उमेदवार निवडून आणू…आमदार संजय पुराम…. देवरी-आमगावमध्ये युती होणार की भाजपचा स्वतंत्र लढणार?… आमदार संजय पुराम यांचा पक्षनिष्ठ कार्यकर्त्यांवर विश्वास… कोर्टातील प्रलंबित विषय आणि निवडणुकीच्या तयारीवर आमदार संजय पुराम यांची प्रतिक्रिया….

  • 22 Jun 2025 09:43 AM (IST)

    आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांसाठी गुडन्यूज, ठाण्यातून 64 एसटी बसेस धावणार

    आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांसाठी ठाणे जिल्ह्यातून ६४ जादा लाल परी (एस.टी. बसेस) धावणार आहेत. या विशेष बसेससाठी ग्रुप आरक्षण आणि तिकीट आरक्षण सुरू झाले आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी, परत येण्याचे आणि ग्रुप पद्धतीचे आरक्षण करण्याची व्यवस्था बस स्थानकांवर करण्यात आली आहे. पंढरपूरला जाण्यासाठी बसची जशी मागणी वाढेल, तशी अतिरिक्त व्यवस्था करण्याची तयारीही प्रशासनाने ठेवली आहे. या यात्रेला जाणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘अमृत ज्येष्ठ नागरिक योजना’ आणि महिलांसाठी ‘महिला सन्मान योजना’ अशा दोन महत्त्वाच्या सवलती जाहीर करण्यात आल्या आहेत, ज्यामुळे भाविकांना दिलासा मिळणार आहे.

  • 22 Jun 2025 09:37 AM (IST)

    कल्याणच्या सुभाष चौक–वालधुनी उड्डाणपूल मार्गावर अवजड वाहनांना प्रवेश बंदी

    कल्याण स्टेशन परिसरातून उल्हासनगरकडे जाणाऱ्या सुभाष चौक–वालधुनी उड्डाणपूल मार्गावर आता अवजड वाहनांना कायमस्वरूपी प्रवेशबंदी घालण्यात आली आहे. अवजड वाहनांच्या सततच्या वाहतुकीमुळे या परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असल्याने नागरिक त्रस्त झाले होते. महाविकास आघाडीच्या पाठपुराव्यानंतर प्रशासनाने हा महत्त्वाचा निर्णय घेतला असून, मार्गावर हाईट बॅरिगेट (उंची मर्यादा) बसवून अवजड वाहनांना प्रवेश पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. या निर्णयामुळे लहान वाहनचालकांना मोठा दिलासा मिळाला आहे,

  • 22 Jun 2025 09:32 AM (IST)

    माळेगाव सहकारी साखर कारखान्यासाठी आज मतदान

    बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्यासाठी आज २२ जून २०२५ रोजी मतदान पार पडत आहे. या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार, सुप्रिया सुळे यांच्यासह अनेक दिग्गजांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. माळेगाव सहकारी साखर कारखान्याची एकूण मतदारसंख्या १९ हजार ६५१ इतकी आहे. या निवडणुकीत तीन प्रमुख पॅनेलमध्ये लढत होत आहे. यंदाच्या निवडणुकीत तीन प्रमुख पॅनेलमध्ये कडवी झुंज पाहायला मिळत आहे. यामध्ये शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचे बळीराजा पॅनेल, चंद्रराव तावरे यांचे सहकार बचाव पॅनेल आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील निळकंठेश्वर पॅनेल यांचा समावेश आहे. या तिन्ही पॅनेलमध्ये होणारी लढत कारखान्याच्या भविष्यासाठी महत्त्वाची मानली जात आहे.

  • 22 Jun 2025 09:24 AM (IST)

    महात्मा बसवेश्वर पतसंस्थेत शिंदे गटाची बाजी, शिवसेना ठाकरे गटाला धक्का

    धाराशिव जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील मुरूम येथील महात्मा बसवेश्वर नागरी सहकारी पतसंस्थेच्या निवडणुकीत शिंदे गटाच्या शिवसेनेने बाजी मारत ठाकरे गटाला धक्का दिला आहे. या निवडणुकीत शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी थेट लढत पाहायला मिळाली. यामध्ये शिंदे गटाकडून माजी खासदार रवींद्र गायकवाड आणि शिवसेनेचे माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांनी ताकद लावली होती. तर ठाकरे गटाकडून खासदार ओमराजे निंबाळकर यांनीही प्रचारात सहभाग घेतला होता. पतसंस्थेच्या संचालक मंडळाच्या एकूण १३ जागांसाठी २६ उमेदवार रिंगणात होते. विशेष म्हणजे, दोन सख्ख्या भावांनी एकमेकांसमोर पॅनल उभे केल्याने संपूर्ण उमरगा तालुक्याचे लक्ष या निवडणुकीकडे लागले होते. सुरुवातीला अत्यंत अटीतटीची वाटणारी ही निवडणूक, मतमोजणीनंतर मात्र एकतर्फी झाल्याचे दिसून आले. ज्यात शिंदे गटाने विजय मिळवला.

  • 22 Jun 2025 09:13 AM (IST)

    नाशिकमध्ये बिबट्या जेरबंद, नागरिकांनी सोडला सुटकेचा निःश्वास

    नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील शिवडे गावात एका बिबट्याला जेरबंद करण्यात आले आहे. पहाटेच्या सुमारास विलास हारक यांच्या घराच्या पडवीत भक्ष्याच्या शोधात हा बिबट्या शिरला. पडवीत असलेल्या पाळीव कुत्र्याने भुंकायला सुरुवात केल्याने बिबट्या घरात शिरल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर तात्काळ वनविभागाला माहिती देण्यात आली. सुमारे पाच तास चाललेल्या थरारानंतर, वनविभागाच्या रेस्क्यू टीमने बिबट्याला यशस्वीरित्या जेरबंद केले, त्यामुळे शिवडे गावातील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे.

Published On - Jun 22,2025 9:05 AM

Follow us
मस्ती सुरूये... निधीवरून भरसभागृहात भास्कर जाधवांचा दादांवर निशाणा
मस्ती सुरूये... निधीवरून भरसभागृहात भास्कर जाधवांचा दादांवर निशाणा.
ठाकरे बंधूंच्या युतीच काय होणार? राज ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश काय?
ठाकरे बंधूंच्या युतीच काय होणार? राज ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश काय?.
VIDEO : भाविकाला मारहाण, विठ्ठल मंदिर समितीच्या व्यवस्थापकाची अरेरावी
VIDEO : भाविकाला मारहाण, विठ्ठल मंदिर समितीच्या व्यवस्थापकाची अरेरावी.
पैसे दे, नाहीतर पत्नीला घरी आणून सोड... ती एक धमकी अन् संपवलं जीवन
पैसे दे, नाहीतर पत्नीला घरी आणून सोड... ती एक धमकी अन् संपवलं जीवन.
फरार आरोपी गोट्या गितेसह राजेभाऊ फडची हवा, कराडचे फोटो-रिल केले पोस्ट
फरार आरोपी गोट्या गितेसह राजेभाऊ फडची हवा, कराडचे फोटो-रिल केले पोस्ट.
मिरा-भाईंदरमधील मोर्चाआधीच मनसेला मोठा धक्का, तरीही....
मिरा-भाईंदरमधील मोर्चाआधीच मनसेला मोठा धक्का, तरीही.....
पहलगामचे अतिरेकी भाजपात... लाज वाटली पाहिजे.. ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल
पहलगामचे अतिरेकी भाजपात... लाज वाटली पाहिजे.. ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल.
थर्ड क्लास, मूर्ख माणूस... खैरेंनी इशारा देत पडळकरांची काढली औकात
थर्ड क्लास, मूर्ख माणूस... खैरेंनी इशारा देत पडळकरांची काढली औकात.
धक्कादायक; एकाच कुटुंबातील चौघांनी संपवलं जीवन
धक्कादायक; एकाच कुटुंबातील चौघांनी संपवलं जीवन.
संभाजीनगरात अतिक्रमण हटाव कारवाईला सुरूवात
संभाजीनगरात अतिक्रमण हटाव कारवाईला सुरूवात.