AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra Breaking News LIVE 18 April 2025 : किरीट सोमय्या मुलुंड पोलीस ठाण्यात ठिय्या देणार

| Updated on: Apr 19, 2025 | 8:49 AM
Share

Maharashtra Political News LIVE in Marathi : आज 18 एप्रिल 2025. देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

Maharashtra Breaking News LIVE 18 April 2025 : किरीट सोमय्या मुलुंड पोलीस ठाण्यात ठिय्या देणार
live breaking

निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासलेला पोलिसांनी पुण्यातून ताब्यात घेतलं. आज पहाटे ही कारवाई करण्यात आली. शेगाव तालुक्यातील केस गळती नंतर गावात आता नखं गळती होत आहे. हाताची आणि पायाची नखं गळून पडत असून नखं गळणाऱ्या रुग्णांची संख्या 37 वर पोहचली आहे. आरोग्य प्रशासन नख गळतीचा शोध घेत आहे. हिंदी सक्तीच्या मुद्यावरून मनसे आक्रमक असून मुंबई ठिकठिकाणी मनसेने बॅनर लवात विरोध दर्शवला आहे. कल्याण मध्ये चोरट्यांची दहशत कायम असून भरदिवसा भरवस्तीत घरफोडी करत पोलिसांना आव्हान दिलं. कल्याणच्या वालधुनी परिसरात एका वृद्ध दांपत्याच्या घरी डल्ला मारत बारा लाख 69 हजारांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. अशाच देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 18 Apr 2025 05:33 PM (IST)

    चंद्रपुरात जोरदार पावसाची हजेरी

    चंद्रपूरमध्ये अचानक पावसाची हजेरी

    जिल्ह्यात जोरदार पाऊस

    हवेत गारवा निर्माण झाल्यामुळे नागरिकांना उष्णतेपासून दिलासा

    मात्र दुसरीकडे अवकाळीचा शेतकऱ्यांना मोठा फटका

  • 18 Apr 2025 05:24 PM (IST)

    पुण्यात काँग्रेसचं आंदोलन, लोणावळा-पुणे लोकल अडवली

    पुण्यातून मोठी बातमी समोर येत आहे.  नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात सोनिया गांधी आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना नोटीस देण्यात आली आहे, यानंतर काँग्रेस कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले असून, याचा निषेध करत पुण्यात काँग्रेसच्या वतीनं जोरदार आंदोलन करण्यात आलं. खडकी रेल्वे स्टेशनवर लोणावळा- पुणे लोकल ट्रेन अडवण्यात आली.

  • 18 Apr 2025 11:53 AM (IST)

    रणजीत कासले बीड जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात

    बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक रणजीत कासले याला बीड येथील स्थानिक गुन्हे शाखेचे पथक घेऊन बीड येथील जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात दाखल. स्थानिक गुन्हे शाखेची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कासले याला बीड शहरातील शिवाजीनगर पोलीस स्टेशनला घेऊन जाणार. रंजीत कासलेला पुणे येथून बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेने घेतले आहे ताब्यात. बीड येथील शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये कासले याच्याविरोधात ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल.

  • 18 Apr 2025 11:50 AM (IST)

    किरीट सोमय्या मुलुंड पोलीस ठाण्यात ठिय्या देणार

    भाजप नेते किरीट सोमय्या मुलुंड पोलीस ठाण्यात ठिय्या देणार. अनधिकृत मशिदीच्या विरोधात किरीट सोमय्या आक्रमक. मुलुंड येथील जलाराम मार्केटमधील अनधिकृत मशीद, मशिदींवरील अनधिकृत भोंगे, गोंगाट या विरुद्ध ठिय्या आंदोलन असणार. पोलिस ठाण्यात ठिय्या आंदोलन करू नये अशी नोटीस किरीट सोमय्या यांना वरिष्ठ पोलिस निरीक्षक यांनी बजावली आहे.

  • 18 Apr 2025 11:25 AM (IST)

    अमरावतीच्या दर्यापुरात शिवसेना ठाकरे गट आक्रमक

    अमरावतीच्या दर्यापुरात शिवसेना ठाकरे गट आक्रमक. पंचायत समिती गटविकास अधिकाऱ्यांना घातला घेराव. लाभार्थ्यांना घरकुलाचे चेक देण्यासाठी टाळाटाळ केली जातं असल्याचा आरोप. नागरिकांना त्रास देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची ठाकरे गटाची मागणी.

  • 18 Apr 2025 11:23 AM (IST)

    हा सुप्रीम कोर्टाचा प्रश्नच एकदम चुकीचा – संजय निरुपम

    “तुम्ही तुमच्या मंदिराच्या ट्रस्टमध्ये बिगर हिंदूला सदस्य बनवणार का? हा सुप्रीम कोर्टाचा प्रश्नच एकदम चुकीचा आहे. कारण असं आहे की, वक्फ बोर्डमध्ये कुठल्या प्रकारचा पॅनल नाही. वक्फ ही धार्मिक संस्था नाही, तर एक सरकारी संस्था आहे” असं शिवसेना नेते संजय निरुपम म्हणाले.

  • 18 Apr 2025 10:59 AM (IST)

    रणजित कासलेला अटक

    बीडमधील वादग्रस्त पोलीस अधिकारी रणजित कासले याला शुक्रवारी पहाटे पुण्यातील स्वारगेट येथे अटक करण्यात आली. त्यानंतर छत्रपती संभाजीनगरचे पोलीस महानिरीक्षकांनी त्याला पोलीस सेवेतून कासले याला बडतर्फ केले. वाल्मिक कराड याचे एन्काऊटर करण्याबाबतचे वक्तव्य करुन रणजित कासले चर्चेत आले होते.

  • 18 Apr 2025 10:50 AM (IST)

    उठले कधी, ट्वीट केले कधी? राऊतांचा टोला

    हे पडद्यामागचे राजकारण असल्याचा घणाघात त्यांनी केला. कुठलातरी पक्ष हिंदीची मागणी करतो. मग कोणतरी त्या मागणी आधारे शिवाजी पार्कावर जाऊन एका नेत्याशी चर्चा करतो आणि दुसऱ्या दिवशी एक मोठे ट्विट करण्यात येते. उठले कधी, केले कधी? असा टोला त्यांनी लगावला. ते ट्वीट सागर बंगल्यावरून अथवा कुठल्यातरी बंगल्यावरून तयार करून आलं होतं, असा थेट आरोप संजय राऊत यांनी केला.

  • 18 Apr 2025 10:40 AM (IST)

    श्रीगोंदा आज दुसर्‍या दिवशीही बंद

    श्रीगोंदा आज दुसर्‍या दिवशीही बंद राहणार. संत शेख महंमद महाराज मंदिर जीर्णोद्धार मागणीसाठी बंदची हाक दिली आहे. शेख महंमद महाराजांचे वंशज म्हणवणाऱ्यांकडून जीर्णोद्धारास आडकाठीचा आरोप करण्यात येत आहे.

  • 18 Apr 2025 10:30 AM (IST)

    पाणी पुरवठा एक दिवस उशीरा

    जळगाव शहराचा पाणीपुरवठा एक दिवस पुढे ढकलला असून एक दिवस उशिराने पाणी पुरवठा होणार आहे. जळगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या वाघूर पंपिंग स्टेशन व उमाळा जलशुद्धीकरण केंद्राला वीजपुरवठा करणारी ३३ केव्ही उच्चदाब विद्युत वाहिनीचे दुरुस्तीचे काम महावितरणकडून हाती घेण्यात आहे.

  • 18 Apr 2025 10:20 AM (IST)

    कचऱ्यामुळे धुळे शहरातील नाले फुल्ल

    धुळे शहरातील नाल्यांमध्ये हजारो क्विंटल कचरा साचला आहे. नियमित साफसफाई नसल्याने कचऱ्याने नाले फु्ल्ल झाले आहे.गेल्या अनेक दिवसांपासून नाल्यातील कचरानक काढल्याने नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घाण कचरा साचला आहे.

  • 18 Apr 2025 10:10 AM (IST)

    हिंदी आमच्यावर लादू नका

    हिंदी आमच्यावर लादू नका, इतर ठिकाणी ही लादू नका. हिंदी सक्तीची करू नका. अनेक जण हिंदी बोलतात. तुम्ही विद्यार्थ्यांचे नुकसान करू नका. सीबीएसई मोठ्या शाळेत मराठी सक्तीचा करा, ती तुमच्यात हिंमत आहे का? असा सवाल खासदार संजय राऊत यांनी केला.

  • 18 Apr 2025 10:04 AM (IST)

    मुख्यमंत्र्यांनी अगोदर माय मराठीकडे लक्ष द्यावे

    मुख्यमंत्र्यांनी अगोदर माय मराठीकडे लक्ष द्यावे, असा टोला खासदार संजय राऊत यांनी लगावला. बेळगाव, धारवाड परिसरात मराठी भाषिकावर अत्याचार होत आहे. त्यावर ते कधी बोलले का? असा सवाल त्यांनी केला.

  • 18 Apr 2025 10:01 AM (IST)

    Maharashtra Breaking: नाशिक दगडफेक प्रकरणात राजकीय कनेक्शन उघड

    नाशिक दगडफेक प्रकरणी आता पर्यंत 38 जणांना अटक… पहिल्या दिवशी 14 जण अटकेत… त्यानंतर 16 जणांना अटक… काल रात्रीच्या सुमारास आणखी 8 जणांना पोलिसांनी केली अटक… अटक केलेल्यांमध्ये MIM शहराध्यक्ष मुख्तार शेख याचा समावेश… तर गुन्हा दाखल असलेले काँग्रेस पदाधिकारी हनीफ बशीर, ठाकरेंच्या शिवसेनेच्या निलोफर शेख आणि शरद पवार गटाचे आरिफ हजी पटेल फरार..

  • 18 Apr 2025 09:37 AM (IST)

    Maharashtra Breaking: पावसाळ्या पूर्वीच्या नालेसफाईसाठी वसई विरार महापालिका सज्ज

    पावसाळ्या पूर्वीच्या नालेसफाईसाठी वसई विरार महापालिका सज्ज झाली असून, नालेसफाईला जोरदार सुरवात झाली आहे… घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपयुक्त नानासाहेब कामठे यांनी माहिती दिली आहे. महापालिका हद्दीत तोटल नाले 216 नाले असून, 128 मोठे आणि मध्यम नाले आहेत. नालेसफाईसाठी महापालिकेने यंदाच्या वर्षी 20 कोटी रुपयांचे आर्थिक बजेटची तरतूद केली आहे. वसई विरार नालासोपारा शहरात यंदाच्या वर्षी पावसाळ्यात कोठेही पाणी साचू नये यासाठी नालेसफाई जोरदार करण्यात येत आहे.

  • 18 Apr 2025 09:25 AM (IST)

    Maharashtra Breaking: तीस लाखांची रोकड असलेली बॅग लुटून दरोडेखोर टोळी अटकेत….

    ठाणे स्थानकासमोरील पार्किंग मध्ये एका व्यक्तीकडे 30 लाखाची रोकड असलेली बॅग तोंडावर स्प्रे मारून लुटून नेणाऱ्या टोळीतील पाच जणांना ठाणे गुन्हे शाखा युनिटच्या पथकाने अटक केली आहे… विशेष म्हणजे ही टोळी केरळ राज्यातील असून ती महाराष्ट्रात फक्त अशा प्रकारचे गुन्हे करण्यासाठी येत आल्याची बाब समोर आलेली आहे. आरोपीकडून लुटून नेलेल्या रकमेपैकी सात लाख पन्नास हजाराची रोकड आणि तीन लाख रुपये किमतीचे दोन आयफोन असे एकूण दहा लाख पन्नास हजार रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.

  • 18 Apr 2025 09:14 AM (IST)

    Maharashtra Breaking: नाशिक दर्गा अतिक्रमण प्रकरण, मुंबई नाका पोलीस ठाण्यात १४००- १५०० ज्ञात अज्ञातांवर गुन्हे दाखल

    पोलिसांवर दगडफेक प्रकरणी काही राजकीय पक्षांचे पदाधिकारी… MIM शहराध्यक्ष मुख्तार शेख याला ही नाशिक पोलिसांनी दगडफेक प्रकरणी केली अटक… गुन्हा दाखलमध्ये काँग्रेस, ठाकरे गट, शरद पवार पक्षासह आता MIM च्या शहराध्यक्ष गुन्हा… MIM शहराध्यक्ष मुख्तार शेख याला रात्री उशिरा पोलिसांनी अटक केल्याची सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांनी दिली माहिती…

  • 18 Apr 2025 08:52 AM (IST)

    मुंबई भाजप संघटनेत महिलांच्या 33 टक्के आरक्षणाची अंमलबजावणी होणार

    मुंबई भाजप संघटनेत महिलांच्या 33 टक्के आरक्षणाची अंमलबजावणी होणार आहे. 33 टक्के मंडल अध्यक्ष पदावर महिलांना संधी मिळणार अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. मुंबई कोअर कमिटीच्या बैठकीत निर्णय झाल्याचे समजते.

  • 18 Apr 2025 08:43 AM (IST)

    ठाण्यातील 1300 झाडांवर कुऱ्हाड चालवण्याचा विकासकाचा ‘डाव’

    ठाण्यातील 1300 झाडांवर कुऱ्हाड चालवण्याचा विकासकाचा ‘डाव’. वृक्षांचे वय लपवल्याचे वनविभागाच्या पाहणीत उघड; वृक्ष प्राधिकरणाच्या निर्णयाकडे लक्ष.

    वनविभाग व वृक्ष प्राधिकरण विभागाच्या माजी सदस्यांनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे.

  • 18 Apr 2025 08:24 AM (IST)

    मध्य रेल्वेवर रविवारी खोळंबा, सीएसएमटी-विद्याविहारदरम्यान पाच तासांचा मेगाब्लॉक

    मध्य रेल्वेवर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) आणि विद्याविहार स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे.

    ब्लॉक कालावधीत सीएसएमटी वरून सकाळी १०.४८ ते दुपारी ३.४५ या कालावधीत सुटणाऱ्या डाऊन धीम्या मार्गावरील सेवा सीएसएमटी आणि विद्याविहार स्थानकादरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवल्या जातील

  • 18 Apr 2025 08:23 AM (IST)

    जालना जिल्ह्यात 158 गावात पाणी उपसा करण्यास बंदी, जालना जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

    जालना जिल्ह्यात संभाव्य पाणीटंचाई भासणाऱ्या 158 गावांमध्ये पाणी उपसा करण्यास जालना जिल्हाधिकाऱ्यांनी बंदी घातली आहे.

    महाराष्ट्र भूजल भूवैज्ञानिकानी जिल्ह्यात संभाव्य पाणीटंचाई भासणाऱ्या गावांचा अहवाल सादर केला आहे. या अहवालानुसार जालना जिल्ह्यात 158 गावे टंचाईग्रस्त दर्शवली असल्याने या गावांमध्ये पाणी उपसा करण्यास जालना जिल्हाधिकाऱ्यांनी बंदी घातली आहे.

  • 18 Apr 2025 08:21 AM (IST)

    निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासलेला स्वारगेटमधून पोलिसांनी पहाटे घेतलं ताब्यात

    निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासलेला स्वारगेटमधून पोलिसांनी पहाटे 4 वाजता ताब्यात घेतलं.  रणजित कासले काल दिल्लीमधून पुण्यात आला होता.

Published On - Apr 18,2025 8:20 AM

Follow us
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.