Chhagan Bhujbal | ‘OBC आरक्षणाशिवाय निवडणुका घेणार नाही’
सुप्रीम कोर्टात (Supreme court) काय झालं ते आज मंत्रिमंडळासमोर मांडण्यात आलं. कोणत्याही परिस्थिती ओबीसी आरक्षण (OBC Reservation) टाळून निवडणुका घेऊन नयेत हे मंत्रिमंडळानं ठरवलं आहे, असं छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) म्हणाले.
सुप्रीम कोर्टात (Supreme court) काय झालं ते आज मंत्रिमंडळासमोर मांडण्यात आलं. कोणत्याही परिस्थिती ओबीसी आरक्षण (OBC Reservation) टाळून निवडणुका घेऊन नयेत हे मंत्रिमंडळानं ठरवलं आहे, असं छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) म्हणाले. काही त्रुटी राहिल्या असतील तर त्या पूर्ण करता येतील. सुप्रीम कोर्टानं काय म्हटलं हे वकिलांकडून जाणून घेऊन त्यावर मार्ग काढता येईल. प्रधान सचिवांना यासंबंधी सूचना देण्यात आलेल्या आहेत. जो मार्ग काढता येईल तो काढून ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेऊ नयेत, असं ठरल्याचं भुजबळ म्हणाले. साधारणपणे एखादी बाजू आपल्या विरोधात गेली विरोधक बोलतात. दरम्यान, वकिलांशी चर्चा करून पुढील कामाची दिशा ठरवू, असं छगन भुजबळ म्हणाले आहेत. पर्याय बाहेर सांगण्याऐवजी तो आम्ही शोधत आहोत, असंही भुजबळ यावेळी म्हणाले आहेत.
