AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारताच्या हिताला बाधा येते तेव्हा शस्र उचलले जाते, शस्रपूजे प्रसंगी संरक्षण मंत्री म्हणाले की..

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज दसरा निमित्ताने प.बंगाल येथे सुकन्या सैन्य तळावर विविध शस्रास्रांची विधीवत पूजा केली. भारताने कोणत्याही देशावर द्वेष किंवा अपमानासाठी हल्ला केलेला नाही. जेव्हा आमच्या अखंतेला किंवा सार्वभौमत्वाला कोणी आव्हान दिले तेव्हाच भारताने प्रतिकार केला आहे

भारताच्या हिताला बाधा येते तेव्हा शस्र उचलले जाते, शस्रपूजे प्रसंगी संरक्षण मंत्री म्हणाले की..
Rajnath Singh
| Updated on: Oct 12, 2024 | 3:04 PM
Share

भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दसरा सोहळ्याच्या निमित्ताने पश्चिम बंगाल येथील सुकन्या सैन्य तळावर पारंपारिक पद्धतीने शस्रास्रांची विधीवत पूजा केली. या दरम्यान त्यांनी शस्रास्र पूजे संबंधी अनेक महत्वाच्या बाबी सांगितल्या. भारत जरी शांतताप्रिय देश असला तरी गरज पडल्यास या शस्रास्रांचा वापर करीत आला आहे. संरक्षण मंत्र्‍यांनी कलश पूजेने या शस्रास्रांच्या पूजेची सुरुवात केली. त्यानंतर सैन्यांच्या मशिन गन आणि वाहनांची पूजा केली. त्यांनी अत्याधुनिक पायदळ, तोफखाना, आणि संचार वाहने, ड्रोन यांची देखील पूजा केली.

‘भारत  तेव्हाच युद्ध करतो जेव्हा..’

या प्रसंगी राजनाथ सिंह यांनी आमच्या हिताला काही धोका निर्माण होतो. तेव्हा आम्ही कोणतेही मोठे पाऊल उचलायला संकोच करत नाही. शस्रपूजा म्हणजे स्पष्ट संकेत आहे की गरज पडेल तेव्हा या हत्यारे आणि उपकरणांचा संपूर्ण ताकदीने वापर केला जाईल.राजनाथ सिंह यांनी सांगितले की शक्ती, यश, संरक्षणासाठी आशीवार्द मागण्यासाठी केल्या जाणाऱ्या दसरा सोहळ्याचे सांस्कृतिक आणि आध्यात्मिक महत्व मोठे आहे. या संरक्षण हत्यार प्रणालीच्या महत्व मोठे आहे. भारताच्या सार्वभौमत्वाचे रक्षण करण्यासाठी स्वदेशी संरक्षण प्रणाली इतर शस्रास्रांत वाढ करण्यावर आमच्या सरकारचा भर असल्याचे त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमाला थळ सेनाध्यक्ष जनरल उपेन्द्र द्विवेदी, संरक्षण सचिव आर.के. सिंह,इस्टर्न कमांडचे जनरल ऑफीस कमांडिंग-इन-चीफ लेफ्टिनंट जनरल राम चंद्र तिवारी, बोर्डर रोडचे महासंचालक लेफ्टनंट जनरल रघु श्रीनिवासन, त्रिशक्ति कोअरचे जनरल ऑफिसर कमांडिंग लेफ्टिनंट जनरल जुबिन ए. मिनवाला आणि अन्य अधिकारी उपस्थित होते.

Follow Us
मोदीजी, बीपी चेक करत राहा; अभिजीत दीपकेंचा पंतप्रधानांना टोला
Abhijeet Dipke : मोदीजी, बीपी चेक करत राहा; अभिजीत दीपकेंचा पंतप्रधानांना टोला, मेट्रो-रेल्वे बंदीवरून सरकारवर निशाणा
रेल्वे, मेट्रो बंदच्या निर्णयाविरोधात कोर्टात सुनावणी; कोर्टाने....
CJP Protest : सीजेपीचं उद्या दिल्लीत आंदोलन, रेल्वे, मेट्रो बंदच्या निर्णयाविरोधात कोर्टात सुनावणी; कोर्टाने केंद्राला काय सांगितलं?
गजानन कीर्तिकर ठाकरेंच्या सेनेत घरवापसी करणार? स्वतःच केला मोठा खुलासा
Gajanan Kirtikar : Shivsena : गजानन कीर्तिकर ठाकरेंच्या सेनेत घरवापसी करणार? स्वतःच केला मोठा खुलासा, म्हणाले...
एवढीच भीती वाटते तर...; दिल्लीतील बंदोबस्तावर दीपकेंचा सरकारला टोला
Abhijeet Dipake : एवढीच भीती वाटते तर...; दिल्लीतील बंदोबस्तावर अभिजित दीपकेंचा सरकारला टोला
ठाकरे की शिंदे? शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा फैसला लवकरच....
Shivsena : ठाकरे की शिंदे? शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा फैसला लवकरच, सर्वोच्च न्यायालयाकडून तारीख जाहिर
गाढव म्हणताय? आता ऐका माझं उत्तर; विवेकानंद पाटलांचा बण यांच्यावर....
Vivekanand Patil : गाढव म्हणताय? आता ऐका माझं उत्तर; विवेकानंद पाटलांचा नवनाथ बण यांच्यावर पलटवार, फडणवीसांनाही केलं आवाहन
CJP आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत मोठे बदल, व्हिडिओ बघाच
CJP Delhi Andolan : CJP आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत मोठे बदल, व्हिडिओ बघाच
दिल्लीतील इंडिया आघाडीच्या आंदोलनाकडे ठाकरे सेनेची पाठ?
Thackeray Group On Delhi Andolan : दिल्लीतील इंडिया आघाडीच्या आंदोलनाकडे ठाकरे सेनेची पाठ? राष्ट्रपतींच्या भेटीवेळीही प्रतिनिधी....
सहन होत नाही आणि सांगता येत नाही... एमपीएससी आंदोलनावरून राऊतांनी...
Sanjay Raut : सहन होत नाही आणि सांगता येत नाही... एमपीएससी आंदोलनावरून संजय राऊतांनी सरकारला घेरलं
SIR मुद्द्यावरून फडणवीसांचा काँग्रेसवर पलटवार; सिब्बलांचा जुना व्हिडिओ
Devendra Fadnavis : SIR मुद्द्यावरून फडणवीसांचा काँग्रेसवर पलटवार; कपिल सिब्बलांचा जुना व्हिडिओ शेअर करत म्हणाले...