AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Operation Sindoor : पाकिस्तानचे किती फायटर जेट्स पाडले? इंडियन एअरफोर्स प्रमुखांनी पहिल्यांदाच सांगितला आकडा

Operation Sindoor : ऑपरेशन सिंदूरच्यावेळी पाकिस्तानी एअर फोर्सची किती फायटर विमान पाडली? त्या बद्दल इंडियन एअरफोर्समधील सर्वोच्च पदावरुन पहिल्यांदाच पुष्टी करण्यात आलीय. एअर फोर्स प्रमुख अमर प्रीत सिंह यांनी पाकिस्तानची किती विमानं पाडली तो आकडाच जाहीर केलाय. पाकिस्तानने आतापर्यंत खूप खोटे दावे केले. आता IAF कडून पहिल्यांदाच महत्त्वाची माहिती देण्यात आलीय.

Operation Sindoor : पाकिस्तानचे किती फायटर जेट्स पाडले? इंडियन एअरफोर्स प्रमुखांनी पहिल्यांदाच सांगितला आकडा
india air chief marshal ap singh
| Updated on: Aug 09, 2025 | 3:47 PM
Share

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये सैन्य संघर्ष झाला. भारताने पाकिस्तानातील लष्करी तळ उडवून दिले होते. यात 100 पेक्षा जास्त दहशतवादी मारले गेले. त्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये लढाई झाली. भारताने पाकिस्तान विरोधात ऑपरेशन सिंदूर लॉन्च केलं. भारतीय सैन्य दलांनी केलेल्या या कारवाईवर इंडियन एअरफोर्सचे प्रमुख अमर प्रीत सिंह यांनी पहिल्यांदाच मोठं वक्तव्य केलं आहे. ऑपरेशन सिंदूरच्यावेळी इंडियन एअरफोर्सने पाकिस्तानची 5 फायटर जेट्स पाडली असं एअर फोर्स प्रमुख अमर प्रीत सिंह यांनी सांगितलं. या ऑपरेशनच्या माध्यमातून आम्ही पाकिस्तानला स्पष्ट आणि कठोर संदेश दिला. पाकिस्तानच्या पाडलेल्या विमानांमध्ये पाच फायटर विमान आणि एक टेहळणी करणारं AWACS विमान होतं.

बंगळुरुमध्ये एका कार्यक्रमात बोलताना एअरफोर्सचे प्रमुख अमर प्रीत सिंह यांनी ही माहिती दिली. भारताने ऑपरेशन सिंदूरच्यावेळी पाकिस्तानची पाच फायटर विमानं पाडली. यात एक AEW&CS विमान होतं. पाकिस्तानी एअरफोर्सला या ऑपरेशनमध्ये किती नुकसान झालं? त्या बद्दल इंडियन एअरफोर्समधील सर्वोच्च पदावरुन पहिल्यांदाच पुष्टी करण्यात आलीय. पाकिस्तानने या वक्तव्यावर अजून काही प्रतिक्रिया दिलेली नाही.

बहावलपूर आणि जैश-ए-मोहम्मदबद्दल काय म्हणाले?

बंगळुरुत एका कार्यक्रमात ऑपरेशन सिंदूरबद्दल बोलताना एपी सिंह म्हणाले की, “बहावलपूर आणि जैश-ए-मोहम्मद मुख्यालयावर हल्ला करण्याआधीचे आणि नंतरचे फोटो आमच्याकडे आहेत. इथे काहीच सामान शिल्लक उरलेलं नाही. आसपासच्या इमारती सुरक्षित आहेत. आमच्याकडे फक्त फोटोज नाहीत, तर स्थानिक मीडियाचे सुद्धा फोटोग्राफ्स आहेत”

कारवाई करण्याच्या स्वातंत्र्याबद्दल काय म्हणाले?

राजकीय इच्छाशक्ती हे ऑपरेशन सिंदूर यशस्वी होण्यामागच मुख्य कारण असल्याचं एपी सिंह म्हणाले. “आम्हाला स्पष्ट निर्देश देण्यात आले होते. आमच्यावर कुठलेही प्रतिबंध नव्हते. आम्ही ठरवलं की, किती पुढे जायचं आहे. आम्हाला योजना बनवून कार्यान्वित करण्याचं पूर्ण स्वातंत्र्य होतं. आम्ही विचारपूर्वक हल्ले केले” असं एअरफोर्स प्रमुख म्हणाले.

चार दिवसांची लढाई

22 एप्रिल रोजी पाक पुरस्कृत दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये निर्दोष पर्यटकांची हत्या केली. यात 26 भारतीयांचा मृत्यू झाला. त्यामुळे भारताने पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी ऑपरेशन सिंदूर लॉन्च केलं. 7 मे च्या सकाळी पाकिस्तानातील 9 दहशतवादी तळ उद्धवस्त केले. यात 100 पेक्षा जास्त अतिरेकी ठार झाले. ऑपरेशन सिंदूर लॉन्च केल्यानंतर भारत-पाकिस्तानमध्ये चार दिवस संघर्ष चालला. 10 मे च्या संध्याकाळी पाच वाजता सीजफायरची घोषणा झाली.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.