AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

देशावर मोठं संकट, आयएमडीच्या अंदाजामुळे चिंता वाढली, पुढील दोन दिवस धोक्याची

Weather and Rain Update : पुढील 24 तासांमध्ये राज्यातील काही भागांमध्ये जोरदार पाऊस हजेरी लावणार आहे. मराठवाडा, विदर्भात भारतीय हवामान विभागाकडून विजांसह मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला. यासोबतच दिल्लीमध्येही पावसाचा मोठा इशारा देण्यात आलाय.

देशावर मोठं संकट, आयएमडीच्या अंदाजामुळे चिंता वाढली, पुढील दोन दिवस धोक्याची
Rain
| Updated on: Aug 04, 2025 | 7:52 AM
Share

मागील काही दिवसांपासून राज्यात पावसाचा जोर कमी झाल्याचे बघायला मिळतंय. पुढील 24 तासांमध्ये राज्यातील काही भागांमध्ये जोरदार पाऊस हजेरी लावणार आहे. मराठवाडा, विदर्भात भारतीय हवामान विभागाकडून विजांसह मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला. यासोबतच देशात जोरदार पाऊस सुरू आहे. दिल्ली, उत्तर प्रदेश भागांमध्ये पावसाचा हाहाकार बघायला मिळतोय. राज्यात रविवारी देखील अनेक भागांमध्ये चांगला पाऊस झाल्याचे बघायला मिळाले.

भारतीय हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी 

हवामान विभागाने मराठवाडा, विदर्भ आणि राज्यातील काही भागांमध्ये पावसाचा येलो अलर्ट जाहीर केलाय. सुरूवातीला अशी एक जोरदार चर्चा होती की, ऑगस्ट महिन्यात पाऊस कमी होणार, ज्यानंतर शेतकरी चिंतेत आले. मात्र, हवामान विभागाकडून स्पष्ट करण्यात आले की, ऑगस्ट महिन्यात देखील चांगला पाऊस होण्याची दाट शक्यता आहे. पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणक्षेत्रात चांगलाच पाऊस होत आहे.

5 ऑगस्टपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा 

देशाची राजधानी दिल्ली आणि त्याच्या लगतच्या एनसीआर भागात पाऊस सुरूच आहे. दिल्ली-एनसीआरमध्ये मुसळधार पाऊस पडला. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, दिल्ली आणि त्याच्या आसपासच्या भागात 5 ऑगस्टपर्यंत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेशात मुसळधार पाऊस सुरूच आहे. वाराणसी, प्रयागराज, बांदा, हमीरपूर, झाशीसह राज्यातील अनेक ठिकाणी पावसाची नोंद झाली आहे.

उत्तर प्रदेश आणि बिहारमधील पुढील 24 तास अत्यंत महत्वाचे 

सततच्या पावसामुळे अनेक भागांमध्ये पाणी साचल्याचे बघायला मिळतंय. लोकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. उत्तर प्रदेशसह बिहारमध्येही पावसाचा जोर वाढल्याचे चित्र आहे. बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये रस्ते जलमय झाले. राज्यातही पुढील काही दिवसांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. यावर्षी नेहमीच्या तुलनेत मॉन्सून लवकरच दाखल झाला आहे. विशेष म्हणजे दमदार पाऊस झाला. जुलै महिन्यात चांगल्या पावसाची नोंद झाली. पुणे, मुंबई आणि कोकणात आज पाऊस होण्याची शक्यता आहे.

सप्टेंबरमध्ये पुन्हा चांगला पाऊस होण्याची शक्यता

सप्टेंबरमध्ये पुन्हा चांगला पाऊस होण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) वर्तविली. नैऋत्य मान्सून हंगामाच्या दुसऱ्या सहामाहीसाठी वेधशाळेने पावसाचा अंदाज जाहीर केला आहे. आयएमडीच्या नैऋत्य मान्सून हंगामाच्या दुसऱ्या सहामाहीत आणि मासिक पाऊस आणि तापमानाचा अंदाज या दीर्घकालीन अंदाजानुसार ऑगस्ट – सप्टेंबर या कालावधीत संपूर्ण भारतात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे.

खडकवासलातून मुठा नदीत सोडलेले पाणी केले बंद

धरणसाखळीतील पावसाचा जोर ओसरल्यांन, खडकवासला धरणातून मुठा नदीत सुरू असलेला 1 हजार 670 क्यूसेक पाण्याचा विसर्ग पूर्णपणे करण्यात आला बंद. शहरातील संभाव्य पूरस्थिती रोखण्यासाठी धरणातील पाणीसाठा कमी करण्यात आला आहे.या हंगामात आतापर्यंत खडकवासला धरणातून 12.79 टीएमसी पाणी नदीत सोडण्यात आले आहे

कराडच्या जामिनावरून परळीत खळबळ, मुंडे समर्थकांची ऑडिओ क्लिप व्हायरल
कराडच्या जामिनावरून परळीत खळबळ, मुंडे समर्थकांची ऑडिओ क्लिप व्हायरल.
EVM स्ट्राँगरूमला Z+ पेक्षाही अधिक सुरक्षा, तरीही खासगी बंदोबस्त
EVM स्ट्राँगरूमला Z+ पेक्षाही अधिक सुरक्षा, तरीही खासगी बंदोबस्त.
धनंजय मुंडेंना सहआरोपी करा, जरांगेंकडून सरकारला 2 महिन्यांचा अल्टिमेटम
धनंजय मुंडेंना सहआरोपी करा, जरांगेंकडून सरकारला 2 महिन्यांचा अल्टिमेटम.
आपल्याच आमदाराला फडणवीसांकडून खडेबोल, प्रत्येक गोष्टीत लाडकी बहीण...
आपल्याच आमदाराला फडणवीसांकडून खडेबोल, प्रत्येक गोष्टीत लाडकी बहीण....
नोटांचा ढीग,आमदाराचा कॉल..दानवेंनी पोस्टनं खळबळ, VIDEOमध्ये नेमकं काय?
नोटांचा ढीग,आमदाराचा कॉल..दानवेंनी पोस्टनं खळबळ, VIDEOमध्ये नेमकं काय?.
डुकरांना सरकारच मारतंय, दिसताक्षणी... अहिल्यानगरात भयंकर घडतंय, पण का?
डुकरांना सरकारच मारतंय, दिसताक्षणी... अहिल्यानगरात भयंकर घडतंय, पण का?.
दानवेंच्या कॅश बॉम्बवरून दोन्ही सेनेत जुंपली, VIDEO मधला आमदार कोण?
दानवेंच्या कॅश बॉम्बवरून दोन्ही सेनेत जुंपली, VIDEO मधला आमदार कोण?.
ते स्वतःच्या पक्षाचा अवमान करताय, ठाकरेंच्या दाव्यावर भाजपकडून उत्तर
ते स्वतःच्या पक्षाचा अवमान करताय, ठाकरेंच्या दाव्यावर भाजपकडून उत्तर.
माजी सरन्यायाधीश गवईंवर बूट फेकणाऱ्या वकिलाला न्यायालयातच धुतलं अन्...
माजी सरन्यायाधीश गवईंवर बूट फेकणाऱ्या वकिलाला न्यायालयातच धुतलं अन्....
ही खूप मोठी बातमी, धनंजय मुंडे सरकारचा बाप... जरांगेंचा घणाघात
ही खूप मोठी बातमी, धनंजय मुंडे सरकारचा बाप... जरांगेंचा घणाघात.