Narendra Modi LIVE | येथील सरकार केंद्राच्या अनेक योजनांचे पैसे तिजोरीत ठेवून बसलंय, मोदी यांचा तृणमूल काँग्रेसवर आरोप

| Updated on: Mar 07, 2021 | 4:00 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची रॅली LIVE, सर्व अपडेट एका क्लिकवर

Narendra Modi LIVE | येथील सरकार केंद्राच्या अनेक योजनांचे पैसे तिजोरीत ठेवून बसलंय, मोदी यांचा तृणमूल काँग्रेसवर आरोप

कोलकाता : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषणाला सुरुवात केली आहे. ते पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री  ममता बॅनर्जी यांच्यावर सडकून टीका करत आहेत.

“मला पश्चिम बंगालला येण्याचे मला भाग्य लाभले. या मैदानाने अनेक देशभक्त पाहिले आहेत.  तसेच या मैदानाने बंगालच्या जनतेला वेठीस धरणारे लोकसुद्धा पाहिली आहेत. बंगालच्या जनतेने परिवर्तनाची आस सोडली नाही. येथील जनतेने  परिवर्तनासाठी ममता बॅनर्जी यांच्यावर विश्वास ठेवला.  मात्र, त्यांनी देशाचा विश्वासघात केला,” असे मोदी म्हणाले.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 07 Mar 2021 03:18 PM (IST)

    महिला दिनाच्या एक दिवस आधी बंगालमध्ये येण्याची संधी मिळाली, हे माझे सौभाग्य- मोदी

    हे माझे सौभाग्य आहे, की महिला दिनाच्या एक दिवस आधी बंगालमध्ये येण्याची संधी मिळाली

    पश्चिम बंगालने देशाला अनेक शूर महिला दिला.

    कोरोनाकाळात बंगालमध्ये अनेक महिलांना मोफत गॅसचे वाटप केला.

    तृणमूल काँग्रेसला पाणी, वीज अशा मूलभूत गोष्टींशी काही देणघेणं नाही.

    बंगालमद्ये दीड कोटी घरांमध्ये अजूनही पाणी येत नाही.

    बंगालमध्ये आर्सेनिक युक्त पाणी अजूनही कित्येक लहाना मुलांच्या आरोग्यावर परिणाम करत आहे.

    आम्ही प्रत्येक घरात पाणी पोहोचवण्यासाठी जो पैसा दिला तो पैसा ममता यांचे सरकार पूर्ण खर्च करु शकले नाही.

  • 07 Mar 2021 03:07 PM (IST)

    बंगलामध्ये रोजगाराच्या क्षमतेत बदल झाला का?, मोदी यांचा जनतेला सवाल

    बंगलामध्ये रोजगाराच्या क्षमतेत बदल झाला का?

    माय, माती, माणुसकीची सध्या बंगालमध्ये काय स्थिती आहे, हे सर्वांना माहीत आहे.

    बंगालमध्ये आजही महिलांवर अत्याचार होतात.

    मागील दहा वर्षांपासून बंगालमधील अशी एकही महिला नसेल जी कोणत्या न् कोणत्या अत्याचारामुळे रडलेली असेल .

  • 07 Mar 2021 03:00 PM (IST)

    पश्चिम बंगालमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांना पुन्हा मजबुत करण्यासाठी प्रयत्न करु- मोदी

    पश्चिम बंगालमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांना पुन्हा मजबुत करण्यासाठी आम्ही प्रयत्न करु

    बंगालमध्ये स्किल डेव्हलपमेंटसाठी केंद्र सरकारच्या योजनांना प्रभावीपणे राबवले जाईल.

    इंजिनियरिंग, डॉक्टर, टेक्नोलॉजी यांचा अभ्यास बांगला भाषेत मिळण्यासाठी आम्ही प्रयत्न करु

    इंग्रजी येत नाही म्हणून आता गरिबांचे मूल उच्च शिक्षण घेण्यापासून वंचित राहणार नाही.

    आम्ही फक्त निवडणूक जिंकण्यासाठी येथे आोलो नाहीत.

    स्वतंत्र्याच्या नावाखाली काँग्रेसने सत्ता हस्तगत केली.

    त्यानंतर येते व्होट बँकेचे राजकारण सुरु झाली.

    या राज्यावर डाव्यांनी सुद्धा राज्य केलं.  डाव्यांविरोधात ममता यांनी परिवर्तनासाठी साद घातली होती. मात्र, ममता यांनी मागील दहा वर्षांपासून बंगालच्या लोकांच्या जीवनमानात काय फरक पडला?

  • 07 Mar 2021 02:47 PM (IST)

    बंगालमध्ये शेतकरी, महिलांच्या विकासासाठी कायम प्रयत्न करु- मोदी

    भाजप प्रत्येक वेळी पश्चिम बंगालच्या जनतेची सेवा करु

    बंगलामध्ये जे भाजपचे सरकार स्थापन होईल या सरकारकडून बंगालच्या जनतेच्या विकासासाठी प्रयत्न केला जाईल.

    आम्ही महिला आणि शेतकऱ्यांच्या पूर्णपणे विकास करू

    आम्ही येथील जनतेला बंगाल सोडून पळून जाण्याची वेळ येणार नाही, यासाठी प्रयत्न करु

    येथे जास्तीत जास्त गुतंवणूक आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करु

    जे काही पश्चिम बंगालपासून हिसकावून घेण्यात आलंय ते सर्व आम्ही तुम्हाला परत करु

    पश्चिम बंगालच्या विकासासाठी पुढचे 25 वर्षे फार महत्त्वाचे आहेत.

    तुम्ही बंगालला नव्या उंचीवर नेऊन ठेवण्यासाठी मतदान करा

    देश जेव्हा  100 वा स्वातंत्र्यदिवस साजरा करेल, तेव्हा बंगाल सर्वांच्या पुढे असेल.

    कोलकाता हे शहर सिटी ऑफ जॉय आहे.

    या शहराकडे भविष्याची आस आहे. या शहराला सिटी ऑफ फ्युचर होऊ शकते.

    कोलकाता शहरात स्टर्टअपसाठी चांगले वातावरण निर्माण केले जाईल. कोलकाता येथील मेट्रोचे काम अधिक गतीने केले जात आहे .

    आगामी काळात कोलकाता शहरात मोठे फ्लाय ओव्हर तयार केले जातील.

    ज्या फ्लाय ओव्हारचे काम रखडलेले आहे. त्यांचे काम जलद गतीने केले जाईल.

  • 07 Mar 2021 02:31 PM (IST)

    नरेंद्र मोदी बिग परेड मैदानावर पोहोचले, काही क्षणांत भाषणाला सुरुवात

    नरेंद्र मोदी बिग परेड मैदानावर पोहोचले आहेत. ते काही क्षणातं भाषणाला सुरुवात करतील.

  • 07 Mar 2021 02:25 PM (IST)

    मोदी ब्रिगेड परेड मैदानावरील संभेला संबोधित करणार, भाषणास थोडा उशीर

    पंतप्रधना नंरेद्र मोदी हे पश्चिम बंगालमधील कोलकाता येथील ब्रिगेड परेड मैदानावर सभेला संबोधित करणार आहेत. थोड्या उशिराने ते भाषणास सुरुवात करतील असे सांगितले जात आहे. दरम्यान, या सभेसाठी भाजप समर्थकांनी प्रचंड गर्दी केल्याचे दिसत आहे.

Follow us
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.