भाजपवर दबाव सुरू, नितीश कुमार, चंद्रबाबूंच्या ‘त्या’ मागणीने मोदींना टेन्शन, मिलीजुली सरकारचा ट्रेलर सुरू

Chandrababu Naidu-Nitish Kumar : लोकसभा निकालात एनडीएने आघाडी घेऊनही भाजपला बहुमताचा आकडा गाठताना मोठी दमछाक झाली. त्यातच आता नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू हे किगमेकर ठरणार आहेत. या दोघांच्या भूमिकेने एनडीएमध्ये दबावतंत्राचा अध्याय सुरु होणार आहे.

भाजपवर दबाव सुरू, नितीश कुमार, चंद्रबाबूंच्या 'त्या' मागणीने मोदींना टेन्शन, मिलीजुली सरकारचा ट्रेलर सुरू
किंगमेकरचे दबावतंत्र
Follow us
| Updated on: Jun 05, 2024 | 11:09 AM

लोकसभा निवडणूक 2024 च्या निकालाने भाजपला अपेक्षित यशाचा टप्पा गाठता आला नाही. मित्र पक्षांच्या मदतीने भाजपने 300 जागांच्या जवळपास झेप घेतली. भाजप डिनर डिप्लोपसीच्या माध्यमातून पोटातून हृदयात जागा अजून पक्की करण्याचा प्रयत्न करत आहे. तर दुसरीकडे मित्र पक्षांनी पण धक्कातंत्राचा वापर सुरु केला आहे. चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार हे किंगमेकर ठरणार असल्याचे निकालावरुन स्पष्ट होत आहे. त्यात चंद्रबाबू यांनी तर मागण्यांचा खलिता पण तयार केल्याचे सांगण्यात येत आहे. या मागण्यांमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचे टेन्शन वाढणार असे चित्र आहे.

काय आहे मागणी

चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार एनडीए आघाडीवर दबाव तंत्राचा वापर करत असल्याचे समजते. लोकसभा अध्यक्षपदासाठी दोन्ही पक्ष आग्रही आहेत. चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार दोघेही लोकसभा अध्यक्षपदाची मागणी करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.पंतप्रधान मोदी आणि भाजप ही मागणी मान्य करणार का याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

हे सुद्धा वाचा

नायडू संध्याकाळी भूमिका स्पष्ट करणार

चंद्राबाबू नायडू पक्षाच्या आमदारांसोबत बैठक घेणार आहेत. टीडीपी आमदारांशी बैठक केल्यानंतरच चंद्राबाबू नायडू दिल्लीला रवाना होणार आहेत. नायडू टीडीपी आमदारांची मत जाणून घेणार आहेत. चंद्राबाबू नायडू यांचा कल इंडिया आघाडीकडे की NDA कडे आज संध्याकाळपर्यंत चित्र स्पष्ट होईल.

अखिलेश यादव यांच्या खाद्यांवर जबाबदारी

चंद्राबाबू नायडू यांना अखिलेश यादव भेटणार आहेत.आज दोन्ही नेत्यांची दिल्लीत भेट होणार असल्याची माहिती समोर येत आहे. इंडिया आघाडीकडून नायडू यांच्याशी संपर्क साधण्याची जबाबदारी अखिलेश यादव यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तेलंगणा मुख्यमंत्री रेवंत रेड्डीही चंद्रबाबू नायडू यांच्याशी संपर्क साधू शकतात. इंडिया आघाडीतील नेत्यांनी रेवंत रेड्डी यांना भेट घेण्याची जबाबदारी दिली आहे. इंडिया आघाडीत कदाचित चांगल्या पदाची, मंत्रालयाची ऑफर त्यांना देण्यात येऊ शकते.

एकाच विमानातून प्रवास

नितीश कुमार आणि तेजस्वी यादव एकाच विमानाने दिल्लीला रवाना झाले. राजधानी दिल्लीत इंडिया आघाडीची एनडीएची बैठक होत आहे. इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी तेजस्वी यादव तर एनडीएच्या बैठकीसाठी नितीश कुमार दिल्लीसाठी एकाच विमानाने रवाना झाले. दोघांच्या एकत्रित प्रवासाने चर्चेला उधाण आले आहे.

दुपारी होणार बैठक

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या मंत्रिपरिषदेची बैठक आज दुपारी 12 वाजता होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी बैठक घेणार आहेत. विद्यमान मंत्र्यांची ही शेवटची मंत्रिमंडळ बैठक असेल.लोककल्याण मार्गावरील पंतप्रधान मोदी यांच्या निवासस्थानी दुपारी 12 वाजता ही बैठक होणार आहे.

'राहुल सोलापूरकरचं तोंड फोडणाऱ्याला 1 लाख', कोणी जाहीर केलं बक्षीस?
'राहुल सोलापूरकरचं तोंड फोडणाऱ्याला 1 लाख', कोणी जाहीर केलं बक्षीस?.
'शब्द मागे घे, नाहीतर ...', आव्हाड भडकले अन् सोलापूरकरची काढली लायकी
'शब्द मागे घे, नाहीतर ...', आव्हाड भडकले अन् सोलापूरकरची काढली लायकी.
‘वेदांनुसार डॉ. भीमराव आंबेडकर हे...’, राहुल सोलापूरकर पुन्हा बरळला
‘वेदांनुसार डॉ. भीमराव आंबेडकर हे...’, राहुल सोलापूरकर पुन्हा बरळला.
'राऊतांनी ठाकरेंचा पत्ता राजकारणातून कट...', निलेश राणेंची टीका
'राऊतांनी ठाकरेंचा पत्ता राजकारणातून कट...', निलेश राणेंची टीका.
'ऑपरेशन टायगर... 100% कोकण खाली..', शिवसेनेच्या बड्या मंत्र्यांचा दावा
'ऑपरेशन टायगर... 100% कोकण खाली..', शिवसेनेच्या बड्या मंत्र्यांचा दावा.
'मला तुम्ही फार आवडता', आशा भोसलेंकडून शिंदेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा
'मला तुम्ही फार आवडता', आशा भोसलेंकडून शिंदेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा.
माझ्या वडिलांना 3 तासात संपवलं, मग..., बापाच्या न्यायासाठी लेकीची तळमळ
माझ्या वडिलांना 3 तासात संपवलं, मग..., बापाच्या न्यायासाठी लेकीची तळमळ.
हॉस्टेलवर मागवला पिझ्झा अन् 'त्या' चौघीना महिनाभर वसतिगृहात नो एन्ट्री
हॉस्टेलवर मागवला पिझ्झा अन् 'त्या' चौघीना महिनाभर वसतिगृहात नो एन्ट्री.
शिंदेंचा राजन साळवींना फोन, 'या' तारखेला पक्षप्रवेश करण्याचे आदेश?
शिंदेंचा राजन साळवींना फोन, 'या' तारखेला पक्षप्रवेश करण्याचे आदेश?.
'... तर देशमुख प्रकरणात मुंडेंना कोण अडकवणार?', धस स्पष्टच म्हणाले...
'... तर देशमुख प्रकरणात मुंडेंना कोण अडकवणार?', धस स्पष्टच म्हणाले....