AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ममता बॅनर्जी यांना मोठा झटका, बैठकीला पोहचले केवळ सहा खासदार, आमदारही घटले…

ममता बॅनर्जी यांनी त्यांच्या निवासस्थानी बोलावलेल्या पक्षाच्या आमदार आणि खासदारांच्या बैठकीला केवळ आठच आमदार आणि सहा खासदारच उपस्थित राहिल्याचे वृत्त आहे. गेल्यावेळेच्या बैठकीला २० आमदार आले होते.

ममता बॅनर्जी यांना मोठा झटका, बैठकीला पोहचले केवळ सहा खासदार, आमदारही घटले...
Mamata Banerjee and abhishek banerjee
| Updated on: Jun 05, 2026 | 8:50 PM
Share

पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणूकीत झालेल्या मोठ्या पराभवानंतर तृणमूल कांग्रेसच्या (TMC) प्रमुख ममता बॅनर्जी यांच्या पक्षात हाहाकार उडालेला आहेय शुक्रवारी ममता बॅनर्जी यांनी बोलवलेल्या आमदार आणि खासदाराच्या बैठकीला केवळ आठ आमदार आणि सहा खासदारच उपस्थित राहिल्याने पक्षात गोंधळ उडाला आहे. गेल्या वेळी झालेल्या आमदारांच्या बैठकीला केवळ २० आमदार पोहचले होते. या वेळी आकडा आणखीनच कमी झाला आहे. टीएमसीच्या ८० पैकी ५८ आमदारांनी बंडखोरी करत नवा विधीमंडळ नेता निवडला आहे.

ममता बॅनर्जी यांच्या कोलकाता येथील घरात टीएमसीच्या आमदार आणि खासदारांची बैठक बोलावली होती. बैठकीत आलेल्या आमदारात बीना मंडल, आशिमा पात्रा, मदन मित्रा, कुणाल घोष, फिरहाद हकीम, शोभनदेब चट्टोपाध्याय, बिमान बनर्जी, अशोक कुमार देब यांचा समावेश आहे.तर खासदारांमध्ये डोला सेन, माला रॉय, कल्याण बॅनर्जी अभिषेक बॅनर्जी, डेरेक ओ’ब्रायन, सुदीप बंद्योपाध्याय यांचा समावेश आहे.

तर दुसरीकडे इंडिया टुडेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार टीएमसीमध्ये लोकसभा खासदारात मोठी फूट पाहायला मिळू शकते. एकूण २९ लोकसभा खासदारांपैकी २३ खासदार बंडखोर आमदारांच्या संपर्कात आहेत. आणि येणाऱ्या काळात आणखी मोठी फूट पाहायला मिळण्याची शक्यता आहे. पक्षांतर बंदी कायद्यानुसार दोन तृतीयांश आकडा २२ आहे. तसेच राज्यसभेतील खासदारांचा विचार केला तर येथे या पक्षाकडे १३ खासदार आहेत.

तृणमूलला १९९८ मध्ये स्थापन झाल्यानंतर गेल्या २८ वर्षांच्या इतिहासात प्रथमच सर्वात मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे. काँग्रेसपासून वेगळे होत ममता बॅनर्जी यांनी तृणमुल काँग्रेसची स्थापना केली होती. तृणमुल काँग्रसेच्या अंतर्गत हे संकट केवळ सत्तेतून बाहेर होण्याचे नव्हे तर नेतृत्वाच्या एकछत्री सत्तेच्या विरोधात आहे. नाराज झालेले बंडखोर आमदार आताही ममता बॅनर्जी यांचे नेतृत्व स्वीकारत असले तरी ममता यांचा भाचा आणि राजकीय वारसदार मानल्या जाणाऱ्या अभिषेक बॅनर्जी यांचा खुला विरोध करत आहेत.

पक्षाचे वरिष्ठ खासदार सुदीप बंद्योपाध्याय यांनी म्हटले आहे की लोक ममता बॅनर्जीची साथ जे सोडत आहेत, त्यांचे राजकीय अस्तित्व त्यांच्या शिवाय नाही. पार्टीचे वरिष्ठ राज्यसभा खासदार सुखेंदु शेखर रॉय यांनी शंका व्यक्त केली आहे की हा असंतोषाचा भडका पुढे जाऊन संसदेपर्यंत पसरु शकतो. मात्र, पार्टीच्या नेतृत्वाचा दावा आहे की सध्या खासदारांमध्ये कोणत्याही संघटीत बंडखोरीचे संकेत नाहीत. परंतू तरीही चिंता व्यक्त केली जात आहे की विधानसभेचे हे संकट लोकसभा आणि राज्यसभेपर्यंतही जाऊ शकते.

ममता यांचा आमदारांना रोखण्याचा प्रयत्न

तृणमुल काँग्रेसच्या प्रमुख नेत्या ममता बॅनर्जी यांनी पक्षाच्या २८ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदा पडलेल्या फूटीनंतर पक्षातून पळणाऱ्या आमदारांना रोखण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्या व्यक्तीगत रुपाने सर्व बंडखोर आमदारांशी संपर्क करत आहेत. तर पक्षाचे अन्य ज्येष्ठ नेते आमदारांना एकजूट करण्याच्या मागे लागले आहेत. ममता यांनी गेल्या दोन दिवसात हावडा, मुर्शिदाबाद, उत्तर दिनाजपूर येथील अनेक आमदारांशी संपर्क साधला आहे. ज्यातील अनेकांनी रीताब्रता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली बंडखोरांच्या बैठकीत भाग घेतला होता.

Follow Us
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
ममता बॅनर्जींना मोठा झटका! विश्वासू खासदाराला... लोकसभेत नेमकं काय घडल
ममता बॅनर्जींना मोठा झटका! विश्वासू खासदाराला... लोकसभेत नेमकं काय घडलं?
पंढरीकडे पालख्यांचे अंतिम पाऊल! वाखरीत पालखी सोहळ्याची जय्यत तयारी
Pandharpur Wari 2026 | पंढरीकडे संतांच्या पालख्यांचे अंतिम पाऊल! वाखरीत पालखी सोहळ्याची जय्यत तयारी
मोठी बातमी! ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर..
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर...
आंदोलनामध्ये पोलिसांनी वापरली छऱ्यांची बंदूक; द हिंदूचा मोठा दावा
आंदोलनामध्ये पोलिसांनी वापरली छऱ्यांची बंदूक, 25 वर्षीय तरुण जखमी; द हिंदूचा मोठा दावा
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ..
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ दासने दिली अपडेट
Farmer Loan Waiver List : कर्जमाफीचा लाभ मिळण्यास सुरुवात, पण या शेतकऱ्यांना लाभ मिळणारच नाही, ती अट काय?.

Farmer Loan Waiver List : कर्जमाफीचा लाभ मिळण्यास सुरुवात, पण या शेतकऱ्यांना लाभ मिळणारच नाही, ती अट काय?

विद्यार्थ्यांवर कारवाई नको, संसदेत चर्चा करा; वांगचुक यांचं केंद्राला पत्र.

विद्यार्थ्यांवर कारवाई नको, संसदेत चर्चा करा; वांगचुक यांचं केंद्राला पत्र

फरफटत नेत होते, पण पोलीस कानात सांगत होते, यांना हटवा : राहुल गांधी.

फरफटत नेत होते, पण पोलीस कानात सांगत होते, यांना हटवा : राहुल गांधी

Rahul Gandhi Demands : प्रधानांचा राजीनामा, मोदींकडून माफी, विद्यार्थ्यांच्या मागण्यावर राहुल गांधी ठाम!.

Rahul Gandhi Demands : प्रधानांचा राजीनामा, मोदींकडून माफी, विद्यार्थ्यांच्या मागण्यावर राहुल गांधी ठाम!

Team India: सहा खेळाडूंमुळे टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, बीसीसीआयवर थेट प्रश्नचिन्ह.

Team India: सहा खेळाडूंमुळे टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, बीसीसीआयवर थेट प्रश्नचिन्ह

कॉकरोच पळवण्याचे 4 सुरक्षित घरगुती उपाय, तिसरा सर्वात खास, परत घरात दिसणारच नाहीत...

कॉकरोच पळवण्याचे 4 सुरक्षित घरगुती उपाय, तिसरा सर्वात खास, परत घरात दिसणारच नाहीत..