आता लग्नापूर्वी शारीरिक संबंध…, या मुस्लिम देशात 2 जानेवारीपासून नवा कायदा, उडाली मोठी खळबळ
नव्या कायद्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे, येत्या 2 जानेवारीपासून हा नवा कायदा लागू होणार आहे. या कायद्यामुळे वातावरण चांगलंच तापलं आहे. या कायद्याला विरोध होत आहे.

मुस्लिम देश असलेल्या इंडोनेशियामध्ये आता 2 जानेवारीपासून एक नवा कायदा लागू करण्यात येणार आहे. या नव्या कायद्यामुळे इंडोनेशियात वातावरण चांगलंच तापलं आहे, तसेच चिंता देखील व्यक्त केली जात आहे. या नव्या कायद्यामुळे लग्नापूर्वी शारीरिक संबंध आणि सरकारी संस्थांचा अपमान हा दखलपात्र गुन्हा मानला जाणार आहे. जर असं कोणी करताना आढळलं तर त्याची आता थेट तुरुंगात रवानगी होणार आहे. देशाची संस्कृती टिकून रहावी, तसेच नागरिकांनी कायदा सुव्यवस्थेतचं पालन करावं, यासाठी हा नवा कायदा बनवण्यात आल्याचं स्पष्टीकरण इंडोनेशियातील सरकारने दिलं आहे. मात्र या कायद्याचा दुरुपयोग होऊ शकतो, यामुळे लोकांना चुकीच्या पद्धतीने जेलमध्ये टाकलं जाईल अशी भीती मानवाधिकार कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली जात आहे, तसेच हा कायदा रद्द करण्यात यावा अशी मागणी देखील सुरू आहे, त्यामुळे आता देशात वातावरण चांगलंच तापलं आहे. या कायद्याविरोधात मोठ्या आंदोलनाची शक्यता आहे.
हा 345 पानांचा कायदा 2022 मध्ये मंजूर करण्यात आला होता. इंडोनेशियामध्ये असलेला जुना कायदा रद्द करून आता त्याची जागा हा नवा कायदा घेणार आहे. इंडोनेशियाच्या कायदा मंत्र्यांनी याबाबत माहिती देताना सांगितलं की, गेल्या अनेक वर्षांपासून हा कायदा मंजूर करण्यासाठी प्रयत्न सुरू होते. 2022 मध्ये या कायद्याला मंजूरी देण्यात आली. या कायद्याचा दुरपयोग होऊ शकतो , अशी भीती व्यक्ती केली जात आहे, ही शक्यता पूर्णपणे नाकारता येणार नसली तर देशासाठी या कायद्याची गरज होती असं इंडोनेशियाच्या कायदा मंत्री यांनी म्हटलं आहे.
लग्नापूर्वी शारीरिक संबंध गुन्हा
दरम्यान नव्या कायद्यानुसार आता लग्नापूर्वी शारीरिक संबंध गुन्हा मानला जाणार आहे. यासाठी एक वर्षांची शिक्षा होऊ शकते. मात्र यामध्ये एक अट अशी आहे की, अशा गुन्ह्यांमध्ये आरोपीच्या नातेवाईकांनी जर तक्रार दाखल केली तरच हा गुन्हा मानण्यात येणार आहे, यापूर्वी इंडोनेशियामध्ये विवाहबाह्य संबंध गुन्हा माणण्यात येत होते, मात्र आता लग्नापूर्वी शारीरिक संबंध प्रस्तापीत करणे हा देखील गुन्हा मानला जाणार आहे. मात्र या कायद्यातून परदेशी पर्यटकांना सूट देण्यात आली आहे, अशी माहिती देखील समोर येत आहे.
