कमालच झाली, आता मधमाशांनी रोखले विमान, असे काही झाले की फायर ब्रिगेड बोलवावी लागली
मधमाशा तोपर्यंत धोकादायक नसतात जोपर्यंत त्यांना कोणताही धोका जाणवत नाही. मात्र त्या स्वत:च्या रक्षणासाठी दंश मारण्यास सुरु करतात. त्यामुळे प्रचंड वेदना होऊन माणूस जायबंदी होऊ शकतो. काही लोकांना एलर्जीची रिएक्शन होऊ शकते.

तुम्ही पक्षांच्या प्रादुर्भावाने विमान सेवा बाधित किंवा अपघात झाल्याचे अनेकदा ऐकले असेल. गुजरातच्या सुरत एअरपोर्टवर अनोखा प्रकार घडला आहे. ज्याची कोणी कल्पनाही केली नसेल. तेथे चक्क मधमाशांनी विमानाला रोखले. इंडिगोच्या एका विमानाला सुरत एअरपोर्टवरुन जयपूरसाठी उड्डाण घ्यायचे होते. परंतू अचानक मधमाशांनी हल्ला केल्याने अफरातफरी माजली. त्यामुळे फ्लाईट लेट झाली आणि प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला.
काय आहे प्रकरण ?
सुरत एअरपोर्टवरुन सायंकाळी ४.२० वाजता फ्लाईट रवाना होणार होती. तेवढ्यात विमानावर अचानक मधमाशांचा हल्ला झाला. मधमाशांनी विमानाच्या लगेजवाल्या गेटवर हल्लाबोलच केला. त्यामुळे विमानात लगेज चढवण्याचे काम ठप्प झाले. त्याचवेळी प्रवाशांची बोर्डींग देखील प्रभावीत झाली.
त्यानंतर मधमाशांना पळवून लावण्यासाठी धुर करण्याचा प्रयत्न केला गेला. त्यामुळेही मधमाशा काही हटेनात नंतर फायर ब्रिगेडला अखेर पाचारण करण्यात आले. त्यानंतर फायर ब्रिगेडला पाचारण करण्यात आले. पाण्याचा फवारा मारुन फायर ब्रिगेडच्या जवानांना या मधमाशांना हटवले. त्यानंतर कुठे मधमाशांनी माघार घेतली. त्यानंतर हे विमान उशीराने जयपुरसाठी रवाना करण्यात आले.
याबाबत मिळालेल्या माहीतीनुसार मधमाशांनी हल्ला केला तेव्हा प्रवासी विमानात बसले होते. आणि त्यांचे लगेज ठेवले गेले होते. परंतू मधमाशांचा घोळका उघड्या दरवाजावर जाऊन बसला. त्यानंतर त्यास हटविण्याचा प्रयत्न सुरु झाला.
मधमाशाचा डंख खूपच तीव्र वेदना देणारा असून त्याने सूजही येते. हा दंश एक ते दोन दिवसांनी बरा होतो. काही लोकांना मधमाशांनी गंभीर अलर्जी होऊ शकते. त्यामुळे श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. चक्कर येणे किंवा मनुष्य बेशुद्ध होऊ शकते. अशावेळी तातडीने वैद्यकीय उपचाराची गरज असते. मधमाशाच्या पोळ्यावर कोणी हल्ला केला तर त्या समुहाने हल्ला करु शकतात. काही मधमाशांच्या दंशाच्या (टॉक्सिक रिएक्शन) विषारी तत्वाने मृत्यू देखील होऊ शकतो. खास करुन जास्त संख्येने हल्ला होतो.
