‘आता आरोग्य सर्वोपरि, विश्वास आणि स्नेह जीवनभर लक्षात राहील…,’ जगदीप धनखड यांनी राष्ट्रपतींना लिहीले भावूक पत्र
भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. आपण प्रकृतअस्वास्थ्याच्या कारणाने राजीनामा देत आहोत. आता आरोग्य सर्वोपरि, विश्वास आणि स्नेह जीवनभर लक्षात राहील असे त्यांनी राष्ट्रपतींना लिहीलेल्या पत्रात म्हटले आहे.

देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आरोग्याच्या कारणांसाठी आणि डॉक्टरांच्या सल्ल्याचे पालन करीत आपल्या पदाचा तत्काल प्रभावाने राजीनामा दिला आहे. त्यांनी राष्ट्रपती, पंतप्रधान आणि सर्व खासदारांचे आभार मानले आहेत. आपल्या कार्यकाळाला त्यांनी शिकवण आणि भारताच्या प्रगतीचा महत्वपूर्ण हिस्सा म्हटले आहे. हा राजीनामा त्यांनी घटनेच्या कलम 67(क) अंतर्गत दिला आहे.
भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी हा निर्णय आपल्या प्रकृतीच्या कारणासाठी दिला असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आपण राजीनामा देत असल्याचे म्हटले आहे. त्यांचा राजीनामा घटनेचा कलम 67(क)अनुसार तत्काल प्रभावाने लागू झाला आहे.
आपल्या राजीनाम्यात त्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या सोबत काम करण्याला सुखद अनुभव म्हटले आहे. आणि त्यांच्या निरंतर सहकार्यासाठी आभार मानले आहेत. तसेच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मंत्रीमंडळाच्या सहकार्याबद्दल देखील धन्यवाद म्हटले आहे. उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आपल्या पत्रात म्हटले की पंतप्रधानांच्या पाठिंब्यामुळे खूप काही शिकण्याची संधी मिळाली असेही म्हटले आहे.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना लिहिले पत्र
जगदीप धनखड यांनी सर्व खासदारांनी दाखवलेला विश्वास आणि स्नेह आणि आपलेपणा हा आठवणीत राहाणारा आणि कायम माझ्या हृदयात राहील असे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.
आरोग्यासंबंधीची कारणे
धनखड यांनी भारताची आर्थिक प्रगती आणि अद्भूत विकासाला एक गौरवपूर्ण यात्रा म्हटले आहे. आणि या ऐतिहासिक काळात सेवा करणे माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट राहिल्याचे म्हटले आहे. पद सोडताना त्यांनी भारताच्या उज्ज्वल भविष्यावर संपूर्ण विश्वास व्यक्त केला आणि भारताचा जागतिक उंची वेगाने वाढत असल्याचे नमूद केले आहे.
