AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Twitter Down | जगभरात ट्विटर डाऊन, युजर्सना अनेक अडचणी; कारण अस्पष्ट

जगभरात प्रसिद्ध असलेली मायक्रोब्लॉगिंग साईट ट्विटर आज काही काळासाठी डाऊन झाली होती.

Twitter Down | जगभरात ट्विटर डाऊन, युजर्सना अनेक अडचणी; कारण अस्पष्ट
ट्विटर
| Updated on: Mar 29, 2021 | 11:43 PM
Share

Twitter Down | जगभरात प्रसिद्ध असलेली मायक्रोब्लॉगिंग साईट ट्विटर आज काही काळासाठी बंद (Twitter down) झाली होती. जगभरातील युजर्सना ट्विटरवर अडचण येत होती. अमेरिकेच्या वेळेनुसार साधारणत: सकाळी 10.30 वाजेपासून ट्विटरवर तांत्रिक अडचणी निर्माण होत होत्या. तसे ट्विट युजर्सनी केले आहेत. प्रामुख्याने अमेरिका, ब्रिटनसारख्या देशात ही अडचण निर्माण झाली होती. अमेरिकेच्या वेळेप्रमाणे तब्बल एका तासाने म्हणजेच सकाळी 11.30 वाजता ही सेवा पुन्हा सुरळीत झाली. मात्र अजूनही काही ठिकाणी युजर्सना अडचणी येत असल्याची तक्रार आहे. (Twitter down worldwide users were unable to access the Twitter)

जगभरात ट्विटर क्रॅश

आज (29 मार्च) सकाळी साधारण 10.30 पासून ट्विटर वापरण्यास अचानकपणे अडचणी येत होत्या. त्यानंतर काही क्षणांत जगभरातून #twitter down हा हॅशटॅग ट्रेंडींगला आला होता. अनेकांनी ट्विट, रिट्विट तसेच मिडीया अ‌ॅक्सेस करण्यासाठी अनेक अडचणी येत असल्याची तक्रार केली होती. अमेरिका, ब्रिटनसारख्या मोठ्या देशांमध्या ही अडचण पाहायला मिळाली. त्यानंतर तब्बल एका तासानंतर ट्विटर पुन्हा सुरळीत झाले. एका रिपोर्टनुसार 16000 पेक्षा जास्त युजर्स या अडचणीने प्रभावित झाले होते.

मागील आठवड्यात फेसबुक, इन्स्टाग्रावर डाऊन

जगातील प्रसिद्ध आणि सर्वात जास्त युजर्स असलेलं मेसेजिंग अ‌ॅप 19 मार्च रोजी व्हॉट्सअ‌ॅपचं सर्व्हर 45 मिनिटांसाठी डाऊन झालं होतं. हीच अडचण फेसबुक आणि इन्स्टाग्रामवुरसुद्धा निर्माण झाली होती. फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर व्हाईस मेसेजिंग, व्हिडीओ शेअरिंग, ग्रुप चॅट हे सर्व फिचर्स अचानकपणे बंद झाले होते. व्हॉट्सअ‌ॅपसोबतच फेसबुक मेसेंजर, इन्स्टाग्रामसुद्धा काही काळासाठी डाऊन झाले होते. या तिन्ही अ‌ॅपवरील सेवा अचानक बंद पडल्यामुले ट्विटरवर एकच खळबळ उडाली होती. काही क्षणात ट्विटरवर whatsapp down हा ट्रेण्ड सुरु झाला. ही तिन्ही अ‌ॅप अचनाकपणे बंद पडण्यामागचं  नेमकं कारण अद्याप समजून तरी शकलेलंल नाही. मात्र, काही तांत्रिक कारणांमुळे मेसेजिंगला अडचण आल्याचं सांगितलं जात आहे. नंतर 45 मिनिटांनंतर या तिन्ही अ‌ॅपच्या सेवा पुन्हा सुरळीत झाल्या.

इतर बातम्या :

मेहबुबा मुफ्ती यांचा पासपोर्ट देण्यास नकार; केंद्र सरकारवर मुफ्ती भडकल्या

धक्कादायक, ओडिशात पोलिसांनी गर्भवती महिलेला कडक उन्हात 3 किमी पायपीट करायला लावली, कारण ऐकून अवाक व्हाल

जम्मू-काश्मीर : सोपोरमध्ये नगरसेवकांच्या बैठकीवर मोठा दहशतवादी हल्ला, एका PSOसह दोघांचा मृत्यू

(Twitter down worldwide users were unable to access the Twitter)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.