AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

177 एपिसोड्सची भयानक हॉरर वेबसीरिज, पाहताना थरथर कापाल, होतील भास…OTTवर होतेय ट्रेंड

'ही' हॉरर सीरिज OTT वर धुमाकूळ चांगलीच चर्चेत आहे. तुम्ही देखील ही वेब सीरिज पाहण्याचा विचार करत असाल तर एकदा नक्की बघा...

| Updated on: Mar 23, 2026 | 4:35 PM
Share
हॉरर कंटेंट पाहताना तुमचीही झोप उडते का? पण तरीही त्यात एक वेगळीच मजा येते, असं वाटतं? मग ही सीरिज तुमच्यासाठीच आहे. ही वेबसीरिज पाहिल्यानंतर रात्री झोपताना पाठीमागे कोणीतरी उभा आहे का, दाराआडून कोण बघतंय का, असा सतत भास होईल. भीतीचा हा अनुभव खरंच अविस्मरणीय आहे.

1 / 7
हॉलिवूडमध्ये सर्वाधिक लोकप्रिय आणि गाजलेली ही सीरिज आहे 'द वॉकिंग डेड' (The Walking Dead). २०१० मध्ये सुरू झालेल्या या सीरिजची क्रेझ आजही कायम आहे. एकूण ११ सीझन आणि तब्बल १७७ एपिसोड्स असलेली ही मालिका प्रेक्षकांना झोम्बी अपोकॅलिप्सच्या भयानक जगात घेऊन जाते.

2 / 7
रॉबर्ट किर्कमॅन यांच्या प्रसिद्ध कॉमिक बुकवर आधारित असलेली ही कथा फक्त एक साधी गोष्ट नाही, तर चालत्या-फिरत्या प्रेतांचं (झोम्बींचं) एक असं भयावह जग आहे, जिथून सुटका मिळणं जवळपास अशक्य आहे.

3 / 7
कथेच्या सुरुवातीला मुख्य पात्र रिक ग्राइम्स (पोलिस अधिकारी) कोमातून जागा होतो आणि त्याला धक्काच बसतो. संपूर्ण जग एका भयंकर व्हायरसने उद्ध्वस्त झालं आहे. माणसं आता माणसं उरलेली नाहीत, तर नरमांस खाणारे झोम्बी बनली आहेत. शहरं ओस पडली आहेत, रस्त्यावर फक्त मृतदेह फिरत आहेत.

4 / 7
रिक आणि त्याचे काही साथीदार या नरकातून वाचण्यासाठी, एकमेकांना वाचवण्यासाठी आणि स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी कशी संघर्ष करतात, याचा रोमांचक आणि अंगावर काटा आणणारा प्रवास या सीरिजमध्ये दाखवला आहे.

5 / 7
'द वॉकिंग डेड' केवळ कथानकामुळे नाही, तर त्यातील कलाकारांच्या जबरदस्त अभिनयामुळेही जगभरात गाजली. IMDb वर या सीरिजला ८.१ चं उत्तम रेटिंग मिळालं आहे. नॉर्मन रीडस (डॅरिल), मेलिसा मॅकब्राइड (कॅरोल), लॉरेन कोहन (मॅगी) आणि जेफ्री डीन मॉर्गन (नेगन) यांसारख्या दिग्गज कलाकारांनी यात अफलातून काम केलं आहे. विशेषतः जेफ्री डीन मॉर्गनच्या एन्ट्रीने आणलेला ट्विस्ट आजही प्रेक्षकांना धक्का देतो.

6 / 7
जर तुमच्यात १७७ एपिसोड्स पाहण्याचं धाडस असेल आणि झोम्बींच्या भीतीचा सामना करण्याची तयारी असेल, तर ही सीरिज तुम्ही नेटफ्लिक्स वर (किंवा उपलब्ध असलेल्या इतर प्लॅटफॉर्मवर) पाहू शकता.

7 / 7
Follow Us
मुंबईकरांनो, पाणीकपात तूर्तास कायम! पाऊस ओसरल्याने प्रशासनाचा निर्णय
Mumbai Water Cut | मुंबईकरांनो, पाणीकपात तूर्तास कायम! धरणसाठा 88.70% वर; पाऊस ओसरल्याने प्रशासनाचा मोठा निर्णय
मोठी घडामोड! सुप्रिया सुळे 8 खासदारांसह पंतप्रधान मोदींना भेटणार
मोठी घडामोड! सुप्रिया सुळे 8 खासदारांसह पंतप्रधान मोदींना भेटणार; आज दिल्लीच्या बैठकीत काय निर्णय होणार?
तुम्ही वेळ घ्या, पंतप्रधान तुम्हालादेखील भेटतील; शिंदे गटातील बड्या...
तुम्ही वेळ घ्या, पंतप्रधान तुम्हालादेखील भेटतील; शिंदे गटातील बड्या नेत्याचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला
बापरे! चप्पल, बूट अन् चिखलाचा मारा; ममता बॅनर्जींच्या दौऱ्यादरम्यान
बापरे! चप्पल, बूट अन् चिखलाचा मारा; ममता बॅनर्जींच्या दौऱ्यादरम्यान धक्कादायक घटना, व्हिडीओच आला समोर
जरांगेंना मिरची लागली, ते हवेवर...गुणरत्न सदावर्तेंचा जरांगेंवर संताप
जरांगेंना मिरची लागली, ते हवेवर...गुणरत्न सदावर्ते  मनोज जरांगेंवर भडकले; सडकून टीका!
मोठी बातमी! पुण्यातील नामांकित पबवर कारवाई; तब्बल 62 जणांची...
मोठी खळबळ! पुण्यातील नामांकित पबवर कारवाई; तब्बल 62 जणांची... नेमकी भानगड काय?
रक्तदान महादान! 1200 शिवसैनिकांचा समावेश; दिल्लीत शिवसेनेकडून 'सिंदुर'
रक्तदान महादान! 1200 शिवसैनिकांचा समावेश; दिल्लीत शिवसेनेकडून 'सिंदुर' महारक्तदान शिबीराचे आयोजन
पंढरपूरात मनोज जरांगे पाटलांचं जंगी स्वागत! पहा Video
Manoj Jarange Patil | पंढरपूरात मनोज जरांगे पाटलांचं जंगी स्वागत! फुलांचा वर्षाव अन्... पहा व्हिडीओ
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंकडून मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी
Raj Thackeray | मनसे अध्यक्ष राज ठाकरेंकडून मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी
मुख्यमंत्री फडणवीस आणि शरद पवार गटातील नेत्याचा एकाच विमानाने प्रवास
मोठी बातमी! मुख्यमंत्री फडणवीस आणि शरद पवार गटातील बड्या नेत्याचा एकाच विमानाने प्रवास, फोटो आले समोर