PHOTO | 19 वर्षांची ‘जगातील सर्वात सुंदर मुलगी’, 36 वर्षांच्या अब्जाधीशाला करतेय डेट!

19 वर्षीय इस्त्रायली मॉडेल येल शेलबियाने टीसी कॅन्डलरच्या 100 सर्वात सुंदर चेहऱ्यांच्या वार्षिक यादीमध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 16:02 PM, 22 Jan 2021
1/5
19 वर्षीय इस्त्रायली मॉडेल येल शेलबियाने टीसी कॅन्डलरच्या 100 सर्वात सुंदर चेहऱ्यांच्या वार्षिक यादीमध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे. इन्स्टाग्रामवर 1 दशलक्षाहून अधिक फॉलोअर्स असणारी येल तिच्या स्वप्नवत जीवनशैलीमुळे देखील चर्चेत असते. मात्र, तिच्या या झगमगाटी जीवनशैलीमुळे तिला मोठ्या प्रमाणात ट्रोलिंगचा सामनाही करावा लागला आहे.
2/5
येलचा जन्म इस्त्रायलच्या एका छोट्या शहरातील ज्यू कुटुंबात झाला. तिने वयाच्या 16व्या वर्षापासून मॉडेलिंगला सुरुवात केली. स्थानिक फोटोग्राफरने तिचे इन्स्टाग्राम फोटो पाहिले आणि त्यानंतर तिला फोटोशूटमध्ये भाग घेण्यास सांगितले, त्यावेळेस येलची मॉडेलिंग कारकीर्द सुरू झाली. येले यांनी इस्त्रायली हवाई दलाबरोबर देश सेवाही केली आहे.
3/5
येल सध्या 36 वर्षांचे अब्जाधीश ब्रॅंडन कॉर्फ यान डेट करत आहे. ब्रॅंडन हा अमेरिकन अब्जाधीश व्यावसायिका समनर रेडस्टोनचा नातू आहे. येलने किम कार्दाशियन आणि कायली जेनर यासारख्या सेलिब्रेटींच्या स्किन रेंज उत्पादनांसाठी मॉडेलिंगही केली आहे. तिने सुपरस्टार फुटबॉलर लिओनेल मेस्सीबरोबरही काम केले आहे. कोरोना विषाणूचा फटका येललाही बसला आहे. परंतु, कामाच्या संदर्भात पुन्हा एकदा अमेरिका आणि युरोपमध्ये जाण्यास ती उत्सुक आहे.
4/5
सन वेबसाईटशी बोलताना येल म्हणाले की, तिला तिच्या लूकसाठी बऱ्याचदा ट्रोल व्हावे लागले होते. ती म्हणते की, मला लोकांकडून खूप पाठिंबा आणि प्रेम मिळते, परंतु या व्यतिरिक्त मला असे बरेच मेसेज येतात जे अतिशय द्वेषपूर्ण असतात. मी अशा गोष्टींकडे फारसे लक्ष देत नाही. येल म्हणाली की, तिला ही स्पर्धा आपण जिंकलो हे कळताच खूप आश्चर्य वाटले. कारण यावर्षी आपण या स्पर्धेचा भाग आहोत, हे तिला माहितच नव्हते.
5/5
2017 मध्ये येल या यादीमध्ये 14व्या स्थानावर होती. तर, 2018मध्ये ती तिसर्‍या स्थानावर पोहोचली. 2019मध्ये एक पाऊल पुढे टाकत ती दुसर्‍या स्थानावर पोहोचली ब्रिटीश चित्रपट समीक्षक टीसी कॅन्डलर हे या स्पर्धेचे संचालक आहेत. या यादीत येल आधी मॅरियन कोटिल्ड आणि जॉर्डन डन यासारख्या सेलिब्रिटींनीही प्रथम क्रमांक पटकावला होता.