PHOTO | थोडंसं शूटिंग आणि धमाल मस्ती, ‘माझा होशील ना’च्या सेटवर ‘आमरस’ अन् ‘मिसळ’ पार्टी!

सध्या कोरोनच्या प्रादुर्भावामुळे राज्यात लॉकडाऊन सुरु असताना, प्रेक्षकांच्या मनोरंजनाचा वसा घेतलेल्या मालिकांचं चित्रीकरण मात्र थांबलं नाही. झी मराठीवरील प्रेक्षकांची आवडती मालिका 'माझा होशील ना'चं शूटिंग सध्या सिल्व्हासामध्ये चालू आहे.

1/6

2/6
जवळपास एका महिन्यापासून हे सर्व कलाकार आपल्या कुटुंबापासून दूर राहून तिकडे परराज्यात चित्रीकरण करत आहेत.
3/6
जरी कुटुंबापासून दूर असले तरी मालिकेतील सर्व कलाकार आणि तंत्रज्ञ कुटुंबाप्रमाणेच एकमेकांची काळजी घेत आहे आणि तितकीच धमाल देखील करत आहेत.
4/6
नुकतंच या मालिकेच्या सेटवर संपूर्ण टीमने आमरस आणि मिसळ पार्टी आयोजित केली होती. घरापासून दूर असल्यामुळे मनसोक्त आंबे खाण्याची संधी हुकली असं होऊ नये, म्हणून सेटवरच या टीमने आमरसचा मनमुराद आस्वाद घेतला. सोबतच झणझणीत मिसळ देखील होती.
5/6
सेटवर आमरस आणि मिसळचा बेत असल्यामुळे सर्वांच्या तोंडाला पाणी तर सुटलंचं पण जिभेवरचा ताबा देखील सुटला आणि संपुन टीमने काही मिनिटातच या चविष्ट पदार्थांचा फडशा पडला.
6/6
या खास ‘आमरस’ आणि ‘मिसळ’ पार्टीची ही क्षणचित्रं मालिकेच्या चाहत्यांसाठी!