PHOTO | अवघ्या तीन महिन्यांचा ‘हा’ स्टारकिड इन्स्टाग्रामवर सक्रिय, फॉलोअर्सच्याबाबतीत बड्या कलाकारांना देतोय टक्कर!

टीव्ही अभिनेत्री अनिता हसनंदानी (Anita Hassnandani) हिचा मुलगा आरव रेड्डी (Aarav Reddy) सध्या इंटरनेटवर खूप चर्चेत आला आहे. तीन महिन्यांचा आरव खूपच गोंडस आहेच, तसेच चाहत्यांचा लाडका देखील आहे.

1/7
टीव्ही अभिनेत्री अनिता हसनंदानी (Anita Hassnandani) हिचा मुलगा आरव रेड्डी (Aarav Reddy) सध्या इंटरनेटवर खूप चर्चेत आला आहे. तीन महिन्यांचा आरव खूपच गोंडस आहेच, तसेच चाहत्यांचा लाडका देखील आहे. त्याच्या गोंडस स्माईलपासून त्याच्या नटखट बाललीला चाहत्यांची मने जिंकत आहेत.
2/7
अनिताचा मुलगा आरव रेड्डी याचा जन्म 9 फेब्रुवारी 2021 रोजी झाला होता. आरव अगदी त्याचे वडील रोहित रेड्डी यांच्यासारखा दिसत आहे. अशा वेळी त्याच्या फोटोशूटसाठी मॅचिंग कपडे तयार केले आहेत. याशिवाय आरव याचे स्वतःचे इंस्टाग्राम अकाऊंटही सुरू करण्यात आले आहे.
3/7
आरव रेड्डीच्या जन्माच्या काहीच दिवसांनंतर अनिता आणि रोहित रेड्डी यांनी त्याचे इंस्टाग्राम अकाऊंट तयार केले होते. 21 फेब्रुवारी रोजी आरवच्या अकाऊंटवरून पहिली पोस्ट शेअर करुन त्याच्या जन्माची गोड बातमी शेअर करण्यात आली.
4/7
आरव रेड्डीचे इन्स्टा खाते त्याची आई अनिता हसनंदानी आणि वडील रोहित रेड्डी चालवत आहेत. अनिता आणि रोहित आपल्या मुलाच्या प्रेमात आहेत आणि चाहत्यांबरोबर त्याच्या छोट्या-छोट्या गोड बातम्या शेअर करण्यात मग्न आहेत.
5/7
आरव रेड्डी बहुधा टीव्ही इंडस्ट्रीमधील एकमेव स्टार किड आहे, ज्याचे इन्स्टाग्रामवर अकाऊंट आहे. बहुतेक कलाकार आपल्या मुलांना माध्यमांपासून दूर ठेवतात आणि सोशल मीडियावर चेहरा दाखवण्यापासून मागे राहत असताना, अनिता आणि रोहित रेड्डी आपल्या मुलाची गोड स्माईल चाहत्यांसोबत शेअर करतात.
6/7
चिमुकल्या आरव रेड्डीच्या इन्स्टाग्रामवर आपल्याला त्याच्यासोबत त्याच्या आईवडिलांचे मजेदार व्हिडीओ आणि फोटो पाहायला मिळतात. तसेच, अनिता आणि रोहित कॅप्शनमध्ये त्याच्या बाललीला आणि सवयींबद्दल सांगत असतात.
7/7
तीन महिन्यांच्या आरव रेड्डीचे एक लाखाहून अधिक इन्स्टाग्राम फॉलोअर्स आहेत. आरवच्या अकाऊंटवर फोटो आणि व्हिडीओ सामायिक करण्याव्यतिरिक्त अनिता हसनंदानी आणि रोहित रेड्डी यांनी त्यांचे मजेदार व्हिडीओ देखील शेअर केले आहेत.