AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बॉलिवूडच्या या अभिनेत्रीने कधीच दिला नाही बोल्ड आणि किसिंग सीन, तरीही दिले अनेक सुपरहिट चित्रपट

बॉलिवूडमधील या प्रसिद्ध अभिनेत्री कधीच दिला नाही बोल्ड आणि किसिंग सीन, ना कधीच घातले टीका होतील असे कपडे. अनेक सुपरहिट चित्रपटांना दिला नकार.

| Updated on: Jul 09, 2026 | 1:29 PM
Share
80च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे यांनी आपल्या निरागस अभिनयाने आणि साध्या व्यक्तिमत्त्वाने प्रेक्षकांची मनं जिंकली. बालकलाकार म्हणून कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या पद्मिनी यांनी पुढे अनिल कपूर, ऋषी कपूर, राजेश खन्ना यांच्यासह अनेक दिग्गज कलाकारांसोबत काम केले.

1 / 5
मात्र, आपल्या ठाम तत्त्वांमुळे त्यांनी अनेक मोठ्या चित्रपटांच्या ऑफर्स नाकारल्या. 1982 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘प्रेम रोग’ या चित्रपटाने पद्मिनी यांच्या कारकिर्दीला नवे वळण दिले. दिग्दर्शक राज कपूर यांच्या या चित्रपटात त्यांनी विधवा मनोरमा ही संवेदनशील भूमिका साकारली.  त्यातील गाणी आजही लोकप्रिय असून, पद्मिनी यांच्या अभिनयाचे विशेष कौतुक झाले.

2 / 5
या चित्रपटात राज कपूर यांना एक किसिंग सीन ठेवायचा होता. मात्र, पद्मिनी यांनी अशा प्रकारच्या सीनला स्पष्ट नकार दिला. त्यांच्या मते, अशा भूमिका किंवा बोल्ड सीन करणे त्यांना मान्य नव्हते. त्यामुळे त्यांनी आपल्या तत्त्वांशी तडजोड केली नाही.

3 / 5
'प्रेम रोग'च्या यशानंतर राज कपूर यांनी 1985 मध्ये ‘राम तेरी गंगा मैली’ या चित्रपटासाठीही पद्मिनी यांना भूमिका देण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र, चित्रपटातील बोल्ड सीनमुळे पद्मिनी यांनी ही ऑफरही नाकारली. त्यानंतर ही भूमिका मंदाकिनी यांनी साकारली आणि या चित्रपटामुळे त्यांना मोठी लोकप्रियता मिळाली.

4 / 5
पद्मिनी कोल्हापुरे यांनी व्यावसायिक यशापेक्षा आपल्या तत्वांना अधिक महत्त्व दिले. त्यामुळे काही सुपरहिट चित्रपट त्यांच्या हातून गेले असले, तरी उत्कृष्ट अभिनय, साधेपणा आणि दर्जेदार भूमिकांमुळे त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत स्वतःची वेगळी आणि कायमस्वरूपी ओळख निर्माण केली.

5 / 5
Follow Us
नागपुरात मोर्चाची तयारी, इकडे सरकारकडून बैठकीचं आमंत्रण; रोहित पवार...
Chandrashekhar Bawankule : नागपुरात मोर्चाची तयारी, इकडे सरकारकडून बैठकीचं आमंत्रण; रोहित पवारांच्या भूमिकेकडे लक्ष
रोहित पवारांची नागपुरात दोन तास गुप्त बैठक; ट्रॅक्टर मोर्चाआधी नेमकी
Rohit Pawar : रोहित पवारांची नागपुरात दोन तास गुप्त बैठक; ट्रॅक्टर मोर्चाआधी नेमकी काय रणनीती ठरली?
रात्रीचा अंधार, खोल दरी अन् सात तासांचं रेस्क्यू ऑपरेशन; तोरणा किल्ल्य
Pune : रात्रीचा अंधार, खोल दरी अन् सात तासांचं रेस्क्यू ऑपरेशन; तोरणा किल्ल्यावर 20 वर्षीय तरुणाला जीवदान
आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलं पात्र लिहिलं
Aditya Thackearay : आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलं पात्र लिहिलं; नेमकं कारण काय?
शिवसेना कोणाची? पक्षचिन्हाच्या लढाईत आज काय घडणार? शिवसेना पक्षचिन्ह..
Shivsena : शिवसेना कोणाची? पक्षचिन्हाच्या लढाईत आज काय घडणार? शिवसेना पक्षचिन्ह प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज युक्तिवाद
ट्रॅक्टर मोर्चाच्या पोस्टरवर शरद पवारांचा फोटो; राष्ट्रवादीतील...
Rohit Pawar Tractor Morcha : ट्रॅक्टर मोर्चाच्या पोस्टरवर शरद पवारांचा फोटो; राष्ट्रवादीतील चर्चांना पुन्हा उधाण
काशी नगरी सजली! लक्ष लक्ष दिव्यांनी उजळणार वाराणसी, नमो घाटावर देव...
काशी नगरी सजली! लक्ष लक्ष दिव्यांनी उजळणार वाराणसी, नमो घाटावर देव दिवाळीची जय्यत तयारी
शक्तिपीठ महामार्गाच्या जमीन मोजणीला शेतकऱ्यांचा उद्रेक; अधिकाऱ्यांना..
शक्तिपीठ महामार्गाच्या जमीन मोजणीला शेतकऱ्यांचा उद्रेक; अधिकाऱ्यांना मारहाण, वाहनांची तोडफोड!
जे कुणालाच जमलं नाही ते करून दाखवलं! वैभव सूर्यवंशीची द्विशतकी खेळी
जे कुणालाच जमलं नाही ते करून दाखवलं! बॅट हातात घेतली अन् विक्रमांचा पाऊस पाडला; वैभव सूर्यवंशीची ५२ चेंडूंत द्विशतकी खेळी
धंगेकरांच्या सुचक पोस्टने राजकीय वर्तुळात खळबळ; चंद्रकांत पाटलांनी...
धंगेकरांच्या सुचक पोस्टने राजकीय वर्तुळात खळबळ; चंद्रकांत पाटलांनी मौन का बाळगलं?