AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अब्दुल तेलगीने डान्सबारमध्ये तमन्ना भाटियावर उडवले होते करोडो रुपये? सर्वात श्रीमंत बार गर्लशी काय कनेक्शन?

अब्दुल तेलगी तेव्हा प्रकाशझोतात आला जेव्हा बातमी पसरली की, अंधेरीच्या एका लेडीज बारमध्ये एका व्यक्तीने बार गर्लवर एका रात्रीत तब्बल 93 लाख रुपये उधळले. ही बार गर्ल अचानक देशभरात चर्चेचा विषय ठरली आणि तिला देशातील सर्वात श्रीमंत बार गर्ल म्हणून ओळख मिळाली. आता नेमकं तमन्नाचं काय कनेक्शन? जाणून घ्या...

| Updated on: Aug 17, 2025 | 5:13 PM
Share
काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या स्कॅम 2003 या वेब सीरिजमुळे गाजलेला तेलगी घोटाळा पुन्हा एकदा चर्चेत आला. सुमारे 32,000 कोटी रुपयांच्या स्टॅम्प पेपर घोटाळ्याचा मुख्य आरोपी अब्दुल करीम तेलगी हा केवळ घोटाळ्यासाठीच नव्हे, तर राजकारण्यांशी संबंध, चित्रपटसृष्टीतील गुंतवणूक आणि बार गर्ल्सशी असलेल्या नात्यांमुळेही कायम चर्चेत राहिला. मात्र, या सगळ्यामध्ये खळबळ तेव्हा उडाली जेव्हा या प्रकरणात एका बॉलिवूड अभिनेत्रीचे नाव जोडले गेले.

1 / 6
अब्दुल तेलगी तेव्हा प्रकाशझोतात आला जेव्हा बातमी पसरली की, अंधेरीच्या एका लेडीज बारमध्ये एका व्यक्तीने तरन्नुम नावाच्या बार गर्लवर एका रात्रीत तब्बल 93 लाख रुपये उधळले. ही बार गर्ल अचानक देशभरात चर्चेचा विषय ठरली आणि तिला देशातील सर्वात श्रीमंत बार गर्ल म्हणून ओळख मिळाली. ती नेमकी कोण आहे? कशी दिसते, याबाबत सर्वत्र उत्सुकता निर्माण झाली. एके दिवशी तिचे फोटो इंटरनेटवर व्हायरल होऊ लागले आणि त्या फोटोंमधील व्यक्ती दुसरी-तिसरी कोणी नसून बॉलिवूड अभिनेत्री तमन्ना भाटिया होती. हे 2005 सालचे प्रकरण आहे.

2 / 6
त्या काळात जसे आज व्हॉट्सअॅप आणि सोशल मीडियावर फोटो, मेसेज व्हायरल केले जातात, तसेच तेव्हा ई-मेलद्वारे फोटो पाठवून व्हायरल केले जायचे. असाच एक ई-मेल व्हायरल झाला, ज्यामध्ये तमन्नाचे फोटो होते आणि कॅप्शनमध्ये लिहिले होते, “आता तुम्हाला कळले का इतके क्रिकेटपटू आणि चित्रपट स्टार्स तिच्यामागे का वेडे झाले आहेत?” आणि “हो, हीच ती तरन्नुम खान, सध्याची प्रसिद्ध बार गर्ल.”

3 / 6
2005 मध्येच तमन्ना भाटियाने चांद सा रोशन चेहरा या हिंदी चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. तेव्हा ती केवळ 15 वर्षांची होती. त्याच वर्षी तिने श्री या तेलुगू चित्रपटातही काम केले होते. व्हायरल झालेले फोटो हे श्री चित्रपटाच्या एका इव्हेंटदरम्यान काढलेले होते. मात्र, करिअरच्या सुरुवातीला बार गर्ल म्हणून बदनाम होत असल्याचे पाहून तमन्ना आणि तिच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला. काही वृत्तपत्रांनी तमन्नाचे फोटो वापरून ती क्रिकेट सट्टेबाजांशी संबंधित वादग्रस्त बार गर्ल तरन्नुम खान असल्याचा दावा केला आणि तिचे फोटो छापले. यामुळे तमन्नाने मुंबई पोलिसांकडे तक्रार दाखल केली.

4 / 6
एका न्यूज चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत तमन्नाने सांगितले, “जेव्हा माझे नाव एका वादग्रस्त बार डान्सरशी जोडले गेले तेव्हा मला खूप धक्का बसला. ई-मेलमधील फोटो हे माझ्या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानच्या मीडिया ब्रीफिंगवेळी काढले गेले होते. लोकांना हे समजत नाही की ते कोणाच्या तरी आयुष्याशी खेळत आहेत.” त्या काळात तमन्ना अभिनयासोबतच बांद्राच्या नॅशनल कॉलेजमध्ये शिक्षण घेत होती. दुसरीकडे, तरन्नुम खानला क्रिकेट सट्टेबाजी प्रकरणात अटक झाली होती. या प्रकरणात श्रीलंकेचा फिरकी गोलंदाज मुरलीधरन याचेही नाव समोर आले होते.

5 / 6
या घटनेमुळे तमन्ना आणि तिच्या कुटुंबाला मानसिक त्रास सहन करावा लागला. तमन्नाचे नाव चुकीच्या पद्धतीने वादग्रस्त प्रकरणाशी जोडले गेले, ज्यामुळे तिच्या करिअरवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. मात्र, तिने या प्रकरणावर स्पष्टपणे आपली बाजू मांडली आणि पोलिस तक्रारीद्वारे न्याय मागितला. Scam 2003 मुळे हे प्रकरण पुन्हा चर्चेत आले असून, तमन्ना भाटियाच्या या अनुभवाने त्या काळातील सोशल मीडियाच्या गैरवापराचा एक गंभीर मुद्दा समोर आणला होता.

6 / 6
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.