AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बॉलिवूडच्या या 5 अभिनेत्री दाखवणार कमाल, मोठ्या सेलिब्रिटींना पिछाडीवर टाकून करणार धमाल !

मागचं वर्ष हे बॉलीवूडसाठी चांगलं होतं. शाहरुख खान, सनी देओल आणि रणबीर कपूर हे तिन्ही स्टार्च नाव जगभरात गाजलं. तर आता यावर्षाच्या सुरुवातीपासूनच अक्षय कुमार, अजय देवगण आणि कार्तिक आर्यन यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. पण या सर्वांदरम्यानच बॉलिवूडच्या अभिनेत्रींची फारशी चर्चा होताना दिसत नाहीये. पण या 5 नामवंत अभिनेत्रींकडे असे चित्रट आहेत, ज्याद्वारे त्या कमाल दाखवत अनेक बड्या स्टार्सना पिछाडीवर टाकू शकतात. त्यांचे अनेक मोठे चित्रपट रिलीज होणार आहेत. अभिनेत्री कोण हे जाणून घेऊया

| Updated on: Apr 30, 2024 | 1:13 PM
Share
आलिया भट्ट : बॉलिवूडमधील अत्यंत नामवंत अभिनेत्री असलेल्या आलिया भट्टने एकाहून एक सरस दिग्दर्शकासोबत आणि हिट चित्रपटांत काम केलं आहे. सध्या,  आलियाने अनेक मोठ्या चित्रपटांमध्ये प्रवेश केला आहे. लवकरच ती YRF च्या पहिल्या महिला गुप्तहेराच्या चित्रपटात दिसणार आहे. या पिक्चरमध्ये ती शाहरुख खानची विद्यार्थिनी असेल अशी चर्चा आहे. याशिवाय ती संजय लीला भन्साळीच्या 'लव्ह अँड वॉर', वेदांग रैनासोबत 'जिगरा' आणि 'ब्रह्मास्त्र 2' सारख्या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.

1 / 5
दीपिका पादुकोण : लवकरच आई होणारी दीपिका पडूकोणही या वर्षात अनेक महत्वपूर्ण चित्रपटांमध्ये दिसणार आहे. गेलं वर्षही तिच्यासाठी खासं होतं. या वर्षाची सुरूवात 'फायटर'ने करणाऱ्या दीपिकाचे आणखी दोन मोठे चित्रट रिलीज होणार आहेत. लवकरच ती प्रभासच्या 600 कोटींचा 'कल्की 2898 एडी'चित्रपटात दिसणार आहे. तर, अजय देवगणच्या 'सिंघम अगेन'मध्येही तिची महत्त्वाची भूमिका आहे.

2 / 5
जान्हवी कपूर : जान्हवीकडे सध्या 7 मोठे चित्रपट आहेत. 2018 मध्ये 'धडक' चित्रपटातून करिअरची सुरुवात करणाऱ्या जान्हवीने 6 वर्षांत 7 चित्रांमध्ये काम केले आहे. 2023 आणि 2024 या वर्षातील पहिले पाच महिने तिच्यासाठी खूप चांगले होते. तिने अनेक मोठे चित्रपट साईन केले आहेत. या यादीची सुरुवात ‘देवरा’ ने होईल. ज्युनियर एनटीआरच्या या चित्रपटातून ती साऊथमध्ये पदार्पण करणार आहे. तसेच रामचरणच्या 'आरसी 16' आणि सूर्याच्या 'कर्ण'चाही त्या यादीत समावेश आहे. बॉलिवूडबद्दल बोलायचे झाले तर ती सिद्धार्थ मल्होत्रासोबत एका चित्रपटात दिसणार आहे. तर 'सनी संस्कार की तुलसी कुमारी'मध्ये ती वरुण धवनसोबत आहे. नुकताच 'उलज'चा टीझर रिलीज झाला, तर 'मिस्टर अँड मिसेस माही'ची रिलीज डेटही समोर आली.

3 / 5
तृप्ति डिमरी: रणबीर कपूरच्या ‘ॲनिमल’मध्ये झळकलेली तृप्ती डिमरी ही रातोरात नॅशनल क्रश बनली.  गेल्या वर्षी डिसेंबरपासूनच ती खूप चर्चेत आहे. अनेक मोठ्या चित्रपटांमध्ये तिची एंट्री झाली आहे. या यादीतील पहिला चित्रपट  आहे 'मेरे मेहबूब मेरे सनम', त्यामध्ये ती विकी कौशलसोबत दिसणार आहे. तसेच सध्या ती कार्तिक आर्यनसोबत 'भूल भुलैया 3'च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. 'तू आशिकी है', 'विकी विद्या का वो व्हिडिओ', 'धडक 2'मध्येही ती महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. यानंतर 'ॲनिमल पार्क'मध्येही ती पुनरागमन करेल असा चाहत्यांना विश्वास  आहे.

4 / 5
कियारा आडवाणी : बॉलिवूड असो किंवा साऊथचे चित्रपट, कियारा अडवाणीला सध्या सगळीकडे डिमांड आहे. राम चरण च्या ‘गेम चेंजर’मधून धमाल करण्यास ती सज्ज आहे. याशिवाय  ‘डॉन 3’ मध्ये कियारा ही रणवीर सिंगसोबत झळकणार आहे. या चित्रपटासाठी तिने तगडी फी आकारल्याची चर्चा  आहे. एवढंच नव्हे तर 'वॉर 2'मध्येही कियारा काम करणार असून त्यामध्ये तिच्यासोबत हृतिक रोशन आणि ज्युनियर एनटीआर यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.

5 / 5
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.