AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ashvini Bhave: अश्विनी भावे यांचं अमेरिकेतलं घर; सुंदर बाग, घरच्या भाज्या अन् कलाकारांसाठी खास पाहुणचार!

Ashvini Bhave Home Tour: अभिनेत्री अश्विनी भावे यांचं सॅन फ्रान्सिस्कोमधील आलिशान घर सोशल मीडियावर चर्चेत आलं आहे. विविध कलाकारांनी त्यांच्या या सुंदर घराला भेट दिली आहे.

| Updated on: Oct 01, 2026 | 11:46 AM
Share
‘अशी ही बनवाबनवी’, ‘धडाकेबाज’, ‘हीना’ यांसारख्या चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या मनात घर केलेल्या अभिनेत्री अश्विनी भावे सध्या अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्कोमध्ये कुटुंबासह राहतात. अभिनयापासून काहीशा दूर असल्या तरी सोशल मीडियावर त्या सक्रिय आहेत. विशेष म्हणजे, अमेरिकेत राहत असूनही त्यांचं घर आणि जीवनशैली पाहिल्यावर त्यांच्यातील मराठमोळेपणा प्रकर्षाने जाणवतो.

1 / 6
त्यांच्या घरी अनेक मराठी आणि बॉलिवूड कलाकारांनी भेट दिली असून, अश्विनी भावे उत्तम होस्ट म्हणूनही ओळखल्या जातात. अश्विनी भावेंच्या घराचं सर्वात लक्षवेधी वैशिष्ट्य म्हणजे घराच्या मागच्या बाजूला त्यांनी फुलवलेली हिरवीगार बाग. या बागेत विविध फुलं, फळं आणि भाज्या त्या स्वतः पिकवतात.

2 / 6
अमेरिकेत राहूनही अंगणात भाजीपाला पिकवण्याची भारतीय परंपरा त्यांनी जपली आहे. घरच्या बागेत पिकवलेल्या ताज्या भाज्यांचा वापर त्या स्वयंपाकातही करतात. या बागेशी संबंधित त्यांनी ‘द ग्रीन डोअर’ हा उपक्रमही सुरू केला होता. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्या घरच्या बागेत कोणत्या भाज्या पिकवतात, त्यांची निगा कशी राखतात आणि घरच्या घरी भाजीपाला कसा उगवता येतो, याची माहिती देत होत्या.

3 / 6
अश्विनी भावे यांचं अमेरिकेतील घर हे केवळ त्यांचं कुटुंबीयांचं घर नसून कलाकार मित्रांसाठीही जणू भेटीचं ठिकाण बनलं आहे. डॉ. मोहन आगाशे, अमोल पालेकर, सचिन खेडेकर, आदिनाथ कोठारे, सोनाली कुलकर्णी, अवधूत गुप्ते, वैदेही परशुरामी, स्वप्नील जोशी आणि गजेंद्र अहिरे यांसारख्या अनेक कलाकारांनी त्यांच्या घरी भेट दिली आहे.

4 / 6
या भेटीदरम्यान अश्विनी यांनी पाहुण्यांना आपल्या घराभोवतीच्या बागेची सफरही घडवली होती. अलीकडेच नीना कुलकर्णी आणि अमृता सुभाष यांच्यासह ‘असेन मी नसेन मी’ नाटकाच्या टीमनेही त्यांच्या घरी भेट दिली. बागेतील ताजे टोमॅटो आणि भाज्या पाहून पाहुणेही भारावून गेले.

5 / 6
अश्विनी भावेंच्या घरातील हिरवळ, घरगुती वातावरण, बागकामाची आवड आणि पाहुण्यांचं मनापासून स्वागत करण्याची पद्धत यामुळे हे घर सेलिब्रिटी लाइफस्टाइलपेक्षा एका उबदार, मराठमोळ्या घरासारखं वाटतं. परदेशात राहूनही मातीशी आणि आपल्या संस्कृतीशी जोडलेलं हे जीवन त्यांच्या चाहत्यांना विशेष भावतं.

6 / 6
Follow Us
उद्याच्या CJP मोर्चाला पवारांची राष्ट्रवादी मैदानात; सुप्रिया सुळेंनी
NCP Sharad Pawar on CJP : उद्याच्या CJP मोर्चाला पवारांची राष्ट्रवादी मैदानात; सुप्रिया सुळेंनी जाहीर केला पाठिंबा
पूर्णेकरला संपवण्यामागे कोणाचा हात?, राऊतांनी सगळंच सांगून टाकलं
Sanjay Raut on Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा दावा! पूर्णेकरला संपवण्यामागे कोणाचा हात?, राऊतांनी सगळंच सांगून टाकलं
तिन्ही नेत्यांची बैठक! विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचा मोठा प्लॅन
CM DCM Meeting : रात्री उशिरा तिन्ही नेत्यांची बैठक! विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचा मोठा प्लॅन; जागावाटपावर खलबतं - सुत्र
लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण केलेलं 1 किलो सोनं एवढ्या कोटींना विकलं
Lalbaugcha Raja Auction : लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण केलेलं 1 किलो सोनं तब्बल एवढ्या कोटींना विकलं! बाप्पाचा आशीर्वाद मानून भक्तानेच खरेदी केलं
मनोज जरांगे यांच्या सहकाऱ्यांवर ED ची नजर? तब्बल एवढ्या कोटींच्या....
Manoj Jarange ED : मनोज जरांगे यांच्या सहकाऱ्यांवर ED ची नजर? आर्थिक व्यवहारांची गोपनीय चौकशी सुरू; तब्बल एवढ्या कोटींच्या व्यवहारांचा दावा
हे जैनांचं नाही, आगरी-कोळी, मराठी बांधवांचं शहर; मनसेचा कोणाला टोला?
MNS On Narendra Mehata : मीरा-भाईंदरच्या ओळखीवरून राजकीय रणकंदन! हे जैनांचं नाही, आगरी-कोळी आणि मराठी बांधवांचं शहर; मनसेचा नेमका कोणाला टोला?
मीनाक्षी शिंदेंच्या घरीच कट रचला? पूर्णेकर प्रकरणात पुरवणी जबाबाने...
Sanjay Raut : मीनाक्षी शिंदेंच्या घरीच कट रचला? पूर्णेकर प्रकरणात पुरवणी जबाबाने खळबळ; संजय राऊतांनी थेट...
ऐन सणासुदीला महागाईचा झटका! कमर्शियल LPG तब्बल एवढ्या रुपयांनी महाग
LPG Price : ऐन सणासुदीला महागाईचा झटका! कमर्शियल LPG तब्बल एवढ्या रुपयांनी महाग; ऑक्टोबरमधील हे मोठे बदल जाणून घ्या
मुंबईत येणं महागलं! पाचही टोलनाक्यांवर टोलवाढ; तब्बल एवढ्या टक्क्यांनी
Mumbai Toll Tax : मुंबईत येणं महागलं! पाचही टोलनाक्यांवर टोलवाढ; तब्बल एवढ्या टक्क्यांनी टोल महागले....
ठाकरे बंधू एकवटले! 4 ऑक्टोबरच्या मोर्चाची टॅगलाईन ठरली; लोकशाही आणि...
Raj Thackeray : Uddhav Thackeray : ठाकरे बंधू एकवटले! 4 ऑक्टोबरच्या मोर्चाची टॅगलाईन ठरली; लोकशाही आणि संविधान.....