AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

BAPS अबू धाबी मंदिराचा Tolerance Award 2026 ने सन्मान

अबू धाबी येथील BAPS हिंदू मंदिराला 'टॉलरन्स अवॉर्ड 2026' ने सन्मानित करण्यात आले, ज्यामुळे त्यांची जागतिक स्तरावर शांतता, संवाद आणि मानवी एकतेची सेवा अधोरेखित झाली. पूज्य ब्रह्मविहारी स्वामींनी पुरस्कार स्वीकारताना AI, कुटुंब आणि अध्यात्माच्या भविष्यावर विचार मांडले, 'घरसाभा' परंपरेचे महत्त्व सांगितले. मजबूत कुटुंबे आणि करुणामय समुदायांमधूनच भविष्याची खरी निर्मिती होईल, असा प्रेरणादायी संदेश त्यांनी दिला. मंदिराची सहिष्णुतेची भूमिका या पुरस्काराने दृढ झाली आहे.

| Updated on: Jun 04, 2026 | 2:20 PM
Share
जगभरात शांतता, सद्भावना आणि मानवी एकतेचा संदेश प्रसारित करणाऱ्या अबू धाबी येथील BAPS हिंदू मंदिराला  “Tolerance Award 2026” ने सन्मानित करण्यात आलं.  International Dialogue of Civilizations and Tolerance Conference (IDCT 2026) दरम्यान हा सन्मान प्रदान करण्यात आला. जागतिक स्तरावर सहिष्णुता, संवाद आणि शांततापूर्ण सहअस्तित्वाला प्रोत्साहन देणाऱ्या संस्थांना हा पुरस्कार दिला जातो.

1 / 5
हा पुरस्कार केवळ एका संस्थेचा गौरव नसून, BAPS हिंदू मंदिर समाजात सातत्याने रुजवत असलेल्या मानवता, करुणा, एकता आणि परस्पर सन्मान या सार्वत्रिक मूल्यांची दखल आहे. Festival of Harmony, Omsiyyat तसेच विविध मानवतावादी मदत अभियानांद्वारे मंदिराने विविध धर्म, संस्कृती आणि राष्ट्रीयतेतील लोकांना एकाच व्यासपीठावर आणून विश्वबंधुत्वाचे प्रेरणादायी उदाहरण निर्माण केलं आहे.

2 / 5
पुरस्कार स्वीकारताना BAPS हिंदू मंदिर, अबू धाबीचे प्रमुख पूज्य ब्रह्मविहारी स्वामी यांनी कुटुंब, अध्यात्म आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) यांच्या भविष्यावर प्रेरणादायी विचार मांडले. “ AI काय करू शकतं हा  आज सर्वात महत्त्वाचा प्रश्न नाहीये, तर AI च्या प्रभावामुळे आपण कोणत्या प्रकारचे माणूस बनत आहोत हा मोठा प्रश्न आहे,” असं ते म्हणाले.

3 / 5
भारतीय संस्कृतीतील ‘मातृदेवो भव’, ‘पितृदेवो भव’ आणि ‘वसुधैव कुटुंबकम्’ या शाश्वत मूल्यांचा उल्लेख करत त्यांनी सांगितलं की, ' मजबूत कुटुंबे ही मजबूत समाज आणि समृद्ध राष्ट्राची पायाभरणी असतात'.  परम पूज्य प्रमुखस्वामी महाराजांनी प्रेरित केलेल्या ‘घर सभा’ या परंपरेचं त्यांनी आधुनिक काळातील एक प्रभावी सामाजिक गरज म्हणून वर्णन केलं. या उपक्रमात कुटुंबातील सदस्य दररोज काही वेळ एकत्र बसून प्रार्थना, संवाद आणि आत्मीयतेचा अनुभव घेतात.

4 / 5
आपल्या भाषणाच्या समारोपात त्यांनी अत्यंत प्रेरणादायी संदेश दिला: “भविष्य केवळ अधिक बुद्धिमान यंत्रांमुळे घडणार नाही; ते अधिक सक्षम कुटुंबे, अधिक संवेदनशील हृदये आणि अधिक करुणामय समुदाय यांच्या माध्यमातून घडेल. आपल्याला फक्त AI Powered Families नव्हे, तर AI Empowered Families घडवायची आहेत” असं ते म्हणाले.  हा सन्मान BAPS हिंदू मंदिराच्या  जागतिक भूमिकेचे प्रतीक आहे, ज्याद्वारे ते विविध संस्कृती, समुदाय आणि देशांना एकत्र जोडत जगभरात शांतता, संवाद आणि मानवी एकतेची नवी प्रेरणा देत असतं.

5 / 5
Follow Us
डान्समध्ये गौतमीला टक्कर देणाऱ्या ऐश्वर्याला मोठा धक्का, पोलिसांनी थेट
Aishwarya Jadhav Dancer | डान्समध्ये गौतमीला टक्कर देणाऱ्या ऐश्वर्याला मोठा धक्का, पोलिसांनी थेट...
दहीहंडीतील लावणी भोवली! नृत्यांगणा राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल
Dancer Radha Patil News | पुण्यात दहीहंडीतील लावणी भोवली! नृत्यांगणा राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल
बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं...
Baramati | बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं स्वतंत्र पॅनल; सोमेश्वर कारखान्याची निवडणूक रंगणार
विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
Vishakha Raut | विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला इशारा
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला कडक इशारा
20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर!
Nanded | 20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर! नांदेडमध्ये हजारो एकर पीक धोक्यात
तू तुझं तुझं बघ ना! सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर
Ambadas Danve On Gunaratna Sadavarte | तू तुझं तुझं बघ ना! बाळासाहेब ठाकरेंच्या फोटोवरून सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर, पुढे म्हणाले...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी... त्या बड्या नेत्याने...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी अनेक जण आमच्याशी संपर्कात, त्या बड्या नेत्याने सगळंच सांगितलं
अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल...
Manoj Jarange | अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल, पुढे म्हणाले...
सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! सोयाबीन माना टाकू लागलं
Amravati | सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! अमरावतीत सोयाबीन माना टाकू लागलं; शेतकरी संकटात