वाढदिवसाच्या दिवशी प्रत्येक खड्ड्याला तरुणाने भरवला केक, फोटो व्हायरल
भंडारा ते तुमसर राष्ट्रीय महामार्गवरील खड्ड्यात वृक्षारोपण करून केक भरवला आहे. वाढदिवसाच्या माध्यमातून केलेल्या अभिनव आंदोलनाने प्रशासनाची झोप उडाली आहे.
वाढदिवस सेलिब्रेशन आगळावेगळा पद्धतीनं साजरा करण्याचा फॅड आहे. यात मित्रांसोबत मोठमोठ्या हॉटेलमध्ये जल्लोषात सेलिब्रेशन करताना बघायला मिळतं.
1 / 4
भंडारा जिल्ह्यातील वरठी येथील कृष्णा भुजबळ या तरुणानं त्याचा वाढदिवस भंडारा ते बालाघाट आंतरराज्य महामार्गावरील वरठी ते दाभा या गावादरम्यान पडलेल्या खड्ड्यात बसून कृष्णा व त्याच्या मित्रांनी वाढदिवस साजरा केला.
2 / 4
यावेळी ऑटो रिक्षा युनियननं त्यांना साथ देत खड्ड्यांमध्ये रोपटे लावून शासन आणि प्रशासनाचा निषेध व्यक्त केला. जागोजागी पडलेल्या खड्ड्यांच्या सत्कार करून करून प्रत्येक खड्डय्यांना केक भरवत वाढदिवस साजरा केला.
3 / 4
या मार्गावर मोठ्या प्रमाणात अपघात सुद्धा झालेले असून अनेकांना प्राणही गमवावे लागले आहे. या अभिनव वाढदिवसाची आता जिल्ह्यात सर्वत्र चर्चा रंगली आहे.